पूर्वसूत्र :
"ठिक आहे चल फक्त जरा सांभाळून." राधा ताई म्हणतात
आणि दोघी अर्णव च्या खोली समोर येतात.
आता पुढे...
"ताई आधी तुम्ही जा मी मागून येते माझ्या कडे एक गिफ्ट आहे त्यांच्या साठी घेऊन येते." मृण्मयी हळू आवाजात सांगते.
राधा ताई अर्णव च्या खोलीत जातात आणि अर्णवला भरवू लागतात तेवढ्यात मृण्मयी अर्णव साठी डायरी आणि एक पुस्तक घेऊन येते. त्या पुस्तकाच नाव असत. 'रहस्य'
अर्णवला लिखाणा बरोबर वाचनाची देखील आवड असते आणि म्हणून ती त्याला ते गिफ्ट आणते पण अर्णवला तिची चाहूल लागते आणि तो तीला वैतागलेल्या स्वरात म्हणतो.
"तुला सांगितलं न मी मला तुला भेटायचं नाहीये मला त्रास देऊ नकोस एकटं सोड मला प्लिज हात जोडतो मी तुझ्या समोर." केविलवाण्या स्वरात अर्णव म्हणतो.
"ठिक आहे ठिक आहे नका भेटू मला. कुणी तरी म्हणलय ज्यांच कुणी नसत त्यांचे पुस्तक फ्रेंड्स असतात ही पुस्तकच आपल्याला खूप काही शिकवत असतात म्हणून तुमच्यासाठी ही एक खास भेट आणली आहे तेवढ त्याला मात्र नाकारू नका प्लिज." मृण्मयी खोलीत येऊन टेबलावर गिफ्ट ठेवत बोलते आणि खोलीबाहेर निघून येते.
मृण्मयी आपल गिफ्ट टेबलावर ठेवते व दारा जवळ लपून सगळ बघु लागते तेवढ्यात राधा ताईंच तिच्याकडे लक्ष जात त्या बोलणारच असतात की मृण्मयी ईशाऱ्याने त्यांना अडवते. ते बघून राधा ताई शांत बसतात आणि अर्णवला भरवू लागतात.
नाश्ता झाल्या वर...
जवळ जवळ अर्ध्या तासानी...
आपला नाश्ता करून मृण्मयी वर येत असते तेव्हा सहज तिच्या मनात येत आणि ती अर्णवच्या खोलीत डोकावते. अर्णव एकांतात विचार करत आपल्या व्हीलचेअर वर बसलेला असतो. मृण्मयीच त्याच्या प्रत्येक हालचाली वर लक्ष असत.
काही क्षणा नंतर...
मृण्मयी दारा अडून बघत असते. तोच अर्णव भानावर येतो त्याच डायरीवर लक्ष जात त्याला आपल्या डायऱ्यांची आठवण होते आणि एका क्षणात सगळे कॉलेजचे दिवस त्याच्या नजरे समोरून जातात. तो डायरी हातात घेतो आणि उघडू लागतो तोच त्यातून एक लेटर पडत तो ते लेटर वाचु लागतो.
(लेटर हातात घेऊन).
