पुर्वसूत्र :

म्हणतात न. "प्रत्येक अंधाराच्या खाईतून एक दिवस प्रकाशाची जोत निघतेच."

तसच अर्णव नी जितकं सहन केल होत त्यातून बाहेर काढायला मृण्मयी त्या घरात राहायला आली होती.

आता पुढे...

वर्तमानात...

वेळ सकाळी ९ वाजताची...

रामदिन निरोप घेऊन येतो.

"बाईसाहेब, तुम्हाला आमच्या मालकांनी बंगल्यात बोलावलय चला." रामदिन

"गाडी." मृण्मयी

"पार्किंगला लावा. इथे." रामदिन

मृण्मयी गाडी पार्क करते. आणि गार्डबरोबर बंगल्यात येते  व एकदा पूर्ण बंगल्यावरून नजर फिरवते. तीला अर्णवचा एक फुटबॉल वर पाय ठेऊन उभा असलेला फोटो दिसतो आणि ती त्या फोटोला पाहून मोहित होऊन जाते. व मनाशीच पुटपुटते.

"हाच आहे तो 'माझा जिवलगा' थँक यु सो मच युनिव्हर्स थँक यु सो मच." मृण्मयी

एवढ बोलताच एक मधुर संगीत वाजायला लागत आणि ती त्यात हरवून जाते.

काही क्षणा नंतर...

"हॅलो, तो माझा पुतण्या आहे अर्णव कॉलेजमध्ये असताना फुटबॉल खेळायला आवडायचं त्याला पण एका ऍक्सीडेंट मध्ये त्याच्या पायाला दुखापत झालीये तेव्हापासून तो जे खोलीत बंद आहे ते बंदच स्वतःला सगळ्यांपासून दूर केलय त्यानी एनीवे तु खोली बघायला आलीस का." संपत

"अं, हो पण ही ऍड तर अर्णव नी दिली न मग..." मृण्मयी

"खर तर हे सगळ अर्णव च आहे मी संपत अर्णवचा काका. त्याच्या पाया मुळे त्यानी आपला आत्मविश्वास गमावलाय म्हणून हे सगळ मला बघावं लागत. लहानपणी त्याचे आईवडील त्याला माझ्या झोळीत टाकून देवाघरी गेले तेव्हापासून मीच संभाळतोय त्याला. हे सगळ त्याच आहे म्हणून ऍड देखील त्याच्याच नावाने दिली होती." संपत

"ओह सो सॅड, आय एम सॉरी. बरं बंगला तर चांगला आहे आणि जस मला हव होत घर ही तसच आहे. पण खोली बघता येईल का मला." मृण्मयी

"हो...हो का नाही चल तुला खोली दाखवतो." संपत

दोघ  गप्पा मारता मारता खोलीकडे जातात.

"तुला या बंगल्यात कसलाच त्रास होणार नाही. इथे अगदी सगळ्या सुख सोयी आहेत. एवढच की मी मात्र दुसरीकडे रहातो तेव्हा तुला कधी ही कसली ही गरज वाटली तर लगेच फोन करायचा मी येऊन जाईन." संपत

"काय म्हणजे अर्णव इथे एकटा रहातो. तुम्ही इथे नसता?" मृण्मयी

"एकटा कशाला राधा ताई सतीश दादा आहेत की ते या घराचे फक्त केअरटेकर नाहीत तर खरी काळजी तेच घेतात या बंगल्याची आणि अर्णवची सुद्धा. त्याच काय आहे अर्णवला लोकांमध्ये मिसळून राहायला आवडत नाही त्याला भीती वाटते लोकांची त्यामुळे जेव्हा एखाद चेकअप असेल त्याच किंवा काही खाजगी काम असेल तरच मी इथे येतो पंधरा दिवसातून एकदा चक्कर असते माझी. मला त्याला जास्त त्रास द्यावासा वाटत नाही न म्हणून राधा ताईंच मात्र चांगल ऐकतो तो म्हणून त्यांच्यावरच त्याची जबाबदारी सोपवलीये. चल खोली दाखवतो." संपत

दोघ बोलता बोलता खोली जवळ येतात. संपत खोलीच कुलूप उघडून खोली दाखवतो आणि मृण्मयी खोलीत जाऊन एकदा खोलीवरून नजर फिरवते. तेवढ्यात तीला खोलीत सी सी टीव्ही कॅमेरा लावलेला दिसतो व ती संपत ला त्या बद्दल विचारते.

