हिरवे-पिवळे तुरे उन्हाचे खोविलेस केसांत उगा का ? वार्‍याचे हळू पीस फिरवुनी उसळ्यास हिरव्या लहरी का ? पिवळीकाळी फूलपाखरे फेकुनी मजवर भिवविसी का ? लाल फुलांनी भरता ओंजळ, माझी मजवर उधळसी का ? सहसा शिंपुनी गुलाबपाणी ढगा आड दडलास वृथा का ? प्रतिबिंबानी निळ्या-जांभळ्या तनमन अवघे व्यापिसी का ? अशी हरवली राणी मीरा, अशी हरवली राधा गौळण असेच मी मज हरवून जावे हेच तुझ्या मनी जागत का ?