पूर्वसूत्र:
"दुपारी काही तरी लाईटच करा पण दुपारचं सुद्धा अर्णवला डोळ्यासमोर ठेऊन करा आजचा पूर्ण दिवस त्याचा असेल." मृण्मयी
"ठिक आहे." राधा ताई म्हणतात.
आणि दोघ ही आपापल्या कामाला लागतात.
आता पुढे...
सतीश दादा लगेच हॉल मध्ये येऊन ड्रॉवर मध्ये डायरी शोधू लागतात.
"कुठे गेली डायरी मी इथेच तर ठेवली होती." मनाशीच पुटपुटत सतीश दादा म्हणतात.
काही वेळा नंतर...
"हं घ्या. 'काखेत कळसा अन गावाला वळसा' अस झाल डायरी समोर होती अन मी सगळ ड्रॉवर शोधून पालथ घातल." हसून मनाशीच सतीश दादा म्हणतात.
आणि लगेच मृण्मयी ला डायरी आणून देतात.
"ताई हे घ्या सापडली डायरी." सतीश दादा
"अरे वा डायरी सापडली. गुड बर त्याच नाव काय आहे." आनंदून मृण्मयी विचारते.
"शार्दूल. अर्णव साहेबांचा एकदम खास मित्र." सतीश दादा.
"खूप छान बर मी करते कॉल त्याला तुम्ही जरा कॅमेऱ्याच बघा परत आणि हो आपल्याला थोड घर ही आवराव लागेल हं. आणि राधा ताई तुम्ही दुपारच जेवणाचं बघा तेवढ." मृण्मयी दोघांना ही आपापली काम समजावते.
"ठिक आहे ताई मी लगेच कामाला लागतो तुम्ही काळजी करू नका." सतीश दादा म्हणतात
"हो आणि मी सुद्धा दुपारचं जेवणाचं बघते." लगेच राधा ताई देखील सांगतात.
आणि तिघ ही आपापल्या कामाला लागतात.
मृण्मयी डायरी चेक करत शार्दूलचा नंबर शोधू लागते. तेवढ्यात तीला अडव्होकेट जगदीश कारखानीस चा नंबर दिसतो आणि तिच्या मनात येत.
"करून बघावा का कॉल? ठिक आहे करूच." मृण्मयी मनात म्हणते.
आणि लगेच ऍडव्होकेट जगदीशना कॉल करते.
ऍडव्होकेट जगदीश त्यावेळी कामात व्यस्त असतात तोच फोन ची रिंग वाजते.
ट्रिंग... ट्रिंग...
ट्रिंग... ट्रिंग...
ऍडव्होकेट लगेच भानावर येतात आणि फोन उचलतात.
"हॅलो, कोण बोलतय?" ऍडव्होकेट जगदीश.
"नमस्ते सर, मी मृण्मयी बोलत आहे मला जरा तुम्हाला भेटायचं होत भेटता येईल का?" मृण्मयी
"कोण मृण्मयी? आपण या आधी भेटलोय का एकमेकांना?" ऍडव्होकेट जगदीश काम करता करता विचारतात.
"नाही सर आपण कधी भेटलो नाहीये पण माझ एक काम होत तुमच्या कडे मला हा नंबर एका मैत्रीणी कडून मिळाला." मृण्मयी सांगते.
"ठिक आहे, ये मी आज फ्रीच आहे." ऍडव्होकेट जगदीश सांगतात.
आणि दोघ ही फोन ठेऊन देतात. लगेच मृण्मयी शार्दूल ला फोन लावते.
शार्दूल आपल्या ऑफिस मध्ये काम करत असतो तो फोन वाजतो आणि शार्दूल भानावर येतो व फोन उचलतो.
"हॅलो बोला कोण बोलत आहे?" काम करता करता शार्दूल विचारतो.
"हाय शार्दूल बोलत आहे का?" मृण्मयी
"यस मीच बोलत आहे आपण कोण?" शार्दूल
"हाय मी मृण्मयी मी पेंगेस्ट आहे अर्णव सरांच्या बंगल्याची. मी तुझा नंबर त्यांच्या डायरीतून घेतला आपण जरा बोलु शकतो का?" मृण्मयी
अर्णवच नाव ऐकून शार्दूल चाट पडतो आणि विचारतो.
"तु नेमक कुठल्या अर्णव बद्दल बोलत आहेस. आणि ते ही इतक्या वर्षा नंतर." शार्दूल
"तु ज्या अर्णव बद्दल विचार करत आहेस न त्याच अर्णव बद्दल मी बोलत आहे मला माहित आहे तुम्ही कॉलेज पासूनचे फ्रेंड्स आहात आणि खूप वर्षा पासून भेटले नाहीत पण आता तुमच्या सर्वांची त्यांना खूप गरज आहे म्हणूनच मला तुझी मदत हवीये." मृण्मयी
"म्हणजे अर्णव कुलकर्णी? रघुवीर सरांचा मुलगा? पण त्याला तर डांबून ठेवल होत न कॉलेज संपल्यावर तर त्याच्या काकांनी त्याला कुणालाच भेटू दिल नाही." आश्चर्याने शार्दूल विचारतो
"हो, तेच अर्णव सर पण मला एक समजतं नाही सगळे संपत सरांना इतक घाबरत का आहेत ते कुणी असुर नाहीयेत तुमच्या आमच्या सारखे माणूसच आहेत न. कुणाला ही संपत सरांन विरुद्ध जाऊन अर्णव सरांची मदत करावीशी वाटली नाही?" आश्चर्याने मृण्मयी विचारते.
