पुर्वसूत्र:
"ठिक आहे मला ही खूप छान वाटल तुझ्याशी बोलून आणि थँक यु सो मच आज तुझ्या मुळे आमच्या सगळ्यात जवळच्या मित्राला भेटूत आम्ही सगळे चल बाय संध्याकाळी भेटूत." खुशीने शार्दूल ही म्हणतो.
आणि दोघ फोन ठेऊन देतात.
आता पुढे...
"राधा ताई आणि सतीश दादा तर आपापल काम करण्यात मग्न आहेत आणि दुपार ही व्हायला अजून वेळ आहे तर मी जगदीश सरांना भेटून येऊ का?" मृण्मयी मनाशीच विचार करते.
आणि राधा ताईंना तस कळवते.
"ताई मी जरा बाहेर जाऊन येते तुम्ही अर्णव कडे लक्ष ठेवाल का मी थोड्या वेळात जाऊन येईन." मृण्मयी सांगते.
"बेटा हे नवीन शहर आहे तु एकटी? बघ बाई." राधा ताई काळजीने विचारतात.
"ताई मी नव्या युगातली मुलगी आहे तुम्ही न जरा जास्तच काळजी करता टेन्शन घेऊ नका मी थोड्या वेळातच येते. तसही माझ एक पर्सनल काम सुद्धा आहे आज रोज डे आहे न तर अर्णव साठी गिफ्ट घेऊन यायचं आहे ते ही घेऊन येईन फक्त त्याला सांगु नका हं." मृण्मयी सांगते.
इकडे अर्णव सगळ बोलण ऐकत असतो. तोच राधा ताई म्हणतात.
"बर बाई मीच विसरून गेले होते तु झाशीची राणीच न ठिक आहे जाऊन ये फक्त जाताना अर्णव साहेबाना सांगून जा म्हणजे त्यांना काळजी वाटणार नाही." राधा ताई
"हो ताई त्याला न सांगता कशी जाईल मी त्याला भेटून येते." स्मित हास्य करत मृण्मयी सांगते.
दोघींचं बोलण अर्णव वरून ऐकत असतो. तोच त्याच्या मनात येत आणि तो आपल्या मनाशीच पुटपुटतो.
"आज रोज डे आहे? म्हणजे आपल प्रेम किंवा मैत्री च नात व्यक्त करण्याचा दिवस मी ही मृण्मयी साठी काही तरी करतो." अर्णव मनाशीच पक्क करतो.
आणि तीला आलेलं बघताच तो आपल्या खोलीत निघून जातो.
काही वेळा नंतर...
मृण्मयी अर्णव च्या खोलीत येते आणि अर्णवला सांगते.
"अर्णव, हाय मी जरा बाहेर जाऊन येतीये थोड्या वेळात परत येईल चालेल न." मृण्मयी सांगते.
त्यावेळी अर्णव एकटाच आपल्या गिटारला न्याहाळत बसलेला असतो तोच तिचा आवाज ऐकताच भानावर येत म्हणतो.
"अग तु मला अंगणात घेऊन जाणार होतीस न आणि आता तुच बाहेर निघालीस." अर्णव विचारतो.
"अरे तस नाही थोड पर्सनल काम होत माझ म्हणून जाऊन येत आहे मी पण काळजी करू नकोस मी घरी आले की अंगणात बसू थोड्या वेळ. हं बर येऊ का जाऊन." मृण्मयी विचारते.
अर्णवला मनातून जरा हसू येत आणि त्याच चेष्टेतून तो तीला म्हणतो.
"ठिक आहे मग आता मी काय सांगणार न आम्हाला सगळे असच वागवतात मग काय करणार." चेष्टेनी अर्णव म्हणतो.
त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य असत आणि हे मृण्मयी ला लगेच समजतं तीला जाणवत अर्णव आता जून विसरत चालला आहे आणि त्याचा खेळकर स्वभाव परत येतोय.
ती ही लगेच त्याला विचारते.
"तु बरा आहेस न? काय झालय तुला." मृण्मयी
अर्णव ला लगेच जाणवत मृण्मयी ला आपल्यातला बदल जाणवत आहे तो लगेच भानावर येत म्हणतो.
"काही नाही मला काय होणार? ठिक आहे मी तुला वेळ नाही होत आहे वाटत आता. जाऊन ये आणि सांभाळून जरा." अर्णव म्हणतो.
ती जरा वेगळ्या नजरेने बघते आणि म्हणते.
"ठिक आहे, येते मी." मृण्मयी
मृण्मयी अर्णवला सांगून बाहेर पडते.
साधारणतः तासा भरानी...
मृण्मयी ला ऍडव्होकेट जगदीशनी आपल्या ऑफिसचा ऍड्रेस दिलेला असतो ती त्या पत्त्यावर पोहोचते.
"मे आय कमीन सर?" दारात उभ राहून मृण्मयी विचारते.
ऍडव्होकेट जगदीश आपल्याच कामात व्यस्त असतात तोच भानावर येत म्हणतात.
"यस, कमीन कोण तु?" ऍडव्होकेट जगदीश.
