पुर्वसूत्र :

तीच बिनधास्त पणाच बोलण ऐकून अर्णव अगदी खळखळून हसतो. अस वाटत असत की आता पहिले दिवस परत आले. त्याचा तो खळखळून हसणारा चेहरा पाहून ती सुद्धा समाधानाने त्याच्याकडे बघत असते आणि विचार करते. "अर्णवच्या चेहऱ्यावरच्या हास्याला कुणाची नजर लागू नये. हे सगळ असच रहावं कायम." आणि ते हास्य बघून लगेच ती त्याला आपल्या डोळ्याचं काजळ लावते. ते बघून तो भानावर येतो व दोघ नुसत एकमेकांकडे बघत राहतात प्रेमाने.

आता पुढे...

काही वेळा नंतर...

"बर तुम्ही तुमच्या गोळया घेतल्या का?" भानावर येत मृण्मयी विचारते.

"मला अस वाटत मैत्रीत एकेरी नावाने हाक मारतात न मी ऐकलं होत अस." अर्णव स्माईल करत विचारतो.

"हो का? अच्छा चालेल मग तुम्हाला ही मी तुलाच म्हणत जाईन. बर मला सांग कोणत्या गोळ्या आहेत मी देते तुला." मृण्मयी देखील स्माईल करत उत्तर देते.

ते ऐकून अर्णव एक स्मित हास्य करतो आणि ड्रॉवर मधली स्ट्रीप काढून देतो.

"ही घे ह्या आहेत गोळ्या ऐक ना ह्या गोळ्या घ्यायची गरज आहेच का? म्हणजे अग ह्या गोळ्या घेतल्या की मला कसतरी होत आणि मी दिवसभर झोपून असतो म्हणून खूप वर्ष झोपून काढली आहेत मी आता नाही झोपायचय मला प्लिज." स्ट्रीप देत अर्णव म्हणतो.

मृण्मयी स्ट्रीप हातात घेते आणि नाव चेक करते तीचे वडील प्रकाश जोशी हे खूप मोठे डॉक्टर असतात त्यामुळे मृण्मयी कडे प्रत्येक गोळ्या नीट चेक करून मगच देण्याची प्रत्येकाला सवय असते. तशी मृण्मयी ला ही असते.

मृण्मयी स्ट्रीप चेक करते तोच ती चाट पडते तीला मनात एक शंका येते आणि ती आपल्या घरी वडिलांना फोन करते.

"श्री स्वामी समर्थ जय जय

स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ

जय जय स्वामी समर्थ."

डॉ. प्रकाश जोशी पेशंट ला बघत असतात तेवढ्यात देवाची रिंगटोन टोन वाजू लागते. आणि त्यांच लक्ष फोन कडे जात ते पेशंट ला दोन मिनिट थांबण्याचा इशारा करून फोन उचलतात.

"हं.. बोल बेटा काय म्हणतेस पोहोचलीस का बरोबर तु आणि आज फोन कारतीयेस आधीच का नाही केलास?" डॉ प्रकाश

"डॅडु जरा थांब मी नंतर सांगते तुला मला फक्त एक गोष्ट विचारायची आहे मी तुला एका स्ट्रीप चा फोटो सेंड करत आहे त्या गोळ्यांबद्दल मला माहिती सांग आणि त्याला कुठली अल्टरनेटीव्ह गोळी आहे का ते ही सांग बघ तुला आधीच सांगते मला जे घर मिळाल आहे राहायला त्या  घराचा ओनर  अर्णव कुलकर्णी आहे आणि तो आता माझा न्यु फ्रेंड देखील आहे. तो ह्या गोळ्या बऱ्याच वर्षा पासून घेत आलाय त्याला पायाला दुखापत झाली होती तेव्हा आपले पाय बरे होण्यासाठी त्याचे संपत काका त्याला ह्या गोळ्या देताएत पण यात मला शंका येत आहे म्हणून तुला स्ट्रीप चा फोटो पाठवतीये मला लगेच कॉल कर बघून." मृण्मयी

"ठिक आहे बेटा तु फोटो सेंड कर मी बघतो." डॉ. प्रकाश

मृण्मयी लगेच फोटो सेंड करते  आणि डॉ. प्रकाश तो फोटो बघतात. व लगेच मृण्मयी ला फोन करतात.