"तुला त्याच्या काकांचा स्वभाव नीट माहित नाही ना म्हणून अस बोलत आहेस. मला सांग सध्या काका तिकडे आहेत का कधी आलीस तु राहायला.?" शार्दूल विचारतो.
"शार्दूल तु मला अस का विचारत आहेस हे मला माहित आहे. मला राधा ताईंनी सगळ सांगितल आहे आणि म्हणूनच मला यातून अर्णव सरांना बाहेर काढायचं आहे. खर तर आम्ही फ्रेंड्स बनलो आहोत आता आणि याच मैत्रीच्या नात्यातून मी प्रयत्न करत आहे आणि दोन दिवसच झाले आहेत मला इथ येऊन तरी देखील अर्णव मला चांगला रिस्पॉन्स देत आहे. खर तर न तो तुमच्या मैत्रीला आसूसलेला आहे रे मला काय वाटत माहितीये अर्णव च खचून जाण याला संपत काका जितके जबाबदार आहेत न तितकाच त्याचा एकटे पणा ही जबाबदार आहे आयुष्यात संकट आली न तरी ही माणूस खचून जात नाही पण संकटा बरोबर जर आयुष्यात एकटे पणा आला न की माणूस इतका खचून जातो की त्याला प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी विशासम आहे असच वाटत. म्हणूनच म्हणते तुमची सगळ्यांची जर का मला मदत झाली तर मला अजून सोप जाईल अर्णवला यातून बाहेर काढायला. तुला एक सांगते स्वतः अर्णव देखील मला साथ देतोय मनान उभारी धरायला सुरवात केलीये त्यानी मग आपण नको का त्याला मदत करायला." मृण्मयी समजावते
"खरय तुझ बोल मी काय करू शकतो तुझी मदत. खूप वर्ष झाली आहेत त्याला अस बघून आता बस. आता काही झाल तरी चालेल पण मागे वळून बघायचं नाही कसलाच विचार करायचा नाही बोल काय करू शकतो मी." उत्साहाने शार्दूल विचारतो.
"हे बघ अस नको बोलूस सगळ पॉझिटिव्हली होईल पण तु मदत करायला तयार झालास हेच खूप आहे माझ्या साठी. बर ऐक तुला आज वेळ आहे का?" मृण्मयी
"आज, हो आहे न का ग?" शार्दूल
"अरे, मी विचार करत होते. तसही आज रोज डे आहे तर संध्याकाळी तुझ्या पूर्ण ग्रुप ला बोलवावं इथे मी बाकींच्याचे नंबर्स शोधले पण नाही सापडले फक्त तुझा सापडला म्हणून तुला कॉल लावला मला आजच्या दिवशी अर्णव ला सरप्राईज द्यायचं आहे त्याचा हा आजचा दिवस मला आनंदाने भरून टाकायचा आहे तु फ्रेंड्स ना घेऊन येऊ शकशील का इकडे?" मृण्मयी विचारते
तिचा तो उत्साह बघून शार्दूल ला ही खूप बर वाटत आणि तो लगेच तयार होतो.
"ठिक आहे कर तु संध्याकाळची तयारी करीन मी तुला मदत मला तुझा उत्साह बघून खूप चांगल वाटतय माणुसकी वर विश्वास ठेवावासा वाटतोय. खूप सोसलय ग त्याने कॉलेज मध्ये असताना अक्षरशः रडायचा तो मग आम्हीच समजूत काढायचो त्याची खूप वाटायच त्याच्यासाठी करावस पण प्रत्येकाकडे तुझ्या सारखी हिम्मत नसते न मनात असून देखील काही करू शकत नव्हतो पण यावेळी मात्र मी तुला मदत नक्की करेन तु कर तयारी मी सगळ्यांना घेऊन येतो ओके." त्याच उत्साहाने शार्दूल देखील आश्वासन देतो.
"खरच थँक यु.. थँक यु सो मच आता बघ आजची पार्टी किती मस्त होते ते सगळे या पार्टीला आठवणीत ठेवतील बर चल खूप छान वाटल तुझ्याशी बोलून मी आता फोन ठेवते संध्याकाळी भेटू." मृण्मयी आनंदून म्हणते.
"ठिक आहे मला ही खूप छान वाटल तुझ्याशी बोलून आणि थँक यु सो मच आज तुझ्या मुळे आमच्या सगळ्यात जवळच्या मित्राला भेटूत आम्ही सगळे चल बाय संध्याकाळी भेटूत." खुशीने शार्दूल ही म्हणतो.
आणि दोघ फोन ठेऊन देतात.
क्रमशः...
तर मृण्मयीच शार्दूल शी आणि ऍडव्होकेट जगदीश यांच्याशी बोलण झाल. आता ऍडव्होकेट कडून मृण्मयी ला काय समजेल आणि त्यातून ती कसा मार्ग काढेल बघुत पुढील भागात
