1 min read 800.9K reads

डोळ्यांतल्या डोहामध्ये- विंदा करंदीकर


डोळ्यांतल्या डोहामध्ये खोल खोल नको जाऊ, मनांतल्या सावल्यांना नको नको, सखे, पाहू जाणीवेच्या गाभा-यात जाऊ नको एकटीने, गेलेल्यांना साधले का व्यथेवीण मागे येणे? व्यथेच्या या पेल्यांतून सत्याचे जे घेती घोट, पूस त्यांना कसा कांपे पिता पिता धीट ओठ!

Read more Earn more Learn more