आजकाल प्रत्येक मराठी/हिंदी टि.व्हि सिरियल ने आपल्या देशात नवीन पध्दतीने वाईट संस्कार आपल्या आयुष्यात रुजू करत आहेत, पहा ना माझ्या नवरा ची बायको ह्या नाटकात शानाय सारखी मुलगी लग्न न करता , एका माणसाचा संसार उद्धवस्त करते हे अतिशय सुंदर आणि आकर्षक पद्धतीने दाखवून दिले आहे. दुर्दैवाने मला हेचं सांगायचं की सर्व माणसांकडे दोष देऊन मोकळे होतात. ह्या सगळ्यांतून काय मिळवलं आहे??? अहो राजा राणी ची जोडी आहे मध्ये तर कहरच केला, चांगल्या घरातील बायका पैसे देऊन पत्ते खेळताना दिसतात, आणि अतिशय सुंदर पद्धतीने बायकांना आयुष्यात काय चुकीचे करू शकतो ह्याची आयडिया सुचवलं जाते आहे.
प्रत्येक घरामध्ये बाई ही लक्ष्मी चे रूप घेऊन सासरी येते परंतु दुर्दैवाने टिव्ही नेहमीचं प्रत्येक क्षणाला तुमच्या घरात विष पसरविण्याचे काम करतं आहे आणि हीच अवस्था राहिली की आपल्या डोळ्यासमोर आपण आपल्या मुलांना शिकण्यासाठी फारसे काही देऊ शकणार नाही.ह्या गोष्टी चा गांभीर्याने विचार केला पाहिजे... तुम्ही आदर्श निर्माण करणारे शिवराय, जेथे स्पष्ट विचार मांडले आहेत अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करा.
प्रत्येक क्षणाला चुकीचे गोष्टी चे समर्थन होऊ शकते आणि
दुर्दैवाने मुलांचा तरी वापर करू नका... भावी पिढी ला वाचवलं तरचं खरी स्वरूपाने देशालाही वाचवू शकता..
© गौरीkailas

