माझा जिवलगा (भाग - 22)'s image
22K

माझा जिवलगा (भाग - 22)

पुर्वसूत्र :

"घ्या रे या वेड्याला आणि नीट लक्ष ठेवा याच्या वर पाय फुटले आहेत याला इथून निसटून जायला नको पुतण्या समजून चांगलच डोक्यावर नाचवलय याला आता हे सगळच आपल्याच अंगलट आलय पण अजून ही वेळ गेली नाहीये आज हा आपल्या पायावर उभा राहिलाय हे आपल्या साठी चांगलच आहे आजच प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स बनवून घेतो आणि याची जबरदस्तीने सही घेतो मग सगळी प्रॉपर्टी माझी याच क्षणाची मी वाट बघत होतो आता तो क्षण आलाय. हा इथून निघून जायला नको याच्याकडे नीट लक्ष द्या घट्ट बांधून ठेवा याला येतो मी." संपत आपल्या माणसांना आदेश देतो.

आणि तिथून निघून जातो.

आता पुढे...

"हे तु बरोबर करत नाहीयेस काका मी आता तो तुझा ऐकणारा पुतण्या राहिलो नाहीये मी माझ अस्तित्व पूर्णपणे बदलल आहे आता मी खंबीर बनलोय तुच काय तुझे हे भाड्याचे तट्टु ही आता माझ काहीएक बिघडउ शकत नाही बस माझे हाथ एकदा सोड मग तुला दाखवतो मी कोण आहे ते. तुला माहितीये ही हिम्मत माझ्यात कुठून आली माझ्या मैत्रीणी कडुन आणि आता ही हिम्मत माझ्यातुन जाणार नाहीये तर मी असाच राहणार आहे खंबीर." आपले हाथ सोडवण्याचा प्रयत्न करत अर्णव बोलला.

"तु? आम्हाला बघणार लायकी आहे का तुझी अरे आजपर्यंत माझ्या जीवावर जगत आला आहेस तु तु काय बघणार मला इतक सोप्प नाहीये ते (आपल्या माणसांना) लक्ष ठेवा ह्याच्यावर आलोच मी." संपत

इकडे बंगल्यावर...

"मी म्हणाले होते न बेटा हा माणूस धोकेबाज आहे हा माणूस कुणाचाच सख्खा होऊ शकत नाही बेटा अर्णव बाबाला तु थोड्याशा सुखापाई धोक्यात टाकलं आहे त्यांना जर काही झाल न तर मी स्वतः लाच काय तर तुला ही माफ करणार नाही." राधाताई भीतीने बोलल्या.

"राधा ताई पॅनिक होऊ नका अर्णवला काही होणार नाही मी आहे न शांत रहा(सतीश दादांना) दादा माझ ते लॅपटॉप दाखवा." लॅपटॉप कडे बोट दाखवत मृण्मयीने सांगितल

"हे घ्या." लॅपटॉप देत सतीश दादा म्हणतात.

"बेटा पण तु लॅपटॉपच काय करणार आहेस?" इन्स्पेक्टर विजय

"काका अर्णवला मी एक पेन गिफ्ट केल होत आणि त्या पेनाला एक ट्रॅकर प्लस कॅमेरा होता ज्यामुळे आपण समोरच्याला काहीही न कळता त्यांना ट्रॅक करू शकतो आणि त्यांच्या आसपास काय घडतय हे ही बघु शकतो तो पेन माझ्या लॅपटॉपला कनेकटेड आहे फक्त तो पेन अजून ही त्याच्या जवळ आहे का हे एकदा कन्फर्म झाल की आपल खूप मोठ काम हलक होईल मी तेच बघतीये." लॅपटॉप चेक करत मृण्मयी बोलली

"हे तु काय बोलत आहेस खरच का ग्रेट." इन्स्पेक्टर विजय

"हो, काका ज्या दिवशी मी इथे यायचा डीसीजन घेतला होता त्याच दिवशी मी तसा पेन मागवून घेतला होता. (मनाशीच) ग्रेट हे बघा पेन कनेक्ट झालाय आणि लकिली त्याच्या जवळच आहे." आपल्या काकांकडे लॅपटॉप देत मृण्मयीने सांगितल

मृण्मयीने लॅपटॉप इन्स्पेक्टर विजयना दिला आणि ते लगेच निरीक्षण करू लागले.

"ग्रेट जॉब मृण्मयी आता हा संपत सुटत नाही (जाधवना). जाधव लकिली अर्णवला त्याच ठिकाणी ठेवलय आपल्या बाकीच्या लोकांना बोलवा आपल्याला त्या ठिकाणी निघायला हव." इन्स्पेक्टर विजय

"त्या ठिकाणी म्हणजे? तुम्हाला अजूनही काही समजलय का?" आश्चर्याने मृण्मयीने विचारलं

"हो बाळ संपत च्या बऱ्याच अड्ड्यांवर आम्ही छापे मारले आहेत त्याच्या या अड्डयावर सुद्धा आम्ही गेलो होतो पण या अड्डयावर आम्हाला काही मिळाल नाही बहुतेक आमची येण्याची बातमी त्यांच्या पर्यंत पहिलेच पोहोचली असावी त्यामुळे. (जाधवना) बर चला आपल्याला निघायला हव." लॅपटॉप मृण्मयीला देत इन्स्पेक्टर विजय म्हणाले.

लॅपटॉप देऊन इन्स्पेक्टर विजय आपल्या कॉन्स्टेबल्सना घेऊन तडक तिथून निघून गेले.

काही वेळा नंतर...

एका अडगळीच्या खोलीत...

"पकडा रे त्यांना! संपत तु आता सुटत नाही जाधव अरेस्ट हीम खूप लोकांच आयुष्य या नराधमाने बरबाद केलय आता याला सुटका नाही पकडा याला." इन्स्पेक्टर विजय ने जाधवना ऑर्डर दिली

लगेच जाधवनी संपत आणि त्याच्या साथीदारांना अरेस्ट केल व त्यांच्या पासून अर्णवची सुटका केली.

काही वेळा न

Tag: प्रेमकथा और2 अन्य
Read More! Earn More! Learn More!