“प्रोफेसर सुधीर गाडगीळनी मला तुझ्या बद्दल सांगितल होत तुला पुरातत्व खात्याची चांगली माहिती आहे बैस न उभी का आहेस.” दिपांशु तीला बसायला सांगत विचारतो.
“हो, मी पुरातत्व खात्याची विद्द्यार्थीनी आहे सर मला सुधीर सर म्हणाले होते पण नेमक तुम्हाला माझी काय मदत हवी आहे.” खुर्चीवर बसत विद्याने विचारल
“अग, माझ एक प्रोजेक्ट आहे त्यात मला तुझी मदत हवी आहे. मी इतिहासकार आहे जुन्या वास्तुंवर तीथल्या घडलेल्या घटनांचा पाठपुरावा करतो आणि तु ही जराशी तशीच आहे तर मला मदत करशील?” दिपांशुने विचारल
“हो नक्कीच सर मला कुठली वास्तु आहे समजेल का” विद्या विचारते
“महाराज कुमार सेतुंच राज्य माधवगड ते जंगल आणि शापित दरवाजा.” दिपांशुने सांगितल
दिपांशुच बोलण ऐकताच विद्याचे डोळे चमकले जस काही ती याच संधीची वाट पहात होती. इतरांसारख तीला ही ते जंगल खेचत होत जणु काही तीने त्यासाठीच पुरातत्व खात्याच्या डिग्रीचा अभ्यास सुरु केला होता. ती दिपांशुला म्हणाली.
“खर तर सर हे माझ पण स्वप्न होत मी यायला तयार आहे तुमच्या बरोबर.” विद्या आनंदाने सांगते
“ग्रेट, मग आपण उद्याच माधवगडकडे निघुत.” दिपांशु म्हणतो
“सर, राग येणार नसेल तर एक सांगु का?” विद्या विचारते.
“हो, हो बोल की आता मला तुझ्याच मदतीची जास्त गरज पडणार आहे.” हसुन दिपांशु म्हणाला
“खर तर माधवगडला मला ही जावस वाटत होतच पण आपण थोडी घाई करत आहोत अस मला वाटत आहे ती जागा ईतकी भयानक आणि रहस्यमय आहे की अस कुठली ही माहीती न घेता जाण मला जरा रिस्की वाटत आहे.” विद्याने समजावल
“अग, मग माहिती गोळा कर ही जबाबदारी तुझ्यावर चालेच.?” फाइल्सवर सही करत दिपांशुने विचारल
“हो चालेल सर मी माहीती गोळा करुन त्याचा एक रिपोर्ट बनवते आणि तुम्हाला देते. येऊ सर मी” विद्याने विचारल
“हो, बर मला एक सांग तुझ्या ओळखीत कुणी आहे का अजुन जे आपल्याला यात मदत करु शकेल.?” दिपांशुने विचारल
“हो सर, आहेत की माझे क्लासटीचर प्रोफेसर अग्नीहोत्री. अग्नीहोत्री सरांना कायमच आवड राहीलेली आहे रहस्य शोधण्याची ते आपल्याला नक्कीच मदत करु शकतील मी सरांना विचारुन बघते आणि कळवते तुम्हाला तस ओके. चला मी निघते आता.” विद्या सांगते.
“हो चालेल लवकरच भेटुत आपण बाय.” दिपांशु म्हणतो
आणि लगेच आपल काम करायला विद्या निघुन जाते.
काही वेळा नंतर...
वेळ रात्रीची...
विद्या घरी पोहोचते. आज विद्या खुप खुश होती कारण विद्याच स्वप्न आज पुर्ण होणार होत खर तर विद्याला आई वडिल नव्हते तीला तीच्या भावानी आणि वहिनी ने सांभाळल होत आणि तीच्या आई वडिलांच तीच्या आयुष्यातुन जाण हे ही एक रहस्यच होत आणि म्हणूनच तीने हे क्षेत्र निवडल होत.
तीचा समज होता आपले आई वडिल अश्या ठीकाणी अडकले आहेत जीथे दुर दुर कुठे ही मानव वस्ती नाहीये सगळीकडे फक्त जंगल आहे आणि त्या जंगलातुन तीला आवाज देत आहेत. पण हेच जंगल का? हा मात्र मोठा प्रश्न होता.
तीला रोज एक स्वप्न पडत होत. ती स्वप्नात बघते.
‘एक घनदाट जंगल रात्र झालेली आणि त्या घनदाट जंगलातुन दोन व्यक्ती सुसाट पळत आहेत एक सारख एकाच दिशेला. पळता पळता ती व्यक्ती भीतीच्या आकांताने मागे वळुन बघतात तोच त्यांना काही मांत्रीकाच्या वेशात असलेली लोक त्यांच्या मागे लागलेली दिसतात आणि त्यांना बघुन ते आपला जीव मुठीत धरुन पळत असतात. त्यांच्या तोंडात एकच नाव असत ‘विद्द्या आम्हाला वाचव.’’
विद्द्याला आपल ते स्वप्न आठवत आणि ती मनात विचार करते.
“आई बाब, येतीये मी आता आपला संघर्ष संपला काळजी करु नका तुम्हाला सोडवायला आता तुमची ही शुरवीर मुलगी येतीये आपण लवकरच भेटुत.” मनात विचार करत विद्द्या म्हणते.
आणि तोंडावर पाणी मारुन फ्रेश होते. तोच तीला शर्वरीने आवाज दिला.
“विद्द्या, आवर ग किती उशीर चहा ठेवलाय तुझा आणून घे.” चहा टेबलावर ठेवत शर्वरी बोलते.
“आले वहिनी बस दोन मिनीट.” आवरता आवरता विद्द्या म्हणाली
काही वेळा नंतर...
लगेच आपल आवरुन हॉलमध्ये आली. व तिघही चहा घेउ लागले.
“विद्द्या, तुझा अभ्यास कसा सुरु आहे माहित आहे न काही झाल तरी डिग्री मिळवायची आहे.” चहा घेत रजतने विचारल
“हो दादा, मला चांगलच माहित आहे आणि तु काळजी करु नकोस मी नक्की पास होउन दाखवेन मला जाणीव आहे.” चहा घेत विद्द्याने समजावल
क्रमशः...
तर शापित दरवाज्याच रहस्य शोधायला निघालेल्या चौघांपैकी दोन तर मिळाले आता त्यांच्या मध्ये अजुन दोघ कोण शामील होतात काय संबंध आहे त्यांचा त्या जंगलाशी बघुत पुढील भागात
