देवा तुझा मी कुंभार। नासीं पापाचें डोंगर॥ १॥ ऐशा संतप्ते हो जाती। घडे साधूची संगती॥ २॥ पूर्ण कृपा भगवंताची। गोरा कुंभार मागे हेंचि॥ ३॥