"इथे बंगल्यात पाऊल ठेवताच मी प्रत्येक ठिकाणी सी सी टीव्ही कॅमेरे लावलेले बघितले आणि आता या खोलीत सुद्धा याच कारण समजू शकेल का मला." मृण्मयी

"ते आमच्या सेफ्टी साठी लावले आहेत काळजी करण्यासारख काही नाही त्याच काय आहे हा बंगला तसा निर्मनुष्य ठिकाणी आहे न इथे फारस कुणी येत जात देखील नाही त्यामुळे एक सेफ्टी असावी म्हणून बस." संपत

"अच्छा पण या खोलीतले सगळे कॅमेरे काढून टाका आजच्या आज त्याच काय आहे मला माझी प्रायव्हसी खूप महत्वाची आहे. आणि मी एक लेखिका आहे म्हणून मी हे घर निवडलय मला कुठलाही डिस्टर्बन्स नकोय सो हे कॅमेरे आजच निघाले तर बर होईल." मृण्मयी

"म्हणजे तुला खोली आवडली अस समजू मी." संपत

दोघ गप्पा मारत मारत खाली येतात.

"हो मला खोली आवडली आहे आणि मी आजच शिफ्ट होतीये. तुम्ही ऍड मध्ये ११ महिन्याच्या करारा बद्दल बोलला होतात तो करार देखील लवकर आपण करून घेऊत. हे तुमचं ऍडव्हान्स." मृण्मयी

मृण्मयी संपतला ऍडव्हान्स देते आणि खोली कडे निघू लागते. तेवढ्यात संपत अडवतो

"एक मिनिट एवढी मोठी बॅग तु कुठे घेऊन जातेस थांब सतीश घेऊन जाईल त्याला सांगतो." संपत

"नाही इट्स ओके जाईन मी घेऊन उगीच कशाला त्यांना सांगताय." मृण्मयी

"अग त्यात काय त्याच कामच आहे ते थांब." संपत

"सतीश तेवढी बॅग खोली पर्यंत घेऊन जा आणि कॅमेरे काढून टाकण्याची व्यवस्था करा." संपत

आवाज देताच सतीश धावत येतो आणि मृण्मयी ला मदत करू लागतो. लगेच संपत राधा ताईंना देखील आदेश देतो.

"राधा ताई या आपल्या बंगल्याच्या नव्या पेंगेस्ट आहेत यांना काय हव काय नको हे बघणं तुमचं काम (मृण्मयीला ) आणि तुला कसली ही गरज वाटली तर मला ही सांगु शकतेस बर मी आता पंधरा दिवस इथे नाहीये तेव्हा निश्चिन्त रहा काय येतो मी." संपत

संपत सतीश आणि राधा ताईंना आपापल्या जबाबदाऱ्या सांगून व मृण्मयी ला भेटून निघून जातो तर सतीश मृण्मयी च सामान तिच्या खोलीत पोचवायला मदत करतो दोघ ही खोलीत प्रवेश करतात. आणि सतीश मृण्मयी ला विचारतो.

"बाईसाहेब तुम्हाला अजून काही हवय का?" सतीश

"नको दादा लागलं तर सांगेन मी पण सध्या नको." मृण्मयी

"ठिक आहे काही लागलं तर सांगा मी इथेच आहे" सतीश

सतीश मृण्मयी ला सांगून निघून जातो आणि मृण्मयी फ्रेश व्हायला वॉशरूम मध्ये जाते ती एकदा सगळीकडे चेक करते व मनाशीच पुटपुटते.

"थँक गॉड इथे नाहीये." मृण्मयी मनाशीच बोलते.

आणि फ्रेश होऊ लागते.

काही वेळा नंतर...

आपल आवरून मृण्मयी बॅग रिकामी करत खोली आवरते. आणि काही वेळा नंतर खोली बाहेर येते. तेवढ्यात राधा ताई सकाळचा नाश्ता एका खोलीत घेऊन जात असतात. तोच मृण्मयी त्यांना विचारते.

"राधा ताई नाश्ता कुणाला घेऊन जात आहात अर्णव ला?" मृण्मयी

"हो, ताई साहेब. त्यांच्या साठीच घेऊन जात आहे." राधा ताई

"मी येऊ का तुमच्या बरोबर?" मृण्मयी

"ताई साहेब, मला माहित नाही साहेबांना कस वाटेल ते लगेच घाबरतात कुणाला ही." राधा ताई

"तुम्ही तर असाल न बरोबर मला फक्त एकदा भेटायचं आहे त्यांना प्लिज." मृण्मयी

"ठिक आहे मर्जी तुमची बघा फक्त त्यांना त्रास होईल अस काही होऊ देऊ नका." राधा ताई

"नाही नाही त्यांना काही त्रास होणार नाही तुम्ही काळजी करू नका मी लांबूनच भेटेन त्यांना." मृण्मयी

"ठिक आहे या खोलीत." राधा ताई

खोलीच दार उघडताच दोघी ही खोलीत येतात. अर्णव जवळ आधी राधा ताई जातात आणि अर्णवला नाश्त्याची डिश देऊ लागतात तेवढ्यात मृण्मयी खोलीत प्रवेश करते आणि एकदा खोलीच निरीक्षण करू लागते तीला समजत या खोलीत कॅमेरा लावलेला नाहीये तीला जरा आश्चर्य वाटत पण ती तस न दाखवता खोलीत येते आणि अर्णव जवळ येऊ लागते.

