
पुर्वसूत्र :
मृण्मयी पेनड्राईव्ह घेऊन तिथून निघून जाते.
आता पुढे...
काही वेळा नंतर..
कृष्णाई बंगला...
मृण्मयी सकाळच्या प्रत्येक घटनेचा विचार करत आपल्या खोलीत फेऱ्या मारत होती. ती डिस्टर्ब होती. तीला अर्णववर झालेला अन्याय आठवला आणि तीने एक निर्णय घेतला. व अर्णवच्या खोलीत गेली.
अर्णव त्यावेळी आराम करत होता. मृण्मयी त्याच्या जवळ गेली तोच तिच्या मनात हजारो विचार येऊन गेले.
"किती निरागसता आहे याच्यात जसा लहानपणी होता अगदी आजही तसाच आहे आता सहन नाही होत मला आता मला याला माझी खरी ओळख मी सांगायलाच हवी. (झोपलेल्या अर्णवला) मी तुझी बालमैत्रीण आहे अर्णव फक्त तुझी मृणू." त्याच्या डोक्यावरून हात फिरवत मृण्मयी म्हणाली
तोच अर्णवला जाग आली आणि मृण्मयी जरास मागे सरकली.
"मृण्मयी तु? तु कधी आलीस बाहेरून कळालच नाही." बेडवर उठत अर्णवनी विचारलं.
"झाला थोडा वेळ तुझी झोप झाली." त्याच्या जवळ बसत मृण्मयीने विचारलं.
"झोप कसली ग घर कोंबडा बनलोय मी बस जरा आराम करत होतो नुसत बसून ही घर खायला उठत न. तु सांग तु कस काय आली होतीस इथे?" अर्णव.
"मला माझ्या बद्दल एक खूप मोठी गोष्ट तुझ्याशी शेअर करायची आहे जी खूप महत्वाची आहे आणि आता ती वेळ आलीये की तुला ती गोष्ट कळायला हवी." मृण्मयी सांगते
"अशी कोणती गोष्ट आहे जी मला समजायला हवी काय झालय मृण्मयी काही प्रॉब्लेम आहे का?" काळजीने अर्णवने विचारल
"अर्णव तुला तुझी बाल मैत्रीण मृणू आठवते?" खिडकीत उभी राहून मृण्मयीने विचारलं
"(थोडासा विचार करून). मृणू? तीला कस विसरेन मी शाळेत असताना माझ्यावर नितांत प्रेम करणारी माझी काळजी घेणारी माझे अश्रु पुसणारी ती एकमेव तर मैत्रीण होती मला. तीच काय?" अर्णव
अर्णवने तीला विचारलं आणि तीच्या आठवणीत हरवून गेला.
"ती मृणू दुसरी तिसरी कुणी नसून मीच आहे तुझी बाल मैत्रीण मृणू म्हणजेच मृण्मयी अर्णव लहानपणी सुद्धा माझ तुझ्या आयुष्यात येण हा योगायोग नव्हता तर मला तुझ्या आयुष्यात प्लांट केल गेल होत." मृण्मयी खिडकीत डोकावून सांगू लागली.
"काय? तु माझ्या शाळेतली मैत्रीण मृणू आहेस? मग ही गोष्ट तु माझ्या पासून लपवून का ठेवली होतीस सांगितलं का नाहीस मला?" आश्चर्याने अर्णवने विचारलं
"हे बघ ते महत्वाच नाहीये महत्वाच हे आहे की मी तुझ्या आयुष्यात का आहे? ही एक खूप मोठी गोष्ट आहे आणि आता ती तुला कळली पाहिजे. अर्णव आपण १० वर्षाचे होतो त्यावेळी तु किडनॅप झाला होतास आणि ही बातमी तुझे काका संपत कुलकर्णी नी तुझ्या बाबांना दिली होती त्यांनी घरात तस तशी वातावरण निर्मिती ही केली होती ज्यावेळी तुझ किडनॅपिंग झाल होत त्यावेळी माझे काका हेडक्वार्टरवर इन्स्पेक्टर म्हणून ड्युटीवर होते आणि त्यांनीच तुझा तपास लावायचा बेडा ही उचलला होता काकांनी त्यांच्या लेवलवर तुझा खूप शोध घ्यायचा प्रयत्न केला पण तुझ किडनॅपिंग इतक शिथाफीने करण्यात आल होत की गुन्हेगार समोर असून देखील कुणाच्या नजरेत आला नाही आणि शेवटी तुझी केस पुराव्या अभावी बंद केली गेली. पण काकांनी हार मानली नव्हती ते केस बंद झाल्यानंतर ही तुझा शोध घेत होते आणि त्याच वेळी त्यांना एक निनावी कॉल आला त्या अननोन व्यक्तीने संपत काकांच नाव सांगितल आणि तुझा परत शोध सुरु झाला. पण काकांकडे फक्त तो एक निनावी कॉलच पुरावा म्हणून होता आणि तुझा जीव ही धोक्यात होता म्हणून तुला सपोर्ट राहावा यासाठी माझ ऍडमिशन तुझ्या शाळेत करण्यात आलं मला माहित आहे हे करत असताना माझा ही जीव धोक्यात असणार आई बाबांना ही या गोष्टीची कल्पना होती पण तरीही बाबांनी याची पर्वा न करता ऍडमिशन घेऊ दिल हा खर तर त्यांचा मोठेपणा आहे आणि फक्त त्यांच्या मुळे आपण आज फ्रेंड्स बनलो(थोडस थांबून) लहानपणा पासून मी तुला साथ देत आले जेव्हा जेव्हा शाळेत ती लोक यायची मीच काकांना