बाहेर बरसती धारा रे मधुनीच वीज थरथरते क्षण प्राण उजळुनी विरते करी अधिक गहन अंधारा रे बाहेर बरसती धारा रे स्थिर अचल दिशांतुन दाही निःशब्द वेदना काही का व्याकुळ आज किनारा रे बाहेर बरसती धारा रे
हे मुक्त अनावर सगळे आकाश इथून मज दिसले घर गमे आज मज कारा रे बाहेर बरसती धारा रे मी उन्मन, काही सुचेना लाटांत निमंत्रण प्राणां भरतीत मलाच इशारा रे बाहेर बरसती धारा रे