आजकाल प्रत्येक टि.व्हि सिरियल ने आपल्या देशात नवीन पध्दतीने वाईट संस्कार आपल्या आयुष्यात रुजू करत आहेत, पहा ना माझ्या नवरा ची बायको ह्या नाटकात शानाय सारखी मुलगी ह्या प्रकारच्या मुलीचं कश्या पद्धतीने अडकून पडलेल्या असतात आणि तेही लग्न झालेल्या व्यक्तीच्या आयुष्यात ???, राजा राणी ची जोडी आहे मध्ये तर कहरच केला, चांगल्या घरातील बायका पैसे देऊन पत्ते खेळताना दिसतात, आणि अतिशय सुंदर पद्धतीने बायकांना आयुष्यात काय चुकीचे करू शकतो ह्याची आयडिया सुचवलं जाते आहे.
प्रत्येक घरामध्ये बाई ही लक्ष्मी चे रूप घेऊन सासरी येते परंतु दुर्दैवाने टिव्ही हे च प्रत्येक क्षणाला तुमच्या घरात विष पसरविण्याचे काम करतं आहे आणि हीच अवस्था राहिली की आपल्या डोळ्यासमोर आपण आपल्या मुलांना शिकण्यासाठी फारसे काही देऊ शकणार नाही.ह्या गोष्टी चा गांभीर्याने विचार केला पाहिजे... तुम्ही आदर्श निर्माण करणारे शिवराय, जेथे स्पष्ट विचार मांडले आहेत अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करा.
प्रत्येक क्षणाला प्रेम हे सगळं खरं नातं दाखवा पण चुकीचे वयात सैराट पिक्चर मध्ये दाखवून दिले आहे , दुर्दैवाने मुलांचा तरी वापर करू नका...
© गौरीkailas
