Kavishala
Login / Sign Up
Home
Profile
Home
Profile
1 min
717.6K
दारा बांधता तोरण - इंदिरा संत
Kavishala Archives
Jun 16, 2020
AI
Kavishala AI
Listen to this post
दारा बांधता तोरण घर नाचले नाचले आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाऊले भिंती रंगल्या स्वप्नांनी झाल्या गजांच्या कर्दळी दार नटून उभेच, नाही मिटायाची बोली सूर्यकिरण म्हणाले घालु दारात रांगोळी शिंपू पायावरी दंव म्हणे वरून पागोळी भरू ओंजळ फुलांनी बाग म्हणेल हरून देईन मी आशीर्वाद केळ म्हणाली हासून येरझारा घाली वारा गंध मोतिया घेउनी सोनचाफ्याची पाऊले आज येतील अंगणी सोनचाफ्याची पाऊले आज आलीत अंगणी
Join WhatsApp Community
Daily literature, poetry & stories
Read More
Earn More
Learn More