ती चौघ एकाच दिशेने चालत होती. आत आत आजुबाजुच्या भयाण जंगलाला पार करत कुणी मागे तर कुणी पुढे बस चालत होती भयाण अंधार डेरेदार वृक्षांनी अछादलेले संपुर्ण जंगल आणि त्या जंगलात फक्त ती चौघ हातात बॅट-या घेउन जंगलात फिरत होती. कसला तरी त्यांचा शोध सुरु होता पण कसला अस नेमक काय होत त्या जंगलात जे त्या तरुणांना खेचत होत. आणि काय रहस्य होत त्या जंगलाच.

अस म्हणल जात ते जंगल पुर्वी एक महान योध्दाच सुंदर राज्य होत सुख समृध्दीने भरलेल. तो राजा आपल्या प्रजेची खुप काळजी घेत असे त्याचा एक नीयम होता रात्री सगळे निवांत झोपले की तो आपल्या राज्याची पाहणी करायला बाहेर पडायचा. आणि जीथे त्याला वाटे आपल्या मदतीची गरज आहे तीथे एक राजा बनुन तो आपल्या प्रजेची मदत करत असे.

त्या राज्याची प्रजा कायम विचारात पडलेली असायची त्यांना आश्चर्य वाटायच आणि समाधान ही वाटायच की, आपल्याला एक असा राजा मिळाला आहे ज्याला कुठली ही गोष्ट आपल्याला सांगण्याची गरजच पडत नाही आपले महाराज आपण काही बोलण्या आधीच आपले प्रश्न, आपल्या समस्या सोडवुन टाकतात आणि ही आमच्या साठी एक भाग्याची गोष्ट आहे.

पण हा विर योध्दा कोण नेमकी त्याची काय कहाणी आहे. आणि ते जंगल जर एक सुंदर राज्य होत तर मग त्या राज्याच जंगलात कस रुपांतर झाल. ते तरुण कोण होते आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे त्या दरवाज्याच काय रहस्य होत.

शापित दरवाजा – एक पाऊल गुढ आवाज्याच्या दिशेने

२५ हजार वर्षां पुर्वी...

“महाराज, तुम्ही दिलेला आदेश मी पाळलेला आहे. मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे त्या नराधमाला घेउन आलो आहे बस आज्ञा करा त्याच्या शिक्षेची.” मुजरा करुन विरभद्रने सांगितल.

“विरभद्र, मला कल्पना होतीच मी तुला काही काम दिलय आणि ते पुर्ण होणार नाही अस कधीच होणार नाही तु माझा खरा सेवक आहेस शाब्बास.” महाराज कुमार सेतुने आपल्या गळ्यातला हार देत सांगितल.

महाराजां कडुन मिळालेले बक्षीस बघुन विरभद्र मनोमन सुखावला व आभार मानुन कक्षेतुन निघुन गेला.

दुस-या दिवशी राजदरबारात....

माधवगडचा राजदरबार लोकांनी खचाखच भरला होता अगदी उभ रहायला देखील जागा नव्हती कारणच तस होत महाराज कुमार सेतु आज खुप मोठा निर्णय ऐकवणार होते तसेच त्या नराधमाला शिक्षाही करणार होते. महाराज कुमार सेतुंची निर्णय देण्याची पध्दत ही वेगळी असायची त्यामुळे लोकांमध्दे कायम उत्सुकता असायची आज दरबारात काय होणार आणि तसच आजही होत.

प्रत्येकाच्या मनात सुरु होत त्या नराधमाला काय शिक्षा होणार महाराज आज काय निर्णय घेणार. आणि प्रत्येकाच्या चेह-यावर कुतूहल दिसत असतानाच महाराज कुमार सेतु राजदरबारात हजर झाले आणि लगेच राजदरबाराच्या कामकाजाला सुरवात झाली.

“महामंत्री विश्वजीत, आजचा दरबार सुरु करा.” महाराज कुमार सेतु यांनी महामंत्रीला आदेश दिला.

तोच दरबार सुरु झाला.

“महाराजांचा आदेश आहे, आज ते तुमच्या समस्या आधी घेतील नंतर मोठे निर्णय घेतील तेव्हा तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या अगदी निश्चींत होउन सांगा.” महामंत्री विश्वजीतने प्रजेला सांगितल.

“महाराज मला थोड बोलायच आहे.” धोंडीराम परवानगी घेत म्हणाला.

“अर्थात, बोला काय समस्या आहे आपली?” महाराज कुमार सेतु

“महाराज, मी एक गरीब शेतकरी आहे छोट्याश्या जमीनीच्या तुकड्यातुन पीक काढतो. पण काही दिवसा पासुन जमीन ओशाड पडल्या सारखी झाली आहे आमच्या कडे तेवढा एकच जमीनीचा तुकडा आहे महाराज आणि खाणारी तोंड जास्त. यातुन आता तुम्हीच मार्ग काढु शकता.” हात जोडुन धोंडीरामने आपली व्यथा सांगितली.

“शांत व्हा धोंडीराम, मला सांगा तुमची जमीन कोणत्या दिशेला आहे.” महाराज कुमार सेतु

“महाराज माझी जमीन उत्तर दिशेला आहे. अगदी या रामदिनच्या जमीनीला लागुन” धोंडीराम

“महामंत्री विश्वजीत आपल्या राजमहालाच्या नावावर ज्या जमीनी आहेत त्या जमीनींपैकी एक जमीनीचा तुकडा धोंडीरामना देण्याची व्यवस्था करा.” कुमार सेतु

“हो महाराज लगेच.” महामंत्री विश्वजीत

लगेच महामंत्रीने महाराजांच्या आदेशाचे पालन केले आणि धोंडीरामला जमीनीचा तुकडा आणुन दिला.

“धोंडीराम आता काळजी करु नका छान सुखाने शेती करा आणि आपल्या मुला बाळांचे पोट भरा.” महाराज कुमार सेतु

“धन्यवाद महाराज, आपली कृपा आहे.” हात जोडुन धोंडीराम म्हणाला.

आणि परत आपल्या जागेवर जाउन थांबला.

क्रमशा...

एक भयाण जंगल एक शापित दरवाजा काय आहे याच रहस्य बघुत पुढील भागात

टिपः

ही एक काल्पनीक कथा असुन याचा कुठल्याही जीवीत अथवा मृत व्यक्तीशी कसलाही संबंध नाही तरी संबंध आलाच तर तो एक निव्वळ योगायोग समजावा.