आणि दोघ ही युगेशच्या ऑफिसकडे रवाना झाले.

साधारण चार तासानी...

धारा कॉम्प्लेक्स...

एक उच्चभ्रू वसाहती मधील सर्वात मोठी बिल्डिंग जवळ जवळ 12 मजली त्या बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोवर ला सगळी ऑफिसेस होती आणि वर पासून 11 फ्लोवर पर्यंत घरे होती ती बिल्डिंग अगदी सुंदर बांधली गेली होती त्याच बिल्डिंग च्या ग्राउंड फ्लोवर ला युगेश च मोठ ऑफिस होत ऑफिसमध्ये प्रवेश करताच मोठा हॉल हॉल मध्ये बसू शकतील इतक्या खुर्च्या तसेच एंट्रस समोर रिसेप्शन आणि ऑफिसच काम काज बघायला एक सीडशिडीत बांधा असलेली छान व्यक्तिमत्व असलेली रिसेप्शनीस्ट. रिसेप्शनीस्ट कायरा

आणि रिसेप्शन च्या बाजूलाच युगेश च केबिन होत त्याच बरोबर ऑफिस मध्ये एक ऑफिस बॉय देखील होता रामदिन. जो युगेश ऑफिस मध्ये नसला की त्याला योजून दिलेली सगळी काम प्लस चहा पाणी सांगितलं की ते ही आणून देत असे आणि युगेश नी सांगितलेली बाकीची काम ही करत असे.

स्वस्तिक इंटरप्रायजेस...

युगेश फायली चेक करत बसला होता आणि दारात कुणीतरी उभ आहे याकडे लक्षच त्याच नव्हतं आणि हे सगळ अर्णव आणि मृण्मयी बघत होते.

काही क्षणा नंतर,...

"आम्ही आत येऊ का बिझी पर्सन" अर्णव ने दारावर नॉक करत विचारलं.

"यस या." युगेश नी फायली चेक करता करताच उत्तर दिल

"अरे ए युग्या फायलिंमधून डोकं वर काढून जरा नजर वर करून बघ एकदा." अर्णव म्हणाला

तस एकदम युगेश भानावर आला आणि त्याने दाराकडे बघितल.

"ओह माय गॉड किती वर्षांनी अर्णव आणि ते ही वहिनीं बरोबर काय राव तु लग्न केलस आणि काही बोलला नाहीस बोलवलं पण नाहीस अस असत का राव." युगेश उत्साहित होऊन म्हणाला

"तुला आम्हाला दोघांना दारात उभ करूनच बोलायचं आहे बहुदा ए मंद आधी केबिन मध्ये तरी बोलाव आम्हाला का सगळी उत्तर उभ्या उभ्याच देऊ." अर्णव म्हणाला

"अरे सॉरी सॉरी आनंदाच्या भरात तुम्हाला केबिन मध्ये बोलवायचंच विसरलो या.. या." युगेश म्हणाला

आणि लगेच दोघ केबिन मध्ये आले.

"तु न युग्या अजिबात बदलला नाहीस जसा कॉलेज मध्ये होतास अगदी तसाच आहेस बघ बर मी ओळख करून देतो. ही माझी शाळेतली मैत्रीण मृण्मयी आणि आमचं अजुन लग्न व्हायचं आहे बर का. आणि मृण्मयी तु माझ्या ग्रुपला तर भेटलीच आहेस हा माझ्या ग्रुपमधला सगळ्यात भोळा माझा मित्र युगेश." ओळख करून देत अर्णव म्हणाला

आणि लगेच सगळे हसले.

"काय रे तु पण बर काय घेणार तुम्ही गप्पा तर होत राहतील तोपर्यंत मी रामदिन ला काही तरी मागवायला सांगतो." फोन उचलून युगेशने विचारलं

"नाही काही नको." लाजत मृण्मयी म्हणाली

"अरे अस कस आम्ही खुप वर्षांनी भेटलोय तु मागव रे तुला जे आवडेल ते मागव." लगेच अर्णव म्हणाला

"काय तु पण अर्णव एकदम अस." अर्णव ला थांबवत मृण्मयी म्हणाली

"मृण्मयी अग आमची सगळ्यांची मैत्री अशीच आहे एकदम बिनधास्त तु नको काळजी करू बर तुला अगतुग केलेलं चालेल न आणि काय रे तु आपले किस्से सांगितले नाहीस वाटत हिला." युगेश ने विचारलं

"हो.. हो अगदी चालेल तस मी तुमच्या ग्रुपला भेटलीये पण तुझी भेट राहून गेली असो आता भेटलोय न आता वाटतय मी पुर्ण ग्रुपला भेटले अस." मृण्मयी म्हणाली

"हे तर चांगल आहे चला आपली सुद्धा भेट झाली पण माझ्या कडे काय काम काढलत?" युगेशने विचारलं

"अरे हीच एक स्वप्न आहे हिला स्वतःच घर बांधायच आहे त्यासाठी आम्ही जमिनीच्या शोधात आहोत तु जमिनीच डिलिंग करतोस न मग तुझ्याकडे आहेत का काही जमिनी आम्हाला बघता येतील असे." अर्णव ने विचारलं

"हं आत्ता पासून स्वप्न पुर्ण करायलाय गाडी खुपच पुढे गेलेली दिसतीये..." मजा घेत युगेश म्हणाला

"तु कर न बाबा हेल्प काही तरी आहे का तुझ्याकडे एखादी जमीन तरी सांग मला." अर्णव म्हणाला

"हो हो करतो हेल्प काळजी करू नकोस बर हे बघा काही जमिनी चे फोटोज आहेत माझ्या कडे तुम्ही बघून घ्या यातून जर तुम्हाला एखादी जमीन आवडली तर आपण बघायला जाऊ." फोटो दाखवत युगेश म्हणाला

"बघू कश्या आहेत जमिनी." अर्णव म्हणाला

आणि लगेच दोघ फोटो बघू लागले

काही वेळा नंतर...

