पुर्वसूत्र :
"ठरल तर मग या पंधरा दिवसातले टास्क आपल्याला मिळाले आता तु बघ आपली चांगली सुरवात कशी होते ते. कस असत न अर्णव आपण कायम आपल्या आयुष्यातल्या चांगल्या घटनांकडे लक्ष देत गेलो न की आपोआप वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागतो. इतके वर्ष तुझ्या कडे चांगल्या गोष्टीच नव्हत्या विचार करायला आणि असल्या तरी तुला कुणी तस सांगितलच नाही की आपण कायम चांगल्या गोष्टींचा विचार करावा म्हणजे सगळ चांगल होत. म्हणून इतके वर्ष तु फक्त तुझ्या आयुष्यात नकारात्मकता बघत आला आहेस पण आता अस नाही होणार कारण तु वेगळ्या नजरेने आपल आयुष्य बघायच ठरवल आहेस आणि तुझ्याकडे चांगल्या गोष्टी देखील आहेत विचार करायला तेव्हा आता मागचं सगळ विसरून जायचं आणि फक्त तीन गोल्स म्हणजेच आपली स्वप्न डोळ्यासमोर ठेवायची ती म्हणजे आई बाबांना शोधणे, स्वछंदी आयुष्य जगणे, आणि एका सुंदर पुस्तकाची रचना करणे. कळालं आणि यात पूर्णपणे मी तुला लागेल ती मदत करेल." अर्णव च्या हातावर हात ठेऊन मृण्मयी सांगते.
आता पुढे...
"काय तुला कॉलेजमध्ये असताना तुझ पुस्तक लिहायचं होत? मग लिहीलं का नाहीस काय होत टॉपिक तुझ." उत्साहाने मृण्मयी विचारते.
"थांब थांब मृण्मयी इतकी उत्साही नको होऊस. माझी काय परिस्थिती आहे माहित आहे न तुला कॉलेज मध्ये होतो तेव्हा मी ही तुझ्यासारखाच होतो पण फक्त पंधरा दिवसच त्यातही रात्र झाली की परत तेच सगळ तोच त्रास भीती वाटायची रात्री घरी थांबायची म्हणून कायम घरा बाहेर थांबायचो त्यातून ही संपत काकांची माणसं शोधून काढायची मला मग काय मार चटके तेच सगळ सुरु व्हायच यामध्ये कॉलेज तर कस तरी पूर्ण झाल माझ पण मी माझी ओळख मात्र गमावून बसलोय. आता तर स्वप्न ही रहात नाहीत डोळ्यात माझ्या. तुला एक सांगु मृण्मयी तुला जे वाटतय न ते इतक सोप नाहीये. तु मला पंधरा दिवसाचा आनंद तर देशील पण पुढे काय? माझ्या आयुष्यात आनंदाला जागा नाहीये मृण्मयी." अर्णव डोळ्यात पाणी आणत सांगतो.
"अस नको म्हणूस अर्णव आणि तुच ठरवलस न आता पुढचा विचार करायचा आहे अं? मग आता परत मागे नाही बघायचं ठिक आहे आणि सगळ्यात महत्वाच डोळ्यात सारखं पाणी आणायचं नाहीये ओके." मृण्मयी त्याचे डोळे पुसत त्याला समजावते
"मला एक गोष्ट समजत नाही तुला माझ्यावर इतका विश्वास कसा आहे? तुला खरच वाटत मी करू शकीन स्वतःच्या पायावर उभा राहु शकीन?" अर्णव
"याच न मी फक्त एकाच वाक्यात उत्तर देते. हो, हो तु सगळ करू शकतोस आता हेच बघ न जो मुलगा ३० वर्षा पासून एकाच खोलीत बंद होता कॉलेज करायचा तेवढच बाहेर जग त्यान बघितल होत. त्या नंतर ज्याने राधा ताई संपत काकांनी आणलेली माणसं आणि संपत काका तसेच सतीश दादा यांच्या व्यतिरिक्त कुणाला ही आपल्या खोलीत येण्याची परवानगी दिली नव्हती त्याच खोलीत आज मी आहे. त्याच्याशी गप्पा मारतीये हे यश नाहीये. अर्णव तुला स्वतःलाच यातून बाहेर पडावं लागेल आणि जेव्हा तु स्वतः ही बंधन तोडण्यात यशस्वी होशील न तेव्हा ही नराधम लोक तुझ काही ही बिघडवू शकणार नाहीत पण पुढाकार तुला घ्यावा लागेल तेव्हाच होईल. डोंट वरी मी आहे न होईल सगळ ठिक तु फक्त आता सगळ विसरून बस तुझ्या लिखाणा कडे फोकस कर बाकी माझ्यावर सोड चालेल." मृण्मयी समजावते.
