"चालेल मग माझे दोन तीन मित्र आहेत मी त्यांच्याशी बोलून घेतो ते आपल्याला चांगल्या जमिनी दाखवतील आजच बोलतो." स्माईल करत अर्णव बोलला

आणि दोघ एकमेकांन मध्ये हरवून गेले.

काही वेळा नंतर...

"अं.. कप छान होती कॉफी थँक्स रोज बनवत जा माझ्यासाठी अशीच कॉफी." कॉफी चा कप देत अर्णव म्हणाला

आणि परत दोघ ही एकमेकांमध्ये हरवून गेले.

"थँक्स बर आता जास्त विचार करत बसू नकोस आपल्याला अजुन खुप काही करायचं आहे काय थोडा आराम ही कर थकला असशील न." भानावर येत मृण्मयी म्हणाली.

"कोण? मी... तुला खरच वाटत मी थकलोय नाही ग मी कसला थकतोय अजुन तुझ्या घराच स्वप्न पुर्ण करायचं आहे परत तुला कायमच घरी घेऊन यायचं आहे.. पुस्तक लिहायचं आहे तुझ्यावर..." हळू हळू तिच्या कडे वळत अर्णव म्हणाला.

आणि तो जवळ येतोय हे बघून ती ही हळू हळू मागे सरकू लागली त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक गुलाबी लाली अगदी स्पष्ट दिसत होती तो हळू हळू तिच्या जवळ येऊ लागला तोच लाजेने तिच्या गालावरची कळी खुलली आणि लाजत ती त्याला म्हणाली.

"माझ्यावर काय...?" लाजत मृण्मयी म्हणाली

"तुझ्यावर काय? तुला नाही माहित मला काय म्हणायचं आहे?" परत जवळ येत अर्णव म्हणाला

"अं... हं" मृण्मयी स्माईल करत नकार देत म्हणाली

आणि तिथून पळून गेली. अर्णव मात्र तीला पकडायला गेला आणि खोलीतच थांबला.

काही क्षणातच...

"अरु माझ्यावर खुप प्रेम करायचं आहे हो न माहितीये मला तुझ खुप प्रेम आहे माझ्यावर आय. लव.. बाय." परत खोलीत येऊन मृण्मयी म्हणाली..

आणि लगेच खाली निघून गेली.

"ए... थांब." तिच्या मागे धावत अर्णव म्हणाला

आणि मनाशीच हसला.

दोघांमधले हे गोड क्षण मात्र राधा ताईंच्या नजरेतून सुटले नाही अर्णव खाली येतच होता तोच राधा ताई समोर आल्या तोच अर्णव जिन्यातच थबकला आणि म्हणाला.

"राधा ताई तुम्ही... मी ते..." जरासा बावरलेल्या स्थितीत अर्णव म्हणाला

"मी.. ते काय बाबा? सगळं समजायला लागलं आहे बर का मला मोठ्या साहेबांना आणि ताई साहेबांना सांगावं लागेल मला." हसून राधा ताई म्हणाल्या

"काय ताई तुम्ही पण." लाजून अर्णव म्हणाला

आणि लगेच आपल्या खोलीत निघून गेला व मनाशीच बोलू लागला.

"काय झाल मला? ह्यालाच प्रेम म्हणतात का मी इतका गुंतत चाललोय मृण्मयी मध्ये आणि जर का हेच प्रेम असेल तर हो मी प्रेमात पडलोय मृण्मयीच्या आता सगळ आयुष्य तिच्यासाठी आहे आय लव यु मृण्मयी." ओरडून त्याने प्रेमाची कबुली दिलीच

हो आता पर्यंत ज्या भावना फक्त मनातून होत्या ज्या प्रेमाचा अर्थ फक्त मैत्री होता तेच प्रेम ओठा पर्यंत आलच पण एकट्यात.

इकडे मृण्मयी ची देखील तशीच अवस्था होती ती ही अर्णवच्या प्रेमात त्याच्या गोड स्वभावात हसण्यात गुंतत चालली होती तिच्या ही प्रेमाची कबुली मनापर्यंत पोहोचली होती आणि याची दोघांना ही जाणीव देखील होती

प्रेम. ही भावनाच अशी असते की दोघांना ही एकमेकांशिवाय जगू देत नाही प्रेमात पडलेल्या व्यक्तीला एकमेकांशी जुळलेल्या नात्याला घट्ट धरून ठेवायच असत प्रेम अशी जादू असते ज्याने पूर्ण आयुष्यच बदलत आणि मृण्मयी आणि अर्णव च ही काहीस असच झालेलं असत म्हणून तर आता अर्णव ही मृण्मयी साठी काहीही करायला तयार झालेला असतो.

काही वेळा नंतर...

अर्णवला आठवत त्याचा मित्र युगेश एक ब्रोकर आहे तो लगेच त्याला फोन करतो

स्वस्तिक इंटरप्रायजेस...

युगेश च ऑफिस...

वेळ सकाळी 10 वाजताची...