तेवढ्यात अर्णव ला तिची चाहूल लागते आणि तो खूप घाबरतो. तो व्हीलचेअर वर बसलेला असतो त्याला आपण काय कराव तेच समजत नाही आणि तो अचानक तिच्याकडे वळतो.

ते बघून मृण्मयी थोडीशी अजून पुढे सरकते तीला अर्णवशी बोलायचं असत पण अस तीला अचानक आलेलं पाहून तो अजून घाबरतो आणि जवळ ठेवलेला चाकू हातात घेत घाबरलेल्या स्थितीतच तीला म्हणतो.

"तु.. तु.. माझ्या जवळ नको येऊस हं मी स्वतः ला मारून घेईन नाही मी तुला मारेन तु जवळ नको येऊस दूर हो. (डोळ्यात पाणी आणत) आता शक्ती नाहीये माझ्यात प्लिज मला काही करू नकोस. (राधा ताईंना) ताई कोण आहे ही हिला दूर करा माझ्या समोरून प्लिज." अर्णव

"हो... हो... अर्णव सर अस घाबरू नका मी काही करणार नाही तुम्हाला जातीये मी इथून टेन्शन घेऊ नका हं जाते मी." मृण्मयी

मृण्मयी आणि राधा ताई खोलीतून बाहेर येतात अर्णव च अस वागण तीला काळजीच वाटत आणि ती राधा ताईंना विचारते.

"ताई हे काय आहे अहो अर्णव सर इतक लोकांना घाबरतात." मृण्मयी

"बघितल न तुम्ही म्हणून सांगत होते तुम्हाला काय त्यांच्या नशिबात वाढवून ठेवलय देवच जाणे हसते बोलते आमचे छोटे साहेब त्यांची अशी हालत करून टाकलीये न या साहेबांनी (मध्येच थांबत) साहेब? हे बघ बेटा मी जे काही बोलून गेले ते विसरून जा आणि तुझ्या कामावर लक्ष दे त्यांना त्यांच्या परिस्थिती वर सोड देव भलं करेल तुझ." राधा ताई भीतीने सांगतात.

"काय सांगताय तुम्ही ताई मला सांगा सर नीट झाले तर आवडणार नाही का तुम्हाला काळजी करू नका जे आहे ते सगळ मला सांगा मी ठिक करेल सगळ अहो अडचणी येतात आयुष्यात पण म्हणून खचून जायचं नसत अस होईल ठिक सगळ सांगा मला." मृण्मयी

"बेटा अर्णव साहेब अगदी लहान होते न तेव्हा पासून मी बघतीये त्यांना ते ठिक झाले तर कुणाला आवडणार नाही पण ज्याची आशाच नाहीये त्याची स्वप्न बघून काहीच फायदा नसतो ते जर शक्य असत न तर आधी मी स्वतः प्रयत्न केला असता जाऊ दे बेटा तु तुझा आणि त्यांचा जीव धोक्यात नको टाकूस आम्हाला आमच्या परिस्थिती वर सोड." राधा ताई

"हे बघा ताई तुम्ही जर मला सगळ सांगितलंत तर माझी मदतच होईल तुम्हाला आणि राहिला प्रश्न जीव धोक्यात टाकण्याचा तर जीथे सत्याची तलवार असते न तीथे कोणी कितीही काहीही करो वाकड नक्कीच करू शकत नाही तेव्हा निश्चिन्त व्हा आणि मला सांगा घाबरू नका." मृण्मयी समजावून सांगते.

तिच्या बोलण्यातून राधा ताईंना एक आशेचा किरण दिसतो त्यांना जाणवत आता नक्कीच अंधार दूर होऊन एक प्रकाशाची ज्योत दिसेल आणि अर्णव साहेबांच्या आयुष्यातला अंधार दूर होईल. राधा ताई असा विचार करतात त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असत आणि त्याच समाधानात त्या खरी कहानी सांगु लागतात.

क्रमशः...

चला मृण्मयी ला एक छानशी खोली मिळते. आणि अर्णवची भेट देखील होते. आता पुढे काय संपत ला समजेल का राधा ताईंचा धोका आता अर्णव चा जीव परत धोक्यात येईल की काही तरी वेगळ घडेल बघुत यांच्या लव स्टोरीतील पुढील भागात