“चला आता कुणाची समस्या आहे? या पुढे” महामंत्री विश्वजीतने विचारल.

“महाराज मला एक तक्रार करायची आहे.” पार्वती बाई पुढे होउन म्हणाल्या

“महाराज गेल्या काही दिवसा पासुन सावकार रोज घरी येउन त्रास देत आहे आम्हाला काहीच कळत नाही काय कराव.” काळजीने पार्वती बाईंनी आपली तक्रार मांडली

“तुम्ही चिंता करु नका आम्ही सावकारावर योग्य ती कारवाई करु.” आश्वासन देत महाराज म्हणाले

“तुमचे उपकार होतील महाराज.” हात जोडुन पार्वती बाई म्हणाल्या.

आणि लगेच मागे सरकल्या.

“अजुन कुणी आहे का, ज्यांची काही तक्रार आहे किंवा कुठली समस्या आहे अस? त्यांनी पुढे याव.” महामंत्री विश्वजीतने विचारल.

काही वेळा नंतर...

बराच वेळ झाला पण कुणीच समोर आल नाही तेव्हा मात्र महाराजांनी नराधमाला शिक्षा देण्याच ठरवल आणि बोलायला सुरवात केली.

“मला आनंद वाटत आहे तुम्ही सगळे ईथे जमला आहात मी हे या करता म्हणत आहे कारण, आज मी या नराधमाला शिक्षा सुनावणार आहे आणि हे ईथे जमलेल्या प्रत्येकानी बघायच आहे अस मला वाटत कारण भविष्यात जर कुणी असा गुन्हा केला तर त्यांना आजची शिक्षा लक्षात राहील आणि तो कधी ही कुठला ही गुन्हा करणार नाही.” महाराजांनी सांगितल

“पण महाराज या नराधमाचा गुन्हा काय आहे आणि तुम्ही याला कुठली शिक्षा सुनावणार आहात?” एकाने लगेच प्रश्न केला

“तुम्ही हा खुपच चांगला प्रश्न केलात आणि मला याच उत्तर द्यायला नक्कीच आवडेल. हा एक तंत्र मंत्र करणारा साधक आहे गेल्या काही महिन्या पासुन मी या मांत्रीकाच्या शोधात होतो आणि शेवटी हा गुन्हेगार मला सापडलाच. ह्या मांत्रीकाला बळी देउन आपली शक्ती वाढवायची होती आणि तसेच याचे प्रयत्न ही सुरु होते जेव्हा हे आम्हाला समजल तेव्हा आम्ही याचा शोध घेउ लागलो आणि शोध घेता घेता आम्ही एका निर्जन ठिकाणी पोहोचलो तीथे याची साधना सुरु होती त्याच वेळी आम्ही याला आपल्या सैनिकांकरवी घेउन आलो. याने आजपर्यंत ब-याच जणांचे बळी दिले आहेत म्हणून मी या नराधमाला त्याच्याच झोपडीत जिवंत जाळण्याची शिक्षा सुनावत आहे.” महाराज कुमारसेतु म्हणाले

लगेच महामंत्री विश्वजीतनी मांत्रीकाच्या शिक्षेची तयारी केली. मांत्रीकाला बेड्या घालुन राजदरबारात आणण्यात आल तोच मांत्रीक सिध्दनाथ बोलला.

“हे तुम्ही बरोबर करत नाहीये महाराज याचे परिणाम वाइट होतील मी सिध्दनाथ या संपुर्ण राज्याला शाप देतो हे राज्य एका जंगलात परिवर्तीत होईल आणि ईथली प्रजेचे दगड होतील आज माझ धेय अपुर्ण राहिल्याने जसा मी तीळ तीळ मरत आहे तसच महाराज तुम्ही आणि ही प्रजा ही आपल्या आयुष्यासाठी तीळ तीळ मरतील पण काही उपयोग होणार नाही हा माझा सगळ्याना शाप आहे.” सुटण्याचा प्रयत्न करत सिध्दनाथ म्हणाला.

तोच सैनिक त्याला पकडुन घेउन गेले. त्याच्या झोपडीत त्याला जीवंत जाळण्याची सगळी तयारी केलेली होती.

काही वेळा नंतर...

सैनिक मांत्रीकाला झोपडी जवळ घेउन आले तीथे सगळे राज्य त्याला शिक्षा होताना बघण्यासाठी जमल होत. राजा कुमारसेतु ही आपल्या कुटूंबा सहीत आले होते आणि तोच ती घटीका आली झोपडी जवळच्या झाडाला मांत्रीकाला बांधल गेल आणि काही क्षणातच झाडाला आग लावली गेली.

एका क्षणात होत्याच नव्हत झाल. झाडाने पेट घ्यायला सुरवात केली पळु पळु त्या आगीत झाड पेटु लागल जस झाड पेटायला लागल तस तो मांत्रीक देखील पेटायला लागला आणि तोच त्याच्या किंचाळ्यांनी पुर्ण आसमंत भरुन निघाला.

प्रत्येक जण त्याच्या कडे भेदरलेल्या नजरेने बघत होते. समोर आग पेटलेली होती आणि त्या आगीत पेटत होता सिध्दनाथ.

काही वेळा नंतर...

हळु हळु आग शांत होत गेली आणि त्या आगीत भस्मसाद झालेला सिध्दनाथ ही शांत होत होता पण त्यानी दिलेल्या शापाच काय? तो फळाला येणार होता? नक्कीच सिध्द मांत्रीकच होता तो मग कस त्याचा शाप पुर्णत्वास जाणार नाही.

जस ईकडे त्याने अखेरचा श्वास घेतला तस त्या शापाने आपला रंग दाखवायला सुरवात केली.

काही क्षणा नंतर...

आगीची झळ शांत झाली होती आणि त्याच बरोबर शांत झाला होता सिध्दनाथचा किंचाळण्याचा भयंकर आवाज. जस सगळ शांत झाल तीथे भयंकर अंधकार पसरला झाडांची पालवी वाळुन निर्भीड अरण्यात रुपांतरीत झाली आणि राजा कुमारसेतु सहीत सगळी प्रजा त्या जंगलातले दगड बनले तो सुंदर राजवाडा एका छीन्न विहीन्न वास्तु मध्ये रुपांतरीत झाला.

आणि हे सगळ झाल काही क्षणाच्या अवधित. सिध्दनाथचा शाप खरा ठरला आणि एक सुंदर राज्य नस्तीनाभुत झाल. त्या आगीच्या झळी बरोबर...

२५ हजार वर्षां नंतर...

वर्तमान काळात...

शास्त्री निवास...

“दिपांशु सर, मे आय कमीन?” दारा आडुन हळुच विद्याने विचारल

“ओह, यस यस ये मी तुझीच वाट पहात होतो विद्या माझ तुझ्या कडे एक काम आहे.” हातातली फाईल ठेवत दिपांशु म्हणाला.

त्याच बोलण ऐकुन लगेच विद्या खोलीत आली.

क्रमशः

कोण आहे ही विद्या आणि हा दिपांशु कोण आहे बघु पुढील भागात.