पुन्हा पुन्हा नव्याने भेटशील का
प्रेमाने मज साद घालशील का
मीही देईन तुला साथ प्रीतीची
तु ही आपली प्रित जपशील का
तुझ्या विना मज लागे सर्व सुने सुने
तु असतेस जवळ तेव्हा तुझाच छंद लागे
आपल्यातला हा दुरावा दूर करशील का
मला ही तु साथ देशील का
पुन्हा नव्याने भेटशील का