"सर मी मृण्मयी काही वेळा पूर्वी तुमच्याशी फोन वर बोलण झाल होत तीच मी." मृण्मयी
"ओह यस यस बैस तुला मैत्रीणी कडून नंबर मिळाला अस म्हणाली होतीस तु बरोबर? काय काम होत माझ्या कडे?" ऍडव्होकेट जगदीश
"सॉरी सर, मी तुमच्याशी खोट बोलले खर तर मला तुमचा नंबर संपत सरांच्या एका डायरीत मिळाला आणि मला जरा तुमच्याशी महत्वाच बोलायचं देखील होत." मृण्मयी सांगते
"काय तु खोट बोललीस माझ्याशी पण का?" थोडस रागात येऊन ऍडव्होकेट विचारतात.
"सर मी जर खर सांगितल असत तर कदाचित तुम्ही भेटायला नकार दिला असता म्हणून मला तस सांगावं लागलं. मला एक सांगा आज तुम्ही तुमचे फ्रेंड मिस्टर. रघुवीर कुलकर्णी यांची प्रॉपर्टी जी त्यांचा मुलगा अर्णव कुलकर्णी यांच्या नावावर आहे ती सांभाळत आहात हो न मग त्याच मुलाच्या बाबतीत काय काय घडत आहे तो कसा आहे या बद्दल तुम्हाला कधीच प्रश्न नाही पडले सॉरी तुम्ही वकील आहात तरी मी तुम्हाला हे प्रश्न करतीये." मृण्मयी आश्चर्याने विचारते.
हे ऐकताच ऍडव्होकेट जगदीश जरा संभ्रमात पडतात. काही क्षण त्यांना आपण काय बोलाव तेच समजत नाही. खर तर संपत बरोबर यात त्यांचा ही काही तरी हात होता अस न्हवत तर सगळी परिस्थितीच संपतनी अशी काही बनवून ठेवली होती की ऍडव्होकेट जगदीश यांच्या मनात देखील कधी हा प्रश्न उभा राहिला नव्हता.
ज्या ज्या वेळी पैश्याचा प्रश्न येऊन उभा राहिला की वकिलांना सांगितल जायचं. "अर्णव कामात आहे त्यामुळे त्यानी हा चेक सही करून पाठवला आहे." त्यामुळे वकिलांना त्यात खोट कधी दिसलीच नाही.
आणि ज्या ज्या वेळी संपतला पैशाची गरज पडली ते त्या त्या वेळी त्याला पैसे देत गेले. पण जेव्हा मृण्मयीनीच हा प्रश्न त्यांच्या समोर उभा केला तेव्हा मात्र त्यांच्या मनात शंकेची पाल पुटपुटली.
आणि ते मृण्मयी ला म्हणाले.
"बेटा तु काय विचारत आहेस मला कळत नाहीये तु मला समजेल अस जरा सांगशील का आणि सगळ्यात महत्वाच मी रघुवीरच्या प्रॉपर्टी च काम बघतो हे तुला कस माहित?" ऍडव्होकेट विचारतात.
"सांगते सांगते सगळ सांगते. मी मृण्मयी जोशी मी अर्णव सरांची पेंगेस्ट आहे मी एक लेखिका आणि मोटिवेशनल कोचं आहे ज्या दिवशी मी कृष्णाई बंगल्यात शिफ्ट झाले मी पहिल्यांदा एका फोटोत अर्णव सरांना बघितल होत. पण जेव्हा मला राधा ताईंकडून अर्णव सरांबद्दल समजल मी शॉक झाले त्यांनीच मला प्रॉपर्टी बद्दल आणि तुमच्या बद्दल सांगितल. सर गेल्या ३० वर्षा पासून अर्णव सरांवर रेप होतोय. आणि ते कॉलेज संपल्या पासून व्हील चेअरवर आहेत. आता तुम्ही सांगा जी व्यक्ती व्हील चेअर वर आहे ती व्यक्ती कामात कशी व्यस्त असेल? अर्णव सर खूप खचून गेले आहेत त्यांना मदत करणार तीथे कुणीच नाहीये राधा ताई आहेत त्यांच्याशी त्यांच चांगल जमत आणि आता मी आल्या नंतर मात्र ते थोडस बदलले आहेत मोकळे पणाने बोलायचा प्रयत्न करत आहेत. खर तर सर या सगळ्याला संपत सर जबाबदार आहेत. संपत सर त्यांच्या मित्रांना बंगल्यावर घेऊन यायचे आणि अर्णव सरांवर रेप करत वासनेची मजा घ्यायचे ते जस काही सरांच्या हातातलं खेळण बनले होते. ज्या वेळी ते कॉलेजला होते तेव्हा त्यांच आयुष्य खूप चांगल होत कॉलेज मध्ये असायचे त्यामुळे कुणी काही करू शकत नव्हत पण घरी आल्यावर मात्र तोच त्रास परत सुरु व्हायचा पण ज्या वेळेस ते पंधरा दिवसा साठी बाहेर जायचे त्यावेळेस मात्र अर्णव सर खूप खुश असायचे आणि जेव्हा संपत सर आल्यावर मात्र परत तेच सगळ." मृण्मयी अगदी पोट तिडकीने सांगत होती.