ती अगदी तल्लीन होऊन त्याला सांगत असते आणि तो मोहित होऊन तिच्या प्रत्येक हालचालीकडे एकटक बघत असतो सगळ काही विसरून. तेवढ्यात मृण्मयी त्याला भानावर आणत विचारते.
"काय?... कुठे हरवलास." मृण्मयी स्माईल करत विचारते.
"काही नाही. सांग काय करायचं ते मी तयार आहे. पण अजून एक प्रॉब्लेम आहेच." भानावर येत अर्णव म्हणतो.
"आता कसला प्रॉब्लेम? सी तु फक्त बोल असा कुठलाच प्रॉब्लेम नाहीये ज्याच सोल्युशन मृण्मयी कडे नाही सबकुछ सॉल्व हो जायेगा मेरी जान." चुटकी वाजवून मृण्मयी म्हणते.
आणि दोघ हसू लागतात.
"तसा तो काही प्रॉब्लेम नाहीये ग पण लिखाणा साठी खूप गॅप पडलाय आणि या दरम्यान इतक काही घडलय की आता विचार करायचा तर काय करू काय लिहु अस होईल माझ. हाच प्रॉब्लेम आहे माझा." अर्णव
"बस इतकच? ठिक आहे याच ही सोल्युशन आहे माझ्या कडे वेट." मृण्मयी खोलीवरुन नजर फिरवत म्हणते.
मृण्मयी खोलीवरून नजर फिरवत असते तेवढ्यात तीला एका ठिकाणी गिटार ठेवलेली दिसते तोच ती आनंदाने बोलते.
"बघ म्हणलं होत न मी मृण्मयी कडे प्रत्येक प्रॉब्लेम च सोल्युशन असत आणि बाय द वे फ्रीन्डशिप मध्ये कुठलीच गोष्ट लपवायची नसते अस मला वाटत." मृण्मयी
"आणि मी कुठली गोष्ट तुझ्या पासून लपवली आहे अस तुला वाटत?" अर्णव
"तुझ हिडन टॅलेंट. अस म्हणलं जात की जर लेखन ब्लॉक आला असेल तर आपल दुसर आवडतं काम कराव. म्हणजे लिखाणात उत्साह येत आणि नवीन आयडियाज सुचतात." मृण्मयी म्हणते.
"बर म्हणजे तुला माझ दुसर हिडन टॅलेंट समजल तर. आणि आता तुझी इच्छा आहे ती गिटार मी हातात घ्यावी आणि तुझ्यासाठी मस्त एक गाण गाव बरोबर न." अर्णव हसत विचारतो
"तुला कस कळलं हे हं, संगतीचा असर चांगलाच व्हायला लागलाय तुझ्यावर अं." चेष्टेत मृण्मयी म्हणते.
"हो, मग शेवटी संगत कुणाची आहे." अर्णव देखील चेष्टेत उत्तर देतो.
आणि दोघ परत हसू लागतात.
"तुझ बरोबर आहे मला गाण तर ऐकायचं आहे तुझ्याकडून पण खोलीत नाही तर बाहेर मस्त गार्डन मध्ये एक मिनिट." मृण्मयी अर्णवला म्हणते आणि खाली किचन मध्ये जाते.
"राधा ताई सतीश दादा." किचन मध्ये येऊन मृण्मयी दोघांना आवाज देते.
दोघ ही त्यावेळेस आपापल काम करण्यात मग्न असतात तोच ते मृण्मयी कडे वळतात आणि सतीश दादा मृण्मयी ला विचारतात.
"तुम्ही आम्हाला आवाज दिलात ताई साहेब काही हव होत का तुम्हाला?" सतीश दादा
"हो, मला तुम्हा दोघांची मदत हवी आहे." मृण्मयी
"दोघांची मदत?" दोघ ही एकमेकांकडे बघत विचारतात.
"हो तुमची दोघांची मदत हवीये कराल न?" मृण्मयी
थोडासा विचार करून राधा ताई विचारतात.
"कसली मदत हवीये ताई काही हवय का तुम्हाला?" राधा ताई
"राधा ताई तुम्हाला तर माहीतच आहे न मला अर्णव साठी खूप काही करायचं आहे आणि मी त्याला सुरवात देखील केली आहे. त्यातलाच हा एक भाग आहे. आज अर्णव मला म्हणाला त्याला त्याची एक अपूर्ण इच्छा पूर्ण करायची आहे. त्याला त्याच एक पुस्तकं लिहायला सुरवात करायची आहे पण त्याच्यात तो आत्मविश्वास अजून ही येत नाहीये आणि म्हणूनच मला आज त्याला एक सरप्राईज द्यायचं आहे आणि यातच मला तुमची मदत हवी आहे. कराल तुम्ही दोघ यात मला मदत." मृण्मयी
"बेटा तु अर्णव बाबाला ठिक करायला मदत करतीयेस आणि ते दिसत देखील आहे पण मला अजून ही काळजी वाटत आहे त्यांची पुढे काही होणार तर नाही न." काळजीने राधा ताई विचारतात.