युगेश आपल्या मिटिंग मध्ये बिझी होता समोर त्याचे क्लाईंट समर अधिकारी बसले होते आणि दोघ ही एका महत्वाच्या प्रॉपर्टी वर चर्चा करत होते तोच फोन वाजला

"हॅलो... कोण बोलतय?" युगेश ने विचारलं

"अरे मी बोलतोय अर्णव तु फ्री आहेस का? मला जरा भेटायचं होत तुला." अर्णव म्हणाला

"कोण अर्णव कुलकर्णी? पण तु तर..." युगेश ने विचारलं

"हो, तु जो विचार करत आहेस तोच आहे मी अर्णव कुलकर्णी. भेटू शकतो आपण." अर्णव म्हणाला

"हो.. हो.. अरे तु म्हणशील तेव्हा तुला माहित नाही मला किती छान वाटत आहे तुझा आवाज ऐकून आज मी जे काही आहे तुझ्या मुळेच आहे यार ये भेटूत आपण." आनंदाने युगेश म्हणाला

"ठिक आहे मग आज भेटूत आपण ठिक ए." स्माईल करत अर्णव म्हणाला

"ठिक आहे भेटूत चल ठेऊ मी फोन." युगेश ने विचारलं

"हो चल भेटूत आज बाय छान वाटलं तुझ्याशी बोलून." अर्णव म्हणाला

आणि दोघांनी फोन ठेऊन दिला.

"चल आज पर्यंत तु माझ्यासाठी खुप काही केल आहेस मृनू आता माझी पाळी तुझी सगळी स्वप्न पुर्ण करीन आत्मविश्वासाने शेवटी हा विश्वास देखील तुच दिला आहेस न मला. आत्ता मृण्मयी ला सांगतो खुश होईल." अर्णव मनाशीच बोलला

आणि मृण्मयी ला भेटायला तिच्या खोलीत गेला.

"मी आत येऊ का?" नॉक करत अर्णव ने विचारलं

मृण्मयी आपल्या अगामी पुस्तक लिहायची तयारी करत होती तोच तीच अर्णव कडे लक्ष गेल.

"अरे अरु ये न असा बाहेर का उभा आहेस." मृण्मयी म्हणाली

"काय लिहीत आहेस बघू." खोलीत प्रवेश करत अर्णवने विचारलं

"काही नाही रे एक अगामी पुस्तकं लिहायच्या विचारात आहे त्याचीच तयारी सुरु आहे हं तुला जमत असेल तर तु मला यात मदत करू शकतोस आपण दोघांनी पुर्ण केलेलं हे पहिलं पुस्तक असेल." उत्साहाने मृण्मयीने विचारलं

"तुझ पुस्तकं मी ही लिहू पण ही मेहनत तर तुझी आहे न मग मी कस?" अर्णवने विचारलं

"अरे मग काय झाल अरु आपण आता वेगळे आहोत का? मग आपली मेहनत वेगळी कशी होईल आणि तुला विचारण्याचं कारण अस की मी तुझ्यावर च हे पुस्तक लिहीत आहे ज्यामुळे इतर लोकांना ही तुझ्याकडून प्रेरणा मिळेल आणि ते शिकतील जर का कुठला वाईट प्रसंग ओढवला तर धिर न सोडता त्याचा कसा सामना करायचा हं पुर्ण तुझ्या बाबतीत नाहीये पण थीम तुझ्या प्रसंगातुन घेतली आहे बोल." मृण्मयी ने विचारलं

"तुझ म्हणणं बरोबर आहे पण मला जमेल." अर्णवने विचारलं

"का नाही जमणार एकदा विचार तर करून बघ." मृण्मयीने विचारलं

"बर ठिक आहे मी करेन तुला मदत आता तु इतकं म्हणत आहेस तर विचार करायलाच हवा बर ते सोड मी हे सांगायला आलो होतो मी माझ्या एका मित्राशी बोललोय तर आपल्याला आज भेटायला जावं लागेल त्याला पण त्याआधी नेमक तुला घर कस बांधायचं आहे याचा विचार करावा लागेल म्हणजे तशी जमीन तो तुला दाखवेल." अर्णव म्हणाला

"काय माझ्यासाठी तु तुझ्या मित्राशी बोललास?" मृण्मयीने विचारलं

"आत्ता च तर म्हणालीस न आपली मेहनत एक आहे मग आपल स्वप्न वेगळ कस मृनू आता जे तुझ स्वप्न तेच माझ ही स्वप्न मग येशील न माझ्याबरोबर." अर्णव ने विचारलं

"हो, नक्कीच खर आहे आता जे तुझ स्वप्न ते माझ ही स्वप्न येईन मी तुझ्याबरोबर." समाधानी स्माईल करत मृण्मयी म्हणाली

तोच दोघ परत एकमेकांमध्ये हरवले.

हे प्रेमाचे क्षण आता दोघांमध्ये रोजच दिसणार होते कारण दोघांच नात आता हळू हळू अधिक घट्ट बनत चाललं होत आता दोघ ही एकमेकांची स्वप्न एकमेकांच मन जपत होते आणि हीच दोघांच्या नात्याची निव होती

काही क्षणा नंतर...

