
पुर्वसूत्र :
"ताई आता मी आलेली आहे न तुम्ही नका काळजी करू अर्णव सर नक्की बरे होतील तुम्ही आणि सतीश दादा मला फक्त मदत करत जा बस." राधा ताईंचे डोळे पुसत मृण्मयी सांगते.
आणि समजलेल्या सत्याचा विचार करू लागते.
आता पुढे...
वेळ रात्रीची...
त्या दिवशी मृण्मयीला झोप लागत नाही राहून राहून तिच्या मनात अर्णवचाच विचार येत असतो. आणि म्हणून न रहावुन ती खोली बाहेर येते व जिन्यात विचार करत करतच फेऱ्या मारत असते.
तोच ती अर्णव ला शांत पणे बेडवर झोपलेली बघते ती थोडस खोलीच दार उघडून त्याला न्याहाळत असते आणि तिच्या मनात येत.
"देव सुद्धा कुणा कुणाची कशी परीक्षा बघतो नई. एवढा देखणा गोड मुलगा आणि त्याची ही अशी अवस्था करून टाकलीये त्या नराधमान. विश्वासच बसत नाही कुणी आपल्याच माणसांना अस त्रास देत असतील. काय कराव?" मनाशीच विचार करत स्वतः शीच मृण्मयी बोलते.
ती अर्णवच्या खोलीत येते व हळूच प्रेमाने डोक्यावरून हात फिरवायला जाते. अर्णवला झोप लागलेली असते तरी देखील त्याच्या चेहऱ्यावर त्याच दुःख वेदना जाणवत असतात. ती हळूच त्याच्या डोक्यावरून हात फिरवायला जाते तोच त्याची हालचाल होते तस ती मागे सरकते आणि हळूच दार लोटून बाहेर येते. व आपल्या खोलीकडे निघू लागते हे सगळ राधा ताई बघत असतात राधा ताईंना तिची अस्वस्थता कळते ते तीला विचारतात.
"बाळ झोपली नाहीस अजून बराच वेळ झाला." राधा ताई प्रेमाने विचारतात.
"झोपच लागत नाहीये ताई राहून राहून अर्णव सरांचाच मनात विचार येतोय. तस पाहिलं तर मी भावना प्रधान नाहीये पण हे सगळ आहेच अस की ऐकल्यावर कुणाला ही त्रास होईल त्याचा आणि त्यातून हे सगळ लहानपणापासून सहन करायचं म्हणजे खरच अर्णव सरांना सेल्यूट आहे इतक होऊन देखील त्यांनी अजून जगण्याची आशा सोडली नाहीये. खरच कमाल आहे त्यांची." मृण्मयी
"(स्मितहास्य करत). पण अश्या जगण्याचा उपयोग तरी काय बेटा जीथे मरणोपरी यातना सहन कराव्या लागत असतील." राधा ताई
"(विचार करत). खरय तुमचं ताई पण जर त्यांनी जगण्याची आशा सोडली नाहीये तर आपण ही त्यांना नीट करण्याची आशा सोडायची नाही मला खात्री आहे ते एक ना एक दिवस नक्की बरे होतील आणि माझाच हा ठाम विश्वास त्यांना बर करेल बघाच तुम्ही. (थोडस थांबून). अं मला त्यांच्या आवडी निवडींबद्दल काही सांगा न. त्यांच शिक्षण झालय तर काही तरी आवड असेल न त्यांची." मृण्मयी
"(विचार करून ). आवड? हो आहे न त्यांना खेळाची आवड आहे त्याच बरोबर लिखाणाची सुद्धा आवड आहे ते कॉलेजला होते न कायम त्यांना कवितांसाठी बक्षीस मिळायचं ते बाहेर असले न की खुश असायचे आणि संपत साहेब १५ दिवसांसाठी घरापासून दूर असले की मग तर विचारूच नको अर्णव बाबांना आपण काय कराव आणि काय नाही अस होऊन जायचं. त्या वेळेत ते आपल्या मित्र मैत्रिणींना लिखाणाला पूर्ण वेळ द्यायचे जस काही काही झालेलच नाहीये." राधा ताई
"काय सांगताय खरच अर्णव सर कविता, लेखन करत होते? वॉव त्यांची एखादी डायरी किंवा नोटबुक आहे का मला वाचायला आवडेल त्यांच्या कविता." उत्साहात येऊन मृण्मयी विचारते.
"अं.. असायला तर पाहिजेत पण खर सांगु का जेव्हा लिखाणाबद्दल संपत साहेबांना समजल होत त्यांनी अर्णव बाबांच्या सगळ्या डायऱ्या जाळून टाकल्या त्यातून ही मी दोन तीन डायऱ्या लांब ठेवल्या आहेत बघते त्या आजून ही आहेत का?" राधा ताई
राधा ताई मृण्मयी ला सांगतात आणि डायऱ्या शोधायला निघून जातात तर जिन्यातच मृण्मयी विचार करत राधा ताईंची वाट बघु लागते.
काही वेळा नंतर...
"हे बघ दोन डायऱ्या सापडल्या खूप जपून ठेवल्या होत्या मी ह्या डायऱ्या खर तर मला यातल काही एवढ समजत नाही पण माझ्या लाडक्या अर्णव बाबांच्या ह्या डायऱ्या होत्या न त्यामुळे मी त्या जपून ठेवल्या होत्या म्हणलं परत जर का संपत साहेबांना ह्या बद्दल समजल तर ह्या ही डायऱ्या ते जाळून टाकतील. म्हणून लपून ठेवल्या होत्या." डायऱ्या देत राधा ताई सांगतात.
"अ रे वाह आणा इकडे अर्णव सरांना समजून घ्यायला मला पुरेश्या आहेत य