पूर्वसूत्र : तिच्या बोलण्यातून राधा ताईंना एक आशेचा किरण दिसतो त्यांना जाणवत आता नक्कीच अंधार दूर होऊन एक प्रकाशाची ज्योत दिसेल आणि अर्णव साहेबांच्या आयुष्यातला अंधार दूर होईल. राधा ताई असा विचार करतात त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असत आणि त्याच समाधानात त्या खरी कहानी सांगु लागतात. आता पुढे... "बेटा तु खूप मोठा धोका पत्करत आहेस यात तुला आणि त्या निष्पाप जीवाला ही धोका आहे तुला का नाही समजत हे." राधा ताई एकदा तीला समजावतात. "राधा ताई तुम्ही आमची काळजी करू नका. तुम्हाला एक सांगु मी फक्त एक लेखिका नाहीये तर मी एक मोटिवेशनल कोचं देखील आहे. मी जे लोक दुःखी असतात ज्यांनी जगण्याची उमेद सोडलेली असते अश्या लोकांना मदत करते काय माहित माझ्या छोट्याशा  मदतीमुळे अर्णव सर पुन्हा पहिल्या सारखे होतील पण यासाठी मला त्यांची पूर्ण माहिती असण गरजेच आहे न. तुम्हाला नाही का वाटत त्यांच्या ही आयुष्यात आपल्या सारखे काही सुखाचे क्षण यावेत एक हरवलेलं हसू यावं. मला सांगा अर्णव सरांना तुम्ही कधी हसताना पाहील आहे हो." मृण्मयी "बेटा तुझं म्हणण पटतय मला तरी सुद्धा... (थोडा विचार करून) बर जिद्दी आहेस तु बोल काय विचारायचं आहे तुला. सांगते मी सगळ." राधा ताई "ठिक आहे तर अं... मला आधी सांगा हे कॅमेरे सुरु आहेत का आणि अर्णव सरांच्या खोली सारखी अजून कुठली जागा आहे जीथे आपण शांत पणे बसून गप्पा मारू शकतो." मृण्मयी "अशी एकच जागा आहे बेटा किचन. का ग." राधा ताई "काही खास नाही आपण एक करू शकतो या जिन्यात आणि किचनमध्ये अर्णव सरांबद्दल बोलत जाऊत. मग तर चालेल." मृण्मयी "ठिक आहे बेटा पण तुला वाटत का अर्णव बाबा ठिक होतील." राधा ताई "नक्कीच ताई विश्वास ठेवा माझ्यावर. बर मला आता अर्णव सरांबद्दल सगळ सांगा एकूणएक गोष्ट." मृण्मयी "(स्मित हास्य करत) ठिक आहे हे सत्य ३० वर्षां पूर्वीच आहे अर्णव बाबांच्या घरात एकूण पाच लोक आहेत अर्णव बाबा त्यांना एक लहान भाऊ आहे आरव बाबा आणि एक लहान बहीण आहे गायत्री ताई आणि मोठे साहेब रघुवीर कुलकर्णी आणि बाईसाहेब सुनंदा कुलकर्णी. बाईसाहेब आणि मोठे साहेब स्वभावाने खूप चांगले मदत करणारे नोकरांना तर कधी त्यांनी नोकरा सारखं वागवलच नाही त्याच नोकरांमधील मी पण एक आहे. मी त्यांच्या घरातलं वातावरण बघितलं आहे. अगदी हसत खेळत घर होत हे तिघ तर इतके मस्तीखोर होते कुणाला विश्वास सुद्धा बसणार नाही यांना बघून. पण यांच्या आयुष्यात हे संपत साहेब सुद्धा होते आजही आहेत. त्यांनी या हसत्या खेळत्या घराला अगदी नरक बनवून टाकलय. संपत साहेब हे मोठ्या साहेबांचे धाकटे भाऊ अशी कुठलीच वाईट सवय नाहीये जी त्यांनी सोडली असेल चोरी पासून दारू चरस सगळ्यांची त्यांना सवय आहे. खर तर बेटा ह्या घराचा वापर देखील ते याच कारणासाठी करतात. पण मी ठरले नोकर माणूस त्यामुळे मला कधी हस्त क्षेप करताच आला नाही. मी नेहमी बघत आलेली आहे ना कस अर्णव बाबांना संपत साहेब त्रास देत आले आहेत. ही घटना ३० वर्षांपूर्वीची आहे. त्या वेळी अर्णव बाबा शाळेत गेले होते घरात आम्ही नोकर माणसं मोठे साहेब सुनंदा बाईसाहेब एवढीच माणसं होती आरव बाबा आणि गायत्री ताई देखील तेव्हा शाळेत गेले होते. मला आजही तो दिवस आठवतोय