एक सुंदर फ्लूट म्युझिक वाजत आणि मृण्मयी फोन उचलते.

"हं डॅडु बोल काय झाल काही कळालं का?" मृण्मयी

"अग हा कुठला फोटो सेंड केला आहेस तु? बेटा या गोळ्यांवर बँड आणलं गेलय ह्या गोळ्या घेतल्या तर व्यक्ती दिवसभर झोपून राहातो आणि या गोळ्या पाय बरे होण्यासाठी नाहीयेत याच्या जास्त सेवनाने पाय निकामी होऊ शकतात." डॉ. प्रकाश

"काय सांगतोएस डॅडु पण या गोळ्या अर्णव खूप वर्षा पासून घेतोय. बर यावर काही अल्टरनेटीव्ह सोल्युशन किंवा गोळ्या नाही का ज्या आपण लगेच चालु करू शकतो आणि या गोळ्या लगेच बंद केल्या तर काही त्रास तर होणार नाही न?" आश्चर्याने मृण्मयी विचारते.

"बेटा बघ तुला जर अर्णव ला मदत करायचीच असेल तर ह्या गोळ्या लगेच बंद करू नकोस त्या ऐवजी मी तुला माझा एक स्टुडंट आहे तु चांगलीच ओळखतेस त्याला विक्रांतला. तो सध्या आपली प्रॅक्टिस मुंबईलाच करत आहे मी तुला त्याचा नंबर सेंड करतो तु त्याला भेट आणि अर्णवची हिस्ट्री त्याला सांग म्हणजे तो तुला त्याची पुढची सगळी ट्रीटमेंट सांगेल ओके आणि तो जस सांगेल तुला तु तसच कर काय काळजी घे." डॉ. प्रकाश

"ठिक आहे डॅडु तु मला नंबर सेंड कर मी फोन करते त्याला चल आपण नंतर बोलूत आता बाय." मृण्मयी

दोघ ही फोन ठेवतात लगेच डॉ. प्रकाश मृण्मयी ला विक्रांतचा नंबर सेंड करतात आणि मृण्मयी तो नंबर चेक करते व फोन ठेऊन देते. आणि अर्णवला सांगते.

"अर्णव डॅडुला फोन केला होता मी त्यानी सांगितलं की, या गोळ्यांनी पाय बरे होत नाहीत तर पाय निकामी होऊ शकतात. आणि म्हणाला की या गोळ्या लगेच बंद करू नको म्हणून. तर त्यानी मला माझा एक चाईल्डहुड फ्रेंड आहे विक्रांत तो सध्या मुंबईत प्रॅक्टिस करतोय त्याचा नंबर सेंड केलाय तर आपण त्याला भेटून घेऊत म्हणजे योग्य ट्रीटमेंट चालु होईल तुझी." मृण्मयी

"तु वडिलांना डॅडु म्हणतेस? किती करणार आहेस माझ्यासाठी अं. ठिक आहे तु म्हणशील तेव्हा आपण जाऊत." अर्णव

मृण्मयी काहीही न बोलता स्माईल करते आणि लगेच त्याला गोळ्या देते व अर्णव गोळ्या हातात घेत तीला विचारतो.

"मृण्मयी तु मोटिवेशनल स्पीकर आहेस न आणि रायटर सुद्धा?" गोळ्या हातात घेत अर्णव तीला विचारतो.

"हो, मी मोटिवेशनल स्पीकर आणि रायटर ही आहे का रे?" मृण्मयी

"काही नाही ग सहजच ऍक्च्युली मोटिवेशनल स्पीकर्स कडे टिप्स, चांगल्या चांगल्या ट्रिक्स टेक्निक्स खुप असतात म्हणून विचारल सहज." अर्णव

"अच्छा तर तुला माझ्या कडून टिप्स हव्या आहेत तर. चांगली प्रगती आहे हं." स्माईल करत मृण्मयी म्हणते.