"मग आता काय करायचं?" भानावर येत मृण्मयीने विचारलं

"आता आधी स्वप्नातल्या घराचा विचार करायचा हो अग मी तुला विचारलंच नाही तुझ्या स्वप्नातलं घर कस आहे." अर्णवने विचारलं

"स्वप्नातलं घर? माझ्या स्वप्नातलं घर खुप क्लासी असेल. माझ घर डुप्लेक्स असेल घरासमोर एक छानस तुळशीवृंदावन आणि राईट साईडला एक सुंदर लॉन जीथे एक टेबल आणि दोन अं नाही चार खुर्च्या असतील कधी वाटलं संध्याकाळी शांत निवांत बसून कॉफी प्यावी तर तिथे बसत जाऊ मग कधी आई बाबा काव्या आरव देखील बसत जातील किती छान न. आपल्या घराच्या टेरेसवर एक छोटेखानी जिम देखील असेल आणि जिमच्या बाजूलाच एक स्विमिंग पूल जिमवर वर्कआउट केल की सरळ स्विमिंग मध्ये डुबकी मारायची एक लॅविश घर असेल आपल तसेच समोर एक छोटासा गोठा ही असणार हं आईला नेहमी वाटायचं आपल्या कडे गाय असावी पण बाबांनी कधी मनावरच घेतल नाही मग म्हणल आईला एक छोटस गिफ्ट देऊ म्हणून आणि घरासमोर एक सुंदर छोटस मंदिर देखील बांधून घेऊ कधी कधी वाटलं आई बाबांना दर्शन करून यावं देवाच तर जाऊ शकतात न म्हणून आणि हो हे सगळ बांधून झाल्यावर एक किलोमीटर पर्यंत जागा उरायला हवी हं तिथे आपला वॉकिंग + जॉगिंग ट्रॅक असेल

कधी काव्या आणि आरव जिम करत असले तर आपण वॉक करून येऊ शकतो न त्यासाठी. आणि ह्याबरोबर तिथे प्रेम सहवास आणि आपली हक्काची नाती सुद्धा असावीत प्रत्येकाला एक वेगळी रूम ते ही वेल डेकोरेटिव्ह. रूम्स अश्या असाव्यात जिथून प्रत्येक रूमच्या विंडो मधून निसर्ग दिसेल आणि भरपूर सूर्यप्रकाश घरात येईल आणि घराच नाव असेल सावली. सावली निवास. कस वाटलं स्वप्न." उत्साहाने मृण्मयीने विचारलं

मृण्मयी आपल्या स्वप्नातल्या घराच वर्णन अगदी तल्लीन होऊन सांगत होती जस काही ती आपल स्वप्न जगत आहे पण ती स्वतः तीच स्वतःच स्वप्न सांगत असताना कधी माझ बोलण्यावरून आपल म्हणण्यावर आली तीच तिलाच कळाल नाही आता तीच स्वप्न तीच राहीलच नव्हत ते दोघांच झाल होत म्हणून च की काय तीने आपल्या स्वप्नात अर्णवला ही शामिल करून घेतल.

आणि इकडे अर्णव मात्र तीच प्रत्येक बोलण अगदी तल्लीन होऊन ऐकत होता तोच मृण्मयी ने पुन्हा एकदा त्याला विचारलं आणि तो भानावर आला.

"हॅलो काय झाल कसला एवढा विचार करत आहेस?" अर्णवला चुटकी वाजवून भानावर आणत मृण्मयीने विचारलं

"अं.. काही नाही ग बस तुझ्या स्वप्नाचा विचार करत होतो पण तु एक गोष्ट नोटीस केलीस का तु स्वप्न सांगण्याची सुरवात माझ स्वप्न या वाक्याने केलीस पण काही क्षणातच तु आमच्या सगळ्यांचाच विचार करायला लागलीस खुप सुंदर आहे तुझ नाही आता आपल स्वप्न आणि आपल स्वप्न नक्कीच पूर्ण होणार मी आहे तुझ्या बरोबर कायम." मृण्मयीला जवळ घेत अर्णव म्हणाला.

"खरच? खरच आपल स्वप्न पूर्ण होईल" आनंदाने मृण्मयीने विचारलं

"का नाही होणार कुणी तरी आहे जीने मला माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं मग आपली स्वप्न का नाही पुर्ण होणार मी करीन सगळी स्वप्न पूर्ण. कारण तु माझी जिवलगा आहेस." अर्णव म्हणाला

तोच दोघ ही परत आपल्या गोड क्षणात हरवून गेले आता दोघ ही प्रेमाची एक एक पायरी पुढे चढत होते एकमेकांना समजून घेत एकमेकांची मन जपत

"हं म्हणजे आता तुझ्यासाठी अशी जमीन बघावी लागणार जीथे तुझ म्हणजे आपल स्वप्नातलं घर अगदी छान उभ राहील. चला मग भेटून घेऊ मित्राला उठा आता बाईसाहेब.." मृण्मयी ला बेडवरून उठवत अर्णव म्हणाला

आणि दोघ ही युगेशच्या ऑफिसकडे रवाना झाले.