आम्ही लोक किचन मध्ये काम करत होतो काही जण घराची साफ सफाई करत होते बाईसाहेब आपली खोली आवरत होत्या आणि मोठे साहेब कुठली तरी फाईल चेक करत होते. तेवढ्यात फाईल चेक करताच ते इतके चिडले की आजही ते आठवल की अंगाचा थरकाप उडतो. या आधी मी कधीच मोठ्या साहेबांना इतकं चिडलेल बघितल नव्हत. पण त्या दिवशी सगळ्यांच्या पाया खालची जमीन सरकली होती भीतीने अगदी गाळण उडाली होती कारण देखील तसच होत नेहमी मोठ्या साहेबांना शांत स्वभावाच बघत आलोय त्यात अचानक त्यांना इतक चिडलेल बघितल कुणाला ही भीती वाटणारच. त्या दिवशी त्यांनी संपत साहेबांना बोलावून घेतल आणि त्यांना विचारलं. त्या दिवशी दोघांमध्ये खूप वाद झाला आणि... " राधा ताईंना आठवत भूतकाळात "दादा, तु बोलावलस मला? काही काम होत का?" संपत "हो, मी तुला बोलावल म्हणजे काही तरी काम असणार म्हणूनच बोलावल असेल ना." रघुवीर कुलकर्णी चिडून बोलतात "अस तुटक पणे का बोलत आहेस माझ काही चुकलं का? काय झालय नेमक स्पष्ट सांग." संपत "स्पष्ट ऐकायचंय तुला? मी तुला काय विचारणार आहे काहीच माहित नाही की सोंग करतोय न समजण्याचं. असा कसा निर्लज्ज बनत चालला आहेस तु संपत अरे आई बाबा गेल्या नंतर लाडा कोडात वाढवलं आम्ही तुला एकुलता एक लहान भाऊ म्हणून कुठल्या ही गोष्टीची कमी ठेवली नाही आम्ही तुला वाढवण्यात अगदी तुला आवडणाऱ्या मुलीशी मनात नसताना लग्न लावून दिल तुझ नवीन व्यवसाय उभा करून दिला तो डुबवलास तर माझ्या कंपनीत हिस्सेदार बनवलं तुला याचे हे पांग फेडलेस तु अरे अजून किती पाठीशी घालायचं आम्ही तुला मोठा कधी होणार आहेस तु कधी तुझ्या चुकीच्या मार्गांवरून परत येणार आहेस तुला माहित आहे तु काय केल आहेस ते?" रघुवीर कुलकर्णी आपल्या भावावर चिडून बोलत होते त्यांचा राग उच्च शिखरावर पोहोचला होता. "दादा मला अजून ही समजत नाहीये तुला मला नेमक काय सांगायचं आहे ते. सोड आणि तु मला जे हे सगळ ऐकवतो आहेस न ते तु तुझ कर्तव्य आहे म्हणूनच केलएस कुणीही करत तु वेगळ अस काही केल नाहीस आणि राहिला माझा प्रश्न तर हो मी कंपनी मध्ये फ्रॉड केला मला पैसे हवे होते त्यामुळे मला तस वागावं लागलं काय करणार आणि तुच म्हणाला होतास न कंपनी दोघांची आहे मग जर का तु पैसे खर्च करू शकतोस आणि तेव्हा मी तुला काहीच विचारत नाही मग मी ही खर्च करूच शकतो. आपल्यात फरक एवढाच आहे दादा तु खर्च करतोस कुटुंबासाठी आणि मी खर्च करतो स्वतः साठी बस." कुच्छित हसत सपंत म्हणतो. "संपत (रागाने हात उगारत )" रघुवीर म्हणतात. तेवढ्यात संपत आपल्या भावाचा हाथ अडवत म्हणतो. "दादा मी आता तो पूर्वीचा तुझा लहान भाऊ राहिलो नाहीये तुझ्या मनात येईल तेव्हा मार खाणारा खूप झालय आता आणि मी ही तु केलेला अपमान खूप सहन केलाय पैसे घेतले न मी कुणाचा खून तर केला नाही पण बस आता मी दाखवतो तुला त्रास म्हणजे काय असतो ते. एक लक्षात ठेव हे सगळ कमावण्यात माझाही हिस्सा आहे आणि काहीही झाल तरी तो मी तुझ्याकडून मिळवेनच बघत रहा आता पुढे काय काय होत ते." चिडून संपत निघून जातो. वर्तमान काळात... "ताई कुठे हरवलात काय झाल त्यांच्यात वाद झाल्या नंतर... तुम्ही मध्येच का थांबलात?" राधा ताईंना भानावर आणत मृण्मयी विचारते. "अं, हो त्या दिवशी दोघांमध्ये वाद झाल्यावर