डिअर अर्णव सर,
तुम्हाला तुमच्याच दोन ओळी आठवत आहेत न. "खडतर रस्त्यावर चालणारा
तळपता सूर्य मी." खरय तुमचं तुम्ही एक तळपता सूर्यच आहात किती आणि काय काय तुम्ही सहन केलय आणि हा तुमचा संघर्षच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळ बनवतो जर इतक आहे तर ही नकारात्मकता का? आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही सारखीच असते अस नाही न मी तुम्हाला अस लेटर लिहिलेलं तुम्हाला कस वाटल माहित नाही पण तुमचा संघर्ष बघून तुमची जगण्याची जिद्द बघून मला तरी तुमचा अभिमानच वाटत आहे. खर तर तुमच्या ठिकाणी दुसर कुणी असत तर कधीच कोलमडून गेल असत पण तुम्ही धैर्यवान आहात खंबीर आहात आणि म्हणून मला तुमच्यासाठी काही तरी करावस वाटत आहे. हे आयुष्य असच असत हो आणि मला सांगा आयुष्यात जर संघर्ष च नसेल तर आपल्या आयुष्याला तरी काही अर्थ आहे का? आपला संघर्ष आपल्याला इतरांपेक्षा वेगळ बनवत असतो जगण्याची उमेद देत असतो त्याला नकारात्मक नका घेऊ. त्या प्रत्येक संघर्षाला मनाच्या एका कप्प्यात ठेऊन आयुष्य आनंदाने जगा दाखवून द्या तुमच्या संपत काकांना त्यांच्या त्रास देण्याने तुम्हाला कुठलाही फरक पडत नाही उलट तुम्ही अजून खंबीर बनत आहात धैर्यवान बनत आहात. माहित आहे मला म्हणणं सोप आहे ज्याच्यावर बेतत त्यालाच कळत. पण शेवटी आयुष्य आहे न जगण तर महत्वाच आहे आपल्या घरी आई बाबा आहेत दोन भावंड आहेत तुम्हालाच बघायचं आहे त्यांच घरात मोठा मुलगा आहात तुम्ही तुम्हीच हार मानली तर कस होईल सांगा मला? कुठल्याही परिस्थितीत तुम्ही तुमचं आयुष्य अस जगा की लोकांना ही वाटल पाहिजे मी जगेन तर अस अर्णव सारखं आणि यात मी तुम्हाला मदत करेन फक्त १५ दिवस द्या मला या दिवसात तुम्हाला स्वतः लाच जाणवेल तुमचं आयुष्य बदलत आहे तुम्ही स्वतः या बदललेल्या आयुष्याचा स्वीकार कराल. आयुष्य खूप सुंदर असत हो त्याला तसच जगावं काळजी करू नका मी आहे तुमच्या बरोबर सगळ ठिक होईल. आणि तरीही वाटत असेल तर जेव्हा माझ्या बोलण्यावर विश्वास बसेल तेव्हाच बोला माझ्याशी पण मी जे सांगितलं आहे तुम्हाला या लेटर मधून त्यावर मात्र नक्की विचार करा
तुमचीच सध्याची...
एक पेंगेस्ट मृण्मयी.
अर्णव लेटर वाचतो आणि परत नीट डायरीत ठेवतो. त्याच्या मनात खूप विचार सुरु असतात तोच त्याला मृण्मयी ची चाहूल लागते आणि तो स्वतः तीला खोलीत बोलावून घेतो. हे पहिल्यांदा घडल होत त्या घरात अर्णव नी राधा ताई आणि संपत व्यतिरिक्त खोलीत घडल होत.
"मृण्मयी खोलीत ये बोलायचय तुझ्याशी." अर्णव डोळ्यात पाणी आणून म्हणतो.
त्याचे ते पाणावलेले डोळे बघून एक क्षण तिच्याही डोळ्यात पाणी येत ती आवाज ऐकताच आपले डोळे पुसून खोलीत येते आणि विचारते.
"सर कसे आहात?" हळूच मृण्मयी विचारते.
"(स्मित हास्य करत). तुला कसा वाटत आहे मी? खूप जिद्दी आहेस हं तु आज पर्यंत प्रत्येक व्यक्ती मला मला स्पर्श करायला येत आहे असच वाटत आलाय म्हणून मी कायम त्यांना आपल्या खोली पासून दूर ठेवत आलोय पण तु तशी नाहीस तु खूप वेगळी आहेस तु त्या नजरेने मला बघितल नाहीस तर माझा विचार केलास माझी चौकशी केलीस थँक यु माझा इतका विचार करण्यासाठी मला जाणीव करून देण्यासाठी की मी डगमगणारा कोलमडून जाणारा अर्णव नसून एक तळपता सूर्य आहे. आणि मी नक्की उभा राहीन खंबीरपणे कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही करेन मी प्रयत्न बदलण्याचा आणि हे लेटर आहे न ते बळ देत राहील मला कायम वन्स अगेन थँक्स." मृण्मयी च्या हातावर हात ठेवत पाणावलेल्या डोळ्यांनी अर्णव म्हणतो.
