पूर्वसुत्र :

"हो, होईल मी तुझी जीवन संगिनी करेल तुझ्याशी लग्न कारण तुच आहेस माझा जिवलगा. अरु तु अगदी तसाच आहेस जस मी माझ्यासाठी माझ्या जीवनसाथीची कल्पना केली होती तेच साधेपण एक लेखक असण समजूतदारपणा अगदी अगदी सगळ काही तसच जे मला माझ्या जीवनसाथी मध्ये हवय तेच सगळे गुण या हुन वेगळ अजून काय हवय आयुष्यात तुला माहितीये ज्या दिवशी मी पहिल्यांदा तुझा फोटो बघितला होता न त्याच दिवशी मला क्लिक झाल होत तो तुच आहेस माझा जिवलगा पण रियलाईज आज झाल आय एम सो हॅपी थॅंक यु सो मच युनिव्हर्स मला माझा जिवलगा मिळाला आहे आय एम सो हॅपी." मृण्मयीने आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि युनिव्हर्स चे आभार मानले.

आता पुढे...

मृण्मयीच बोलण संपताच दोघ ही एकमेकांत गुंतून गेले आणि आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने पाहु लागले. तोच एक विचित्र आवाज आला.

"आरु ए आरु बघ मी आलोय आता खूप एंजॉय करायचं हं आपण चल बाहेर ये की मी येऊ आत." कुतश्चितपणे संपतनी विचारलं

आणि आपल्यातच हसू लागला.

त्याच ते हसण ऐकून अर्णव लगेच भानावर आला आणि त्याला संपतच्या हसण्याची भीती वाटू लागली. काही क्षण त्याला काही सुचलच नाही. तोच तो लपण्यासाठी जागा शोधू लागला.

"अरु... अरु तु काय करतोएस अस नको करुस अरे हे बघ आपल काय ठरलय आठव. आता खंबीर राहायचं सांगितलय न मी अस व्हीलचेअर घेऊन पळू नकोस लागेल रे तुला काही." ती अगदीक होऊन त्याला समजावत होती.

आणि तो मात्र भीतीने लपण्यासाठी जागा शोधत होता कारण त्याच्या आनंदाचे उत्साहाचे ते १५ दिवस आता उलटून गेले होते आणि परत तीच काळरात्र आलेली होती. आणि याच भीतीने तो गर्भगळीत झाला होता.

ती एक कुच्छीत हाक त्याच्या आयुष्यात मरण यातना घेऊन येणार होती म्हणूनच अर्णव जिवाच्या आकांताने व्हीलचेअर घेऊन चारी दिशांना पळत सुटला होता. लपण्याची जागा शोधत होता.

आणि मृण्मयी ही त्याच्या मागे पळत होती त्याला वाचवण्यासाठी. आणि तीने एका ठिकाणी अडवलं व त्याला समजाऊ लागली.

"काय करतो आहेस तु? तुला कळतय तुझ काय सुरु आहे ते अर्णव अस घाबरून कस चालणार आहे आपल काय ठरल होत? काहीही झाल तरी घाबरायचं नाही आणि आता आपल्या बरोबर आपल्या प्रेमाची शक्ती सुद्धा आहे आपल प्रेम खर आहे त्यामुळे घाबरू नकोस मात करायची आहे न तुला अशा आयुष्यावर मग खंबीर रहावं लागेल की नाही. सांग मला." मृण्मयी समजावत होती

अर्णव मात्र दर्दरून घामाघूम झालेला होता तोच संपत ने परत त्याला आवाज दिला.

"अरु... बेटा कुठे आहेस तु? मी येतोय बर का मी आलो,... मी आलो,..." जीना चढत संपत बोलतो.

"ओह श्शीट मी कुठे तरी लपते डोंट वरी मी इथेच आहे ओके." मृण्मयी

मृण्मयी अर्णव ला सांगून लगेच एका पडद्या मागे लपली तोच काही क्षणात संपत त्या खोलीत आला.

"अरु,... काय केलस इतके दिवस अं मला तर विसरलास बाबा तु चल आपण मजा करू चला आता परत करायची मज्जा निकालो अपने कपडे लेट्स गो." संपत अर्णवचे कपडे काढत बोलु लागला.

"नको,... नको,... प्लिज नका अस करू सोडा सोडा मला प्लिज सोडा." भीत भीत अर्णव बोलु लागला.

अर्णव खूप घाबरलेला होता गयावया करत होता संपतला विनवणी करत होता. पण त्याला कुठे शुद्ध होती तो तर आपल्याच धुंदीत होता आपल्याच मस्तीत होता आणि अर्णवर अत्त्याचार करत होता.

तोच एक अनपेक्षित घडल आणि अर्णव व्हीलचेअर वरुन खाली पडला मागे मागे सरकू लागला तो मागे सरकत होता आणि संपत त्याच्या समोर येत होता तोच पडद्यामागे लपलेल्या मृण्मयीने ते सगळ रेकॉर्ड केल आणि ते सगळ करत असतानाच अचानक अर्णव हळु हळु भीत भीत उठून उभा राहिला.

पण हे इतक सोप नव्हत या मागे अथक मेहनत होती रात्रंदिवस केलेले परिश्रम होते म्हणूनच अर्णव उठून आपल्या पायावर उभा राहिला त्याच्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता त्याने स्वतः च्या नकारात्मकतेवर मात केली होती आणि आता खऱ्या अर्थाने तो मुक्त झाला होता.

