
गौरवला नुकत्याच सुट्ट्या लागल्या होत्या. त्यामुळे त्याचा सारखा हट्ट सुरु होता. “आपण कुठेतरी जाउया आपण कुठेतरी जाउया.” पण मीरा आणि वेदांतला सुट्टीच मिळत नव्हती. त्यामुळे गौरवचा हिरमोड होत होता. एकतर ते सगळे गौरवच्या जुन्या मित्रांना सोडून नवीन घरात शिफ्ट झाले होते त्यामुळे गौरवच्या बरोबरीच तिथे अस कुणीच नव्हत. दुसर म्हणजे गौरव अतिशय खोडकर मुलगा होता. सतत काही न काही खोड्या करत रहायचा. पण आता त्या खोड्यांचा ही त्याला कंटाळा आला होता. त्याच्या मनात एकच विचार सुरु होता. तो म्हणजे कुठेतरी बाहेर जाण्याचा सुट्ट्या लागल्या पासुन त्याच घरात मनच लागत नव्हत. गौरव कुलकर्णी एक आठ वर्षाचा मुलगा होता. जितका हुशार तितकाच जिद्दी एखादी गोष्ट मनात आली कि, ती झालीच पाहिजे असा त्याचा हट्टच असायचा पण यावेळी अस नव्हत. कारण मीरा आणि वेदांतला एकाच वेळी मिटींग आल्या होत्या त्यामुळे दोघांचा ही नाइलाज होता. हे सगळ बघुन गौरव मात्र दोघांवर खुप नाराज होता. शेवटी मीराच त्याला जवळ घेउन समजावते.
मीरा :- “बेटा हे बघ, आपल हे घर नवीन आहे की नाही तसच बाबांच काम पण नवीन आहे. म्हणून इतक काम कराव लागत आपल्या बाबांना. पण पक्क आपण नेक्स्ट वीकला नक्की जाउत बिचवर चालेल तुला पाण्यात खेळायला आवडत न” हे ऐकुन गौरवला काय बोलाव आणि काय नाही असच होउन जात त्याचा आनंद गगनात मावत नाही तो इतका खुश होतो की, आपण दोघांवर रुसलो आहोत हे ही तो विसरुन जातो. आणि त्याच आनंदात त्याच्या तोंडून उदगार बाहेर पडतात.
गौरव :- “गोव्याला जायच आहे.”
मीरा :- “हो, पिलु पण तु असा सारखा त्रास दिला नाहीस तर आज आमची मिटींग झाली की आम्ही सरांशी बोलुन घेतो ओके. चल निघु आम्ही.” मीरा आणि वेदांत ऑफीसला निघुन जातात.
एक आठवड्या नंतर...
आज गौरव खुपच खूशीत असतो. कारण आज तो फिरायला जाणार असतो म्हणून गौरव सकाळी पाच वाजताच उठतो कुठली बॅग घ्यायची कपडे कुठले घ्यायचे हे ठरवुन आपली बॅग सुध्दा स्वत:च भरतो. मग आई बाबांन उठवुन आईला कामा मध्ये मदत देखील करतो. काही वेळातच आवरुन सगळे गोव्याला रवाना होतात. वेदांतनी गोव्याच्या रत्नप्रभा हॉटेलमध्ये बुकींग केलेल असत. रत्नप्रभा हॉटेल तस खुपच महाग असत. पंचतारांकीत असल्यामुळे त्याची कॉस्ट देखील जास्त होती. पण हॉटेलचे ओनर हे वेदांतच्या ओळखीचे असल्याने त्याला रुम कमी रेट मध्ये मिळालेली होती.
दुपारचे १२ वाजतात...
आणि वेदांतची कार मेनगेट मधुन आत प्रवेश करते. हॉटेलच्या दारा जवळ दोन व्दारपाल स्वागतासाठी उभेच असतात. दोन्ही व्दारपाल हॉटेलमध्ये येणा-या प्रत्येकाच जातीने स्वागत करत होते. वेदांत आपली गाडी पर्कींला लावतो. गौरवला तर धीरच धरवत नसतो. त्याला अगदी अस झालेल असत की, कधी एकदा गाडीतुन उतरतोय आणि आवरुन बीचवर जातोय. तो आई काही बोलण्या आधीच गाडीतुन उतरतो आणि हॉटेलकडे धावत सुटतो. ते बघुन मीरा त्याच्या हाताला पकडुन थांबवते गाडीच्या डिक्कीतुन बॅगा काढते आणि तीघे हॉटेलमघ्ये पोहोचतात. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर मकरंद हॉटेलचा मॅनेजर त्यांच्या स्वागतासाठी उभाच असतो.
मकरंद :- “या... या आम्ही तुमचीच वाट बघत होतो. आपल आमच्या हॉटेलमध्ये स्वागत आहे. तुम्हाला प्रवासात काही त्रास तर झाला नाही न.”
वेदांत :- “काही विचारु नकोस मकरंद. ही ट्रॅफिक म्हणजे डोक्याला ताप आहे नुसता.”
मकरंद :- “हे तर सगळीकडेच आहे साहेब. बरं ही तुमच्या रुमची चावी. तुम्ही फ्रेश व्हा तोपर्यंत मी तुमच्या रुम मध्ये चहा पाठवतो.”
वेदांत चावी घेतो आणि तिघ रुम कडे निघुन जा