माझा जिवलगा (भाग - 19)'s image
23K

माझा जिवलगा (भाग - 19)

पूर्वसूत्र

मृण्मयी आणि अर्णव दोघ नाश्ता करतात. नाश्ता झाल्यावर मृण्मयी आणि सतीश दादा अर्णवला आपल्या खोलीत घेऊन येतात नंतर मृण्मयी बाहेर निघून जाते.

आता पुढे...

यशोदीप कॅफे...

टेबल नं १६ वर जागृती आधीच मृण्मयीची वाट बघत बसली होती तीला कसली तरी अनामिक भीती वाटत होती आणि ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत.

तीची नजर एकसारखी भीतीने कुणाचा तरी शोध घेत होती. आणि त्यातच तीला मृण्मयी येताना दिसली. आणि तिचा जीव भांड्यात पडला.

"काय ग तुला फोन वरूनच मी विचारलं होत न अशी घाबरलेली का दिसत आहेस? सगळ ठिक आहे न." मृण्मयीने खुर्चीवर बसत तीची चौकशी केली.

"काही गोष्टी अश्या असतात मृण्मयी ज्या फोन वर बोलता येत नसतात म्हणून तुला फोनवर काही सांगितल नाही. मला तर बिचाऱ्या अर्णवची काळजी वाटते इतके वर्ष त्याने सगळ कस सहन केल असेल." गायत्री

"तुला काही समजल आहे का त्या मुला बद्दल." मृण्मयी

"हो, बरच काही तो दिवस आमच्या कॉलेजच्या रियूनियन पार्टीचा दिवस होता. आम्ही सगळे जण त्या पार्टीतच होतो अगदी मी सुद्धा ती पार्टी बऱ्याच वेळ चालली होती पण अचानक डान्स फ्लॉवर वर दोन मुलांमध्ये भांडण सुरु झाल त्याच नेमक कारण त्यावेळी समजल नाही कुणाला पण जेव्हा पोलीस तीथे पोहोचले तेव्हा ज्या मुलाचा दोष न्हवता त्यालाच अटक करण्यात आली त्यावरून खूप राडा ही झाला होता पार्टीत. आम्ही खूप विनवण्या केल्या होत्या पोलीसांना अगदी आमच्यातले बरेच जण त्याला सोडवायला पोलीस्टेशन ला ही गेले होते. त्या मुलांमध्ये अर्णव ही होता मला आज ही आठवतय सगळ्यांना हॉस्टेलवर पोहोचायला सकाळ झाली होती. त्याच पार्टीला तो मुलगा ही आला होता पण त्याच नाव आम्हाला कुणालाच माहित नव्हत आमचं कॉलेज संपल ती पार्टी झाली आम्ही त्या घटनेला विसरून ही गेलो होतो. पण त्या दिवशी तु एकदम विचारलस तेव्हा मी न रहावून जुन्या बॅचेस च रेकॉर्ड काढलं आणि चेक केल तर हा फोटो आणि त्याच्या घराचा ऍड्रेस मिळाला." फोटो आणि ऍड्रेस देत गायत्री ने सांगितलं.

तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट जाणवत होती. न रहावून मृण्मयी ने परत तीला विचारलं.

"ओह, गायत्री तुला कुणाची भीती वाटत आहे का? मी तुला मदत मागून तुझा जीव तर संकटात टाकला नाही न?" मृण्मयीनी काळजीने विचारलं.

"मृण्मयी खर तर मी तुला सांगायला पाहिजे की नको कळत नाहीये मला." गायत्रीने ही काळजीच्या स्वरात सांगितल.

"हे बघ तु मला अगदी मन मोकळेपणाने सांगु शकतेस (थोडस थांबून). मला एक सांग तुझ्या कुणी पाळतीवर आहे का? मी तुला भेटल्यापासून बघतीये तु मला घाबरलेली दिसत आहेस प्लिज जे असेल ते सांग." गायत्रीच्या हातावर हात ठेवत मृण्मयीने विचारलं.

"पंधरा दिवसा पूर्वी तु मला भेटून गेल्या पासून मला सारखं अस वाटतय कुणी तरी माझा सारखा पाठलाग करतय." गायत्री

"अग मग माझ्याशी शेअर का नाही केलस तु हे." मृण्मयीने विचारलं

"मला वाटल माझ्या मुळे तु ही संकटात पडशील मी घाबरलेली होते पण तुला हेल्प करेन अस ही म्हणाले होते त्यामुळे तपास लावला मी बर मी निघते आता तु तुझी काळजी घे हं चल बाय." गायत्री

गायत्रीने तीला ऍड्रेस आणि फोटो दिला आणि निघून गेली.

"आता खूप झाल आहे याच आता मला माझ खर रूप याला दाखवायलाच हव आता संपत सुटणार नाही खूप लोकांना यांनी त्रास दिलाय याचा पापाचा घडा आता भरला." मृण्मयी सगळ आठवून मनाशीच पुटपुटली.

आणि कॅफेतून निघून गेली.

काही वेळा नंतर...

गुलमोहर चाळ...

"दादा, ही खोली सांगु शकाल का.?" मृण्मयी

आपल्या कार मधूनच तीने एका व्यक्तीला खोली बद्दल विचारलं.

"हो चला मी स्वतः घेऊन चलतो तुम्हाला." एक अनोळखी व्यक्ती.

मृण्मयी आपल्या कार मधून उतरली आणि खोलीच्या दिशेने निघाली.

काही वेळा नंतर...

"ही बघा ही आहे खोली." व्यक्तीने खोली दाखवत सांगितल

ती व्यक्ती खोली दाखवून निघून गेली. आणि मृण्मयीने दारावर नॉक करत विचारलं.

"हॅलो कुणी आहे का घरात?" नॉक करून तीने विचारलं.

त्यावेळी तो मुलगा घरातच होता तीला बघताच तो म्हणाला.

"या ना कोण आपण? आपण या आधी भेटलोय का." तो मुलगा

"नाही आपण पहिल्यांदाच भेटतोय तु विश्वरूप कॉलेजचा विध्यार्थी आहेस न." मृण्मयी

कॉलेजच नाव काढताच तो जरा गांगरला अचानक त्याला सगळ्या जुन्या आठवणी आठवून गेल्या आणि त्याच अवस्थेत त्याने मृण्मयीला घरातून हाकलण्याचा प्रयत्न केला.

"मला घालवून तुझे प्रश्न सुटणार असतील तर तु बोलण्या आधीच मी निघून जाते मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण खरच यानी तुझा त्रास कमी होणार आहे का." मृण्मयीने दार उघडत विचारलं

आणि सरळ घरात आली.

"ताई तुमचा नेमका काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी इथे सुखरूप आहे हे पहावत नाहीये का? हे बघा मी आधीच खू

Tag: प्रेमकथा और2 अन्य
Read More! Earn More! Learn More!