आणि लगेच दोघ ही खळखळून हसू लागतात. खर तर एखाद्याची ऑरा असतेच अशी की ती व्यक्ती कुणालाही लगेच आपलस करून घेते. असच काहीस मृण्मयी च देखील होत तिच्या चंचल मनमोकळ्या स्वभावाने तीने दोन दिवसातच सगळ्यांच्या मनात घर केल होत अर्णव जो इतक्या वर्षांपासून कुणाशी धड मोकळेपणाने बोलु शकला नव्हता त्याने देखील आता मोकळेपणाने जगायला बोलायला सुरवात केली होती ते फक्त तिच्या मुळेच. मृण्मयी च वागण लोकांना मदत करण हे एव्हाना अर्णवच्या लक्षात आल होत म्हणून तो जरासा मोकळेपणाने वागायचा प्रयत्न करत होता. आणि मृण्मयी च्या ही ते लक्षात आल होत.

ती अर्णव ला गोळ्या देते आणि विचारते.

"अर्णव. मी तुला काही करायला सांगितल तर करशील तु?" मृण्मयी

"आपण फ्रेंड्स आहोत ना अजून ही विचाराव लागतय बोल काय करायचय नक्की करेन मी इतके वर्ष अजाणते पणाने चुकीच्या माणसावर विश्वास ठेवत आलोय आणि त्यामुळेच ही गत झालीये पण आता ठाम विश्वासाने अनोळखी व्यक्ती वर विश्वास ठेऊन बघायचा आहे मला जीने खरच मला एक नवी आशा दिलीये. बोल तु." अर्णव

मृण्मयी स्माईल करते आणि म्हणते.

"बर ठिक आहे तर, मला आधी सांग एकांतात एकटा असताना तु कधी आपल्या स्वप्नांबद्दल इच्छंबद्दल विचार करायचास?  मला सांग काही तरी तुझ्या इच्छा असतील ना? आहेत तुझ्या कुठल्या इच्छा स्वप्न?" मृण्मयी.

"आज पर्यंत एकांतातच तर रहात आलोय मी आनंदी स्वछंदी जगण काय असत हे मी विसरूनच गेलोय आणि आता तु माझ्या आयुष्यात नवीन नातं घेऊन आलीयेस तर ते नात भर भरून जगायची इच्छा आहे मला. हो पण कॉलेज मध्ये असताना मला आई बाबांना शोधावस खूप वाटायच आणि मला लहानपणापासूनच लिहायला खूप आवडतं त्यामुळे बऱ्याचदा वाटायच आपण एखाद पुस्तकं लिहायला सुरवात करावी पण या एकलकोंड्या जीवनामुळे काहीच शक्य झाल नाही." अर्णव सांगतो.

"ठरल तर मग या पंधरा दिवसातले टास्क आपल्याला मिळाले आता तु बघ आपली चांगली सुरवात कशी होते ते. कस असत न अर्णव आपण कायम आपल्या आयुष्यातल्या चांगल्या घटनांकडे लक्ष देत गेलो न की आपोआप वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागतो. इतके वर्ष तुझ्या कडे चांगल्या गोष्टीच नव्हत्या विचार करायला आणि असल्या तरी तुला कुणी तस सांगितलच नाही की आपण कायम चांगल्या गोष्टींचा विचार करावा म्हणजे सगळ चांगल होत. म्हणून इतके वर्ष तु फक्त तुझ्या आयुष्यात नकारात्मकता बघत आला आहेस पण आता अस नाही होणार कारण तु वेगळ्या नजरेने आपल आयुष्य बघायच ठरवल आहेस आणि तुझ्याकडे चांगल्या गोष्टी देखील आहेत विचार करायला तेव्हा आता मागचं सगळ विसरून जायचं आणि फक्त तीन गोल्स म्हणजेच आपली स्वप्न डोळ्यासमोर ठेवायची ती म्हणजे आई बाबांना शोधणे, स्वछंदी आयुष्य जगणे, आणि एका सुंदर पुस्तकाची रचना करणे. कळालं आणि यात पूर्णपणे मी तुला लागेल ती मदत करेल." अर्णव च्या हातावर हात ठेऊन मृण्मयी सांगते.

क्रमशः...

काय? अर्णव ला चुकीच्या गोळ्या दिल्या जात होत्या? आणि अर्णव च स्वप्न आहे लेखक व्हायच? काय होणार पुढे अर्णव एक प्रसिद्ध लेखक होईल का तो बरा होईल का बघुत पुढील भागात.