"ताई आता आपल्याला अर्णव व्यतिरिक्त कुठलाच विचार मनात येऊ द्यायचा नाहीये आता फक्त अर्णव एके अर्णव बस आणि राहिला प्रश्न तुमच्या त्या साहेबांचा म्हणजेच संपत काकांचा तर त्यांच माझ्या वर सोपवा मी बघून घेईन." मृण्मयी
"ठिक आहे ताई साहेब सांगा तुम्ही आम्ही काय मदत करू शकतो." आत्मविश्वासाने सतीश दादा विचारतात.
"ठिक आहे तर ऐका. सतीश दादा आज आपण दोघांनी मिळून अर्णवला बाहेर गार्डन मध्ये न्यायचं आहे ओके. आणि अजून एक गोष्ट तुमच्या पैकी कुणाला अर्णवच्या फ्रेंड्स बद्दल काही माहित आहे का म्हणजे त्याचे कॉलेजचे फ्रेंड्स किती होते कोण होते त्यांचे नंबर्स वगैरे." मृण्मयी
"अर्णव साहेबांच्या एका मित्राचा नंबर मी डायरीत लिहून ठेवला होता पण ती डायरी कुठे ठेवलीये माहित नाही शोधावी लागेल." सतीश दादा.
"अ रे मग शोधा दादा, कारण मी जो विचार करतीये ते जर यशस्वी झाल तर त्यामुळे अर्णव च्या आयुष्यात खूप फरक पडणार आहे. आणि विशेष करून आजचा दिवस हा कायम त्याच्या स्मरणात राहणार आहे बस तेवढ तुम्ही आधी डायरी शोधा. आणि सी. सी. टीव्ही कॅमेऱ्याच काय झाल ते कधी काढणार आहात? तुम्हाला हवय न अर्णव ठिक झालेला?" मृण्मयी
"हो ताई हवय तुम्ही चिंता करू नका मी कालच बोललोय कॅमेऱ्यावाल्याला आज परत बोलतो आणि डायरी सुद्धा लगेच शोधतो." सतीश दादा.
"ठिक आहे लगेच कामाला लागा. आणि राधा ताई अर्णव च्या सगळ्यात जवळचे तुम्ही आहात मग अर्णव च्या खाण्या पिण्याच्या आवडी निवडी बद्दल सांगा न काही." मृण्मयी
"त्यांच्या आवडी निवडी बद्दल? बेटा खर सांगु का अर्णव बाबाला मी फक्त जन्म दिला नाहीये इतकच पण जेव्हा पासून ते माझ्या आयुष्यात आले आहेत न तेव्हा पासून मी त्यांना बघत आलीये त्यांनी कधीच कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही जे समोर असेल ते मुकाट्यान खायचं आणि आनंदात राहायचं बस हाच त्यांचा स्वभाव आहे कॉलेज मधून सुद्धा यायचे न तर मला हे हवय ते हवय काहीच नाही. "राधा ताई काय बनवलय आज?" इतकच विचारायचे आणि जे समोर असेल ते मुकाट्यानं खायचं कुठलाही त्रास न देता. वाईट फक्त एकाच गोष्टी च वाटत ते म्हणजे अशा गुणी मुलाच्या बाबतीत हे सगळ घडतय. पण एक आहे ते जेव्हा खूप जास्त आनंदी असायचे न तेव्हा मला चटपटीत पदार्थ बनवायला सांगायचे पण मूड असेल तेव्हा. " राधा ताई
"ताई काळजी करू नका होईल सगळ ठिक. बर मग आज संध्याकाळी आपण मस्त वडापाव, सामोसा, मुगभाजी, एक गोड डिश अं जिलबी आणि पाणीपुरी ठेवूत आणि छान सॉफ्ट ड्रिंक्स ठेवूत काय म्हणता. आणि दादा तुम्ही कॅमेरे काढून टाका आधी आणि डायरी देखील शोधा अं." मृण्मयी दोघांना सांगते.
"ठिक आहे बेटा आणि दुपारच कस करायचं." राधा ताई.
"दुपारी काही तरी लाईटच करा पण दुपारचं सुद्धा अर्णवला डोळ्यासमोर ठेऊन करा आजचा पूर्ण दिवस त्याचा असेल." मृण्मयी
"ठिक आहे." राधा ताई म्हणतात.
आणि दोघ ही आपापल्या कामाला लागतात.
क्रमशः...
काही व्यक्ती या खूप निस्वार्थी असतात. ती काम ही तशीच निस्वार्थी पणे करतात आणि हेच त्यांना इतरांपेक्षा वेगळ बनवत असत. मृण्मयी सुद्धा तशीच होती निस्वार्थी पणे मदत करणारी तिच्या याच प्रवासात आता पुढे काय होतय ते बघुत पुढील भागात.
