Kavishala
Contests
Plus
Log in / Sign up
Home
Profile
Home
Profile
1 min read
797.9K reads
बाळ उतरे अंगणी - इंदिरा संत
Kavishala Archives
Jun 16, 2020
Share as image
Download
बाळ उतरे अंगणी बाळ उतरे अंगणी बाळ उतरे अंगणी, आंबा ढाळतो साउली चिमुकल्या पायांखाली सारी मखमल सावळी बाळ उतरे अंगणी, खाली वाकली सायली हाती बाळाच्या यावीत फुले, फुलांची डहाळी बाळ उतरे अंगणी, भान कशाचे ना त्याला उंचावून दोन्ही मुठी कण्या शिंपितो चिऊला बाळ उतरे अंगणी, कसे कळाले चिऊला भरभरा उतरून थवा पाखरांचा आला धिटुकल्या चिमण्यांची बाळाभोवती खेळण चिमुकल्या अंगणाची बाळाभोवती राखण
Join WhatsApp Community
Daily literature, poetry & stories
Read more
Earn more
Learn more
Write