आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात फुललासे निशिगंध, घोटाळली ताटव्यात आली बघ गाई गाई, चांदण्यांचे पायी चाळ लाविले का अवधान ऐकावया त्यांचा ताल ? आली बघ गाई गाई, लावी करांगुली गाली म्हणुन का हसलीस उमटली गोड खळी आली बघ गाई गाई, लोचनांचे घेई पापे म्हणून का भारावले डोळे माझ्या लाडकीचे ? आली बघ गाई गाई कढितसे लांब झोका दमलीस खेळूनिया झाक मोतियांच्या शिंपा