"हं जमिनी तर चांगल्या आहेत पण मनात भरत नाहीयेत अजुन काही सॅम्पल बघायला मिळतील का" मृण्मयी ने विचारलं

"हो हो का नाही आपल्याकडे बरेच सॅम्पल्स आहेत पण एक सांगू का अस फक्त फोटो वरून कधीच काही कळत नसत जेव्हा आपण ऑन लोकेशन वर जाऊन सहानिशा करतो तेव्हा समजत जमीन कशी आहे ते तस आज च एक क्लाईंट एका जमिनी साठी आला होता तु म्हणत असशील तर आपण जाऊन बघून येऊ शकतो." युगेश ने विचारलं

"अरे वाह पण लोकेशन कस आहे म्हणजे मला अस मेन वसाहतीत लोकेशन नको आहे मला शांतता हवी आहे आणि ऍटलीस्ट दोन चार एकर ची जमीन तरी असायला हवी आहे का कुठली अशी जागा." मृण्मयी ने विचारलं

"तशी जागा... हो एक जागा आहे तशी आपण जाऊन बघू शकतो." युगेशने विचारलं

"ठिक आहे मग आपण उद्या सकाळी जाऊन येउत चालेल का? म्हणजे तु फ्री असशीलच न" मृण्मयी ने विचारलं

"हो हो उद्या ही मी फ्रीच आहे चालेल की आपण उद्या जाऊत." युगेश म्हणाला

तोच चहा आणि स्नॅक्स घेऊन रामदिन आला

"सर आत येऊ का मी?" दारावर नॉक करत रामदिनने विचारलं

"हो ये की" युगेश म्हणाला

तोच ट्रे घेऊन रामदिन केबिन मध्ये आला

"हं ठेव चहा आणि सामोसा टेबलावर" युगेश म्हणाला

आणि लगेच रामदिन ने चहा आणि सामोसे टेबलावर ठेवले व तिथून निघून गेला.

"घ्या तुला सांगतो अर्णव या सामोसे ची चव न बिलकुल आपल्या कॉलेज च्या कँटीन सारखी चव आहे सामोसे किंवा पोहे म्हण खाल्ले न कॉलेजचीच आठवण होते बघ घे न." युगेश सर्व करत म्हणाला

लगेच दोघांनी आपापल्या डिश घेतल्या आणि नाश्त्याचा आनंद घेऊ लागले.

काही वेळा नंतर..

"बर चल आता आम्ही निघतो खुप लेट झाला आहे खुप छान वाटलं तुला भेटून उद्या आपण जरा लवकरच निघुत चालेल न." मृण्मयी ने चहा चा कप ठेवत विचारलं

"हो अगदी चालेल की म्हणजे दुपारच्या वेळी काही काम निघाली तर मला ही करता येतील अगदी चालेल." युगेश म्हणाला

"बर मग भेटूत पुन्हा माझा नंबर तर आहेच तुझ्या कडे चल येऊ आम्ही आता." जागेवरून उठत अर्णव म्हणाला

आणि लगेच दोघ निघाले.

काहीवेळा नंतर...

"हा युगेश अगदी आहे तसाच आहे हं काही फरक नाही बैस." अर्णव म्हणाला

आणि लगेच मृण्मयी कार मध्ये बसली आणि दोघ ही परत घराकडे रवाना झाले.

आज मृण्मयी खुपच खुश होती मनासारखा जोडीदार मिळाला घराचं स्वप्न ही पुर्ण होण्याच्या मार्गावर होत सगळं कस अगदी मनासारखं घडत होत पण तरीही एक छोटीशी मनात सल ही होतीच आणि ती म्हणजे अर्णव ची फॅमिली.

कुठे असतील सगळे काय करत असतील त्यांना माहित ही असेल का आता संपत च्या त्रासातून अर्णव ची सुटका झाली आहे ते.

आता मृण्मयी च्या डोक्यात अर्णव चे विचार अर्णव च्या फॅमिलीचे विचार डोकावू लागले आणि त्या विचारात ती हरवून गेली.

काही क्षणा नंतर..

"काय ग कसला एवढा विचार सुरु आहे आता तर तुझ घराच स्वप्न सुद्धा पूर्ण होणार आहे न मग कसला इतका विचार सुरु आहे." गाडी चालवत अर्णव ने विचारलं

"काही नाही रे असच बघ न आपल मन पण किती वेड असत नई जितक आपल्याला मिळत जात तितकच जास्त अपेक्षा ठेवायला लागत आता हेच बघ न घराच स्वप्न तर पूर्ण व्हायला सुरवात झाली पुढे घर ही बनेल पण नात्यांच काय घरात वावरायला माणसं कुठे आहेत आपल्याला अरु आता लवकरात लवकर आई बाबांचा शोध घ्यायला सुरवात करावी लागेल." काळजी ने मृण्मयी म्हणाली

आणि तीच बोलण ऐकून अर्णव देखील विचारात पडला.

क्रमशः..

चला मृण्मयी च घराचं स्वप्न तर पुर्ण होणार पण अर्णव च्या फॅमिली च काय बघुत पुढील भागात