आणि ऍडव्होकेट सुन्न होऊन सगळ ऐकत असतात. त्यांना आपण काय बोलाव तेच कळत नाही. आणि त्याच परिस्थितीत ते मृण्मयीला विचारतात.
"मला अजून ही विश्वास बसत नाहीये मला तर यातल काहीच माहित नव्हत पण कदाचित तुला जे वाटत आहे तो तुझा भ्रम देखील असू शकतो न." आश्चर्याने ऍडव्होकेट विचारतात.
"सर भ्रम असता तर चांगल झाल असत पण मी त्या घरात राहतीये मी अर्णव सरांची परिस्थिती आपल्या डोळ्याने बघितलीये आज ही कुठल्याही नवीन माणसाला बघितल्या वर ते घाबरतात ज्या दिवशी पहिल्यांदा मी त्यांना भेटले होते त्यांनी मला मारायला चाकू काढला होता आणि हे सगळ मी या करता तुमच्या कानावर घालत नाहीये की मला कुठली तक्रार करायची आहे. तर यासाठी मी तुमच्या कानावर घालतीये कारण त्या घरातली परिस्थिती खूप वेगळी आहे आणि हे तुम्हाला समजायला हव कारण रघुवीर सरांनी अर्णव च्या प्रॉपर्टी ची जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे आणि मी त्या घरात राहाते त्यामुळे मला माझ हे कर्तव्य वाटत. जगदीश सर एक सांगु का अर्णव सर जो पर्यंत स्वतः खंबीरपणे आपल्या पायावर उभे रहात नाही तोपर्यंत आता आपल्यालाच त्यांची काळजी घ्यावी लागेल कारण इथे त्यांची जवळची म्हणण्यासारखी खूप कमी माणसं आहेत त्यातही राधा ताईंच वय झालय आणि सतीश दादांचं सुद्धा त्यातून ही राधा ताईंचा मुलगा संपत सरांच्या कबज्यात आहे त्यामुळे मनात असून देखील त्या काहीच करू शकत नाही. म्हणून शेवटी आज मी आले तुमच्या पर्यंत हे सगळ सांगायला मला अर्णव सरांची मदत करायची आहे पण त्या आधी ते स्वतः खंबीर झाले पाहिजेत जे त्यांच्या आयुष्यात घडलय त्यातून बाहेर पडले पाहिजेत मगच आपण काही पाऊल उचलू शकतो." मृण्मयी
"हं ठिक आहे तु जे सांगितल ते एक वेळ मी मान्य करतो पण अजून ही माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झालेला आहेच आणि तो म्हणजे तुला त्याची मदत का करावीशी वाटत आहे." ऍडव्होकेट
"माणुसकी सर, आज मी त्या घरात रहात आहे त्या बंगल्यानी मला त्या क्षणाला आसरा दिला ज्या क्षणी मला असऱ्याची सगळ्यात जास्त गरज होती. आणि मी प्रत्यक्ष अर्णव सरांच्या मनातल्या भीतीचा अनुभव घेतलाय मग मी त्यांना त्या परिस्थिती मध्ये कस ठेऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी त्यांना मदत करायचं ठरवल होत तेव्हा ते नात फक्त माणुसकी च होत पण आता आम्ही फ्रेंड्स देखील आहोत आणि म्हणून मी मदत करतीये." मृण्मयी
"ठिक आहे बेटा कळल मला तु काळजी करू नकोस मी आता बघतो काय करता येईल ते." ऍडव्होकेट
"अरे नाही सर हे बघा मी याच करता तुमच्याकडे आलीये मला एक सांगायचय तुम्हाला तुम्ही संपत सरांशी बोलायला जाल तर सगळ्यांचाच जीव धोक्यात येईल त्यामुळे तुम्हाला अस काही तरी कराव लागेल जेणेकरून कुणाचा जीव धोक्यात जाणार नाही आणि प्रॉपर्टी सुद्धा अर्णव च्याच नावावर राहील आता ते तुम्ही कस करता ते तुम्ही बघा. आणि मला रघुवीर सरांचा ऍड्रेस हवा होता तुम्हाला माहित आहे का ते कुठे राहतात ते." मृण्मयी
"नाही बेटा मी शोधून ठेवतो तुझा नंबर तर आहेच माझ्याकडे मी कळवीन तुला." ऍडव्होकेट
"बर खूप छान वाटल तुम्हाला भेटून काका बस आता प्रॉपर्टी ची जबाबदारी तुमच्यावरच आहे येते मी." मृण्मयी सांगते.
आणि निघून जाते.
क्रमशः...
काय मृण्मयी ने ऍडव्होकेट जगदीशना सगळ सांगितल? मग आता पुढे काय होणार? ऍडव्होकेट कस करतील अर्णव ची मदत आणि पार्टीचं काय ती कशी होईल आणि अर्णवच सरप्राईज आणि मृण्मयी च सरप्राईज काय होणार पुढे बघुत पुढील भागात.
