सिमरन  चा आठवा महिना संपला होता आणि आई कडे माहेरी जाण्याचे वेध लागले होते. युरोप वरून येणारं म्हणून सगळी तयारी झाली होती. गुरुवारी सकाळी सिमरन व पती  मुंबईच्या एअरपोर्टला पोहोचले आणि आई बाबा घ्यायला आले होते. खूप खूप आनंद झाला कारण दोन वर्षांनी सर्वजण एकमेकांना पाहत होते. सिमरनी मनाशी ठरवलं की आता निवांतपणे राहायचे , आई च्या हातानं सर्व  भाज्या बनवायला लावायचे  , पुरणपोळी, धपाटे, आमटी,मेथीची भाजी , करंज्या, गुळाचं लाडू  ..  पहिला मुलगा होता त्यामुळे सर्वाचं चालू झाले आता काय हवं आहे, खरंतर सिमरन खूप घाबरुन गेली होती पहिल्यांदा  सिझर करावं लागलं होतं आणि आता दुसऱ्या वेळेस पण  सिझर की नॉर्मल डिलिव्हरी म्हणून खूप घाबरून गेलेले होती,आपल्या हातात काही ही नसतं .. एकामागून एक दिवस पुढे पुढे जात होता आणि एक दिवस पोटात दुखायला लागले होते,लगेच तिच्या आजीला सांगितलं, आईने तयारी करायला घेतली, भाऊसाहेब गाडी घेऊन आला आणि आम्ही दवाखान्यात निघालो... डॉक्टर मॅडम ने तिला ॲडमिट व्हायला सांगितलं, एका तासात  कळा बंद झाल्याने , आणि आजी ने चालू केले, आता तुझं काही खर नाही,अशा कळा बंद करून,हे लोक पैसेसाठी सिझर करा असे सांगितात.  आणि ती  बोलली डॉक्टर म्हणले ते सकाळी बघुया... सकाळी बरोबर आठ वाजता. सिझर ची तयारी सुरू केली, भूल देणारे तज्ञ डॉक्टर आले   होते, पहिल्यांदा तिला भूल देऊन ही , तिला काही झाले नाही त्यामुळे तिनं सांगितलं मला सुई खूप टोचत आहे, आणि परत दुसऱ्या वेळेस भूल द्यावी लागली नंतर तिला फक्त कळत होतं की रक्त खूप खूप flow  होतं होते म्हणून assistant dr  बेशुद्ध पडल्या आणि नंतर एका दिड तासाने पुन्हा तिला विचारलं, आता बरं वाटतं का, मुलगी झाली तुला , आता सात दिवस हॉस्पिटलमध्ये मुक्काम होता, शरीराला भूल  दिल्यामुळे फक्त वरून कमरेपर्यत जीव चालू आहे आणि  बाकीचे शरीर  नाही असे वाटत होते. बंद पडलं होतंच शिवाय बाळं बाजूला ठेवला होतं.सिमरन ला उठता येत नव्हते.आई बोलू लागली, डबा पाठवून देते आणि घरी जाऊन जेवणाची व्यवस्था व मुलांना बघते.आजी सोबत आहे.सिमरन ने माने ने,हो .सिझरमचळे दुध आले नाही आणि गायींचे दूध, पावडर दुध कसे प्रकार चालू झाले, त्यामुळे तिचं रडणं थांबतच नव्हतं आणि म्हणूनच कुरकुरी असे म्हटले.पहिल दिवस, दुसरा व तिसरा दिवस गेले आणि आई बोलली की आज आजी रात्री थ ओघ थांबेल, सिमरन हो  बोलून झोपी गेली.सांयकाळी सात वाजता पासून कुरकुरी चे रडणं थांबतच नव्हतं, त्यामुळे खूप खूप मानसिक ताण वाढत होता आणि शारीरिक दुर्बलता होते पहिल्यांदा नवीन जन्म झाला असं वाटतं होतं.
रात्रीच्या 2वाजता सिमरन ला सुई खूप खूप टोचत होती, तिने आजीला सांगितलं की बाहेर सिस्टर ला बोलून आण.  आजी बोलवण्यासाठी ऑफिस जवळ गेली आणि मला विनवण्या करत होती की तिला खूप खूप त्रास होत आहे, तुम्ही पटकन चला आणि सुई काढून टाका. तिने सिस्टर टीव्ही पाहत बसल्या होता , त्यामुळे ऐकून न ऐकल्यासारखं केलं, शेवटी आजी रूम मध्ये आली.कोणीबी  ऐकत नाही त्यामुळे काय करू????
सिमरन ला कळून चुकले की कोणाची मदत होणार नाही, खूप खूप त्रास व्हायला लागला आणि अखेरीस सर्व त्राण एकत्र आणून उठली, आणि आजी घ्या मदतीने बाथरूम पर्यंत गेली, खूप खूप रडायला येतं होते पण आजीला त्रास होऊ नये म्हणून तिने डोळे पाणावले होते ते पुसून टाकले आणि मन खंबीर ठेवून,सुई काढून टाकली.आता तिला मोकळा श्वास घेता आला. ज्या बायकांना  पाचशे रुपये, पाचशे रुपये दिले होते बाळ झाल्यावरच, इनाम म्हणून आमच्या भाऊसाहेब नी, त्या दिवशी एकही बाई मदत माणूसकी म्हणून तरी करायला हवी होती.
सात दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार झाले आणि सिमरन घरी गेली.परंतु मनापासून तिला खूप खूप त्रास झाला.काही महिन्यांनी तिने सिस्टर चा प्रकार सांगितला डॉ ना , त्यामुळे त्यांनी त्या सगळ्या नौकरी वरून काढून टाकायचं ठरवलं परंतु सिमरन ने विनंती केली की असे करू नका.पण प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळेस मदत करा असं समजून सांगा.

© गौरीkailas