मोठ्या साहेबांना काही सुचतच नव्हत संपत साहेब इतक्या खालच्या थराला जाऊन बोलतील यावर त्यांचा विश्वास च बसत नव्हता ते बराच वेळ आपल्या खोलीचा दरवाजा लावून बसले होते करणार तरी काय त्यांना मोठ्या साहेबांनी आणि बाईसाहेबांनी अगदी तळहाताच्या फोडा सारखं जपलं होत त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती त्यांनीच अस वागावं म्हणल्यावर त्रास होणारच. त्या दिवशी सगळ्याच गोष्टी अगदी एकामागून एक घडत होत्या पहिले दोघांचा वाद आणि नंतर दुपारी अजून एक बातमी आली (थोडस थांबून ). आमच्या अर्णव साहेबांची त्याच दिवशी अर्णव साहेबांना किडनॅप केल गेल." राधा ताई "काय? म्हणजे तुम्हाला म्हणायचय संपत सरांनी अर्णव सरांना किडनॅप केल? आणि हे सगळ तुम्हाला कस माहित तुम्ही त्यांच्या बाबांना नाही कळवलं हे." आश्चर्याने मृण्मयी विचारते. "बेटा तुला माझ्याकडे बघून वाटत मी बोलण्याचा प्रयत्न केला नसेल? पण मी जेव्हा मोठ्या साहेबांना सांगायला गेले तेव्हा माझा मुलगा त्यांच्या कडे होता जो आजही आहे म्हणूनच मला काही करता येत नाही. (डोळ्यात पाणी आणत). छोट्या साहेबांची दशा बघण्या पलीकडे. तो नतद्रष्ट येतो येताना त्याच्या मित्रांना घेऊन येतो सगळे बंगल्याचा आनंद घेतात आणि अर्णव बाबांचं लैंगिक शोषण करत त्या वासनेचा ही आनंद घेतात आमचे अर्णव साहेब मात्र दिवसरात्र अत्त्याचार सहन करत असतात आणि मी लाचारपणे बघत असते बस. (थोडस थांबून ) कित्तेकदा तर संपतनी अर्णव साहेबांना चटके बुक्क्याने मारल सुद्धा आहे त्यातच त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि इथे अडकले ते अडकलेच." राधा ताई "एक... एक मिनिट तुम्ही म्हणालात त्यांच शोषण व्हायच आणि ते मारायचे ही पण संपत सरांनी त्यांना वाढवलं आहे न त्यांच शिक्षण केलय मग हे सगळ." आश्चर्याने मृण्मयी विचारते "हो हे अगदी बरोबर आहे कारण संपूर्ण बँग बॅलन्स साहेबांच्या नावावर आहे न काय करतील मोठ्या साहेबांनी लिहून ठेवल होत जेव्हा अर्णव बाबा त्यांच्या जवळ होते की, "ही सगळी संपत्ती माझ्या नंतर फक्त आणि फक्त अर्णव च्या नावावर असेल संपूर्ण संपत्तीचे निर्णय तो स्वतः घेईल त्याच्या २४ व्या वर्षानंतर आणि तो पर्यंत सगळी संपत्ती ट्रस्ट च्या नावाने असेल व त्याच केअर टेकर साहेबांचे वकील मित्र जगदीश साहेब असतील हा पण हा बंगला मात्र भागीदारीत होता म्हणजे याचा उपयोग दोन्हीं भाऊ करू शकत होते. म्हणून आज पर्यंत ते बघत आहेत." राधा ताई "हं, (थोडस थांबून ) मोटीव तर समजल पण त्यांचे आई बाबा म्हणजे रघुवीर सर आणि मॅम" मृण्मयी "मला जेव्हा इकडे जबरदस्ती ने आणलं गेल तेव्हा पासून मला त्यांच्या बद्दल काहीच माहित नाही. (थोडस थांबून) बेटा माझी खूप इच्छा आहे अर्णव बाबा ठिक व्हावेत नक्की होतील ना ते ठिक" राधा ताई पाणावलेल्या डोळ्यानी विचारतात. "ताई आता मी आलेली आहे न तुम्ही नका काळजी करू अर्णव सर नक्की बरे होतील तुम्ही आणि सतीश दादा मला फक्त मदत करत जा बस." राधा ताईंचे डोळे पुसत मृण्मयी सांगते. आणि समजलेल्या सत्याचा विचार करू लागते. क्रमशः... तर राधा ताईंनी सगळ सत्य मृण्मयी ला सांगितल आहे. आता पुढे काय मृण्मयी अर्णव मधला आत्मविश्वास कसा परत आणेल काय होईल आता या कथेत पाहूत पुढील भागात