"सर तुम्ही हे बोललात हिच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आता बघाच आयुष्य किती सुंदर होऊन जात ते." मृण्मयी आनंदाने सांगते.
आणि त्याच आनंदात दोघांच्या चेहऱ्यावर एक समाधानाच हास्य असत. आणि ते त्याच क्षणात हरवून जातात.
काही क्षणा नंतर...
"(हात बाजूला करत). मला एक सांग तुला माझ्या चारोळ्यांबद्दल कस समजल? कुणाची डायरी वाचण चांगली गोष्ट असते का?" अर्णव
"(जरासा विचार करून). नाही मी डायरी नाही वाचली ते.. मला राधा ताईंनी सांगितल तुमच्या लिखाणा बद्दल." मनातल्या मनात स्माईल करत मृण्मयी सांगते.
"अच्छा तुला काय वाटल तुमचं सुरु असलेल बोलण मला कळत नव्हतं (स्माईल करून ) मला सगळ कळत होत ऐकत होतो मी तुमच्या दोघींचं बोलण सगळ माहित आहे मला एकदा वाटल बोलाव पण का कुणास ठाऊक नाही बोलु शकलो एनीवे यासाठी सुद्धा मनापासून थँक यु तु पुन्हा एकदा मला माझीच ओळख करून दिलीस यासाठी." स्माईल करत अर्णव म्हणतो.
"अ रे बाप रे इतके सारे थँक यु मग तर मला ही म्हणावं लागेल खूप गोष्टींसाठी थँक यु." मृण्मयी
"तुला? मला समजल नाही " अर्णव
"हो, मलाही म्हणावं लागेल खोली दिलीत राहायला यासाठी थँक यु या खोलीत प्रवेश दिला यासाठी थँक यु माझ्यासाठी इन्स्पिरेशन बनलात यासाठी थँक यु आणि माझे न्यु फ्रेंड बनण्यासाठी थँक यु." मृण्मयी
तीच बोलण ऐकून अर्णव डोक्याला हातच मारून घेतो आणि म्हणतो.
"(हसून ). तु न टु मच आहेस. मला एक गोष्ट माहित आहे फ्रेंडशिप मध्ये नो थँक्स अँड नो सॉरी असत." अर्णव.
"हं (उत्साहात येऊन ). मलाही हेच सांगायचं होत फ्रेंडशिप मे नो थँक्स नो सॉरी होता है. या साठी इतक बोलाव लागलं बाय गॉड." मृण्मयी
तीच बिनधास्त पणाच बोलण ऐकून अर्णव अगदी खळखळून हसतो. अस वाटत असत की आता पहिले दिवस परत आले. त्याचा तो खळखळून हसणारा चेहरा पाहून ती सुद्धा समाधानाने त्याच्याकडे बघत असते आणि विचार करते. "अर्णव चेहऱ्यावरच्या हास्याला कुणाची नजर लागू नये. हे सगळ असच रहावं कायम." आणि ते हास्य बघून लगेच ती त्याला आपल्या डोळ्याचं काजळ लावते. ते बघून तो भानावर येतो व दोघ नुसत एकमेकांकडे बघत राहतात प्रेमाने.
क्रमशः...
मैत्री की प्रेम? प्रेमातली मैत्री की मैत्रीतलं प्रेम? काय होणार पुढे बघुत 'माझा जिवलगा' या कथेच्या पुढील भागात. मैत्रीच्या नात्याला तर सुरवात झाली आहे बर का