आणि हे बघताच मृण्मयी आणि संपत मात्र चाट पडले मृण्मयी च्या चेहऱ्यावर आपण केलेल्या सहकार्याचे समाधान होते आणि संपतचा चेहरा रागाने लालबुंद होता.

कारण लहानपणापासून आजपर्यंत संपतने ज्या पद्धतीने अर्णवला आपल्या मुठ्ठीत ठेवल होत आज अर्णव संपतच्या मुठ्ठीतुन सुटला होता त्याच्या अत्याचारातुन मुक्त झाला होता.

मृण्मयीने संपतच सगळ वागण रेकॉर्ड करून घेतल आणि आपल्या काकांना मेसेज केला आणि लगेच पडद्यामागुन बाहेर आली.

"बास आता बास संपत सर तुमचा खेळ आता संपलाय मी यात तुमचं सगळ वागण रेकॉर्ड करून घेतलय तुम्हाला काय वाटल तुम्ही तुमची मनमानी चालवत रहाल आणि कुणाला काहीच कळणार नाही तुमचा गैरसमज आहे हा गुन्हेगार कितीही लपून काम करत असला न त्याच्यावर कुणा ना कुणाची नजर असतेस (थोडस थांबून) त्याला वाटत असत आपल्याला बघणार कुणीच नाहीये आपण काहीही करू शकतो पण तस नाहीये मिस्टर संपत कुलकर्णी आपल्याकडे सर्वांची नजर असतेच. आजपर्यंत तुम्ही अर्णव वर खूप अत्याचार करत आलाय पण आता नाही मला एक सांगा तुम्हाला ही मुलबाळ आहे न त्यांच्या बाबतीत अस काही घडल असत तर काय केल असत हो तुम्ही?" अर्णव ला उठवत मृण्मयीने विचारलं

"स्टॉप इट. तुला मला प्रश्न करण्याचा अधिकार दिला कोणी? आणि काय माहितीये तुला माझ्या बद्दल साधी पेंगेस्ट आहेस तु आणि मला प्रश्न करतेस?" रागामध्ये येऊन संपतने विचारलं

"मी? मी कोण आहे कळेल तुला सगळ कळेल थोडा धीर धर." आत्मविश्वासाने मृण्मयीने सांगितलं

"म्हणजे तुला नेमक काय म्हणायचय काय कळेल मला आणि मला एक सांग अर्णव बरा कसा झाला तुला सांगितलं होत न मी याच्यापासून दूर राहायचं अक्कल नाहीये तुला विसरू नकोस तु या बंगल्यात एकटीच आहेस मी माझा खरा चेहरा दाखवायला सुरवात केली न तुला कळणार ही नाही तुझ आयुष्य कधी संपल तो मोबाईल दाखव इकडे लवकर." चिडलेल्या स्वरात संपत बोलला.

मृण्मयी आणि संपतचा वाद सुरु होता तोच त्या ठिकाणी मृण्मयी चे काका इन्स्पेक्टर विजय आपल्या कॉनस्टेबल्स बरोबर आले.

"संपत कुलकर्णी तुम्हाला अर्णवला किडनॅप केल्याच्या आरोपावरून तसेच अर्णववर रेप करून त्याचा अमानुष छळ केल्या प्रकरणी आणि पुरबला ही किडनॅप केल्या प्रकरणी मी तुम्हाला अरेस्ट करतो यु आर अंडररेस्ट (जाधवना) जाधव अरेस्ट हीम." इन्स्पेक्टर विजय

"हे... हे.. खोट आहे माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत अरु बेटा मी काका आहे न तुझा सांग सांग न यांना माझ किती प्रेम आहे तुझ्यावर बोल मी... मी तुला सांभाळालय तु याच अस पांग फेडणार आहेस तुला काय हवय बोल ही प्रॉपर्टी हवी का की हा बंगला हवाय तु सगळ घे पण मला सोड प्लिज सोड.(कुत्छीतपणे हसत) तुम्हाला काय वाटल या तुटपुंज्या पोलिसांना मी घाबरेल हा माझा बंगला आहे आणि इथे राज्य ही माझच चालणार आहे तुम्हाला जे करायचय ते करा पण हा संपत कुलकर्णी हाताला लागणार नाही चल बे." संपतने अर्णवच्या डोक्याला गन लावली.

आणि त्याला बरोबर घेऊन तिथून पळून गेला. तर लगेच पोलीस ही त्याच्या मागे धावले.

दोन तासा नंतर...

"घ्या रे या वेड्याला आणि नीट लक्ष ठेवा याच्या वर पाय फुटले आहेत याला इथून निसटून जायला नको पुतण्या समजून चांगलच डोक्यावर नाचवलय याला आता हे सगळच आपल्याच अंगलट आलय पण अजून ही वेळ गेली नाहीये आज हा आपल्या पायावर उभा राहिलाय हे आपल्या साठी चांगलच आहे आजच प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स बनवून घेतो आणि याची जबरदस्तीने सही घेतो मग सगळी प्रॉपर्टी माझी याच क्षणाची मी वाट बघत होतो आता तो क्षण आलाय. हा इथून निघून जायला नको याच्याकडे नीट लक्ष द्या घट्ट बांधून ठेवा याला येतो मी." संपत आपल्या माणसांना आदेश देतो.

आणि तिथून निघून जातो.

क्रमशः...

काय म्हणजे अर्णववर परत संकट आलय मग आता मृण्मयी काय करेल बघुत पुढील भागात.