
पुर्वसूत्र :
काही वेळा नंतर...
त्याला लॅब मधून बाहेर आणतात मृण्मयी तोपर्यंत गोळ्या घेऊन येते आणि दोघ ही घरी परतात.
आता पुढे...
काही वेळा नंतर...
मृण्मयी कृष्णाई बंगल्यावर परत आली तीने आपली कार नेहमीच्या ठिकाणी लावली आणि अर्णवला व्हीलचेअर वर बसवून बंगल्यात घेऊन गेली.
"बाप, रे काय गर्दी होती क्लिनिकमध्ये पण बर झाल डॉक्टर बाबांचे स्टुडन्ट होते त्यामुळे लवकर नंबर लागला." मृण्मयी
"बर काय म्हणाले मग डॉक्टर काळजी करण्यासारखं नाही ना काही." राधा ताई
मृण्मयीने पाण्याचा ग्लास घेतला आणि पाणी पिता पिता बोलु लागली.
"अजिबात नाही काहीच काळजी करण्यासारखं नाहीये आपण टेस्ट केल्या आहेत आता जस रिपोर्ट येईल पुढची प्रोसेस काय असेल ते ठरेल तोपर्यंत काही गोळ्या दिल्या आहेत त्या कंटीन्यु ठेवायला सांगितल आहे." मृण्मयी
"देवा खूप खूप आभार तुमचे मी देवासमोर साखर ठेऊन येते." राधा ताई
राधा ताईंनी दोघांच्या हातातला ग्लास घेतला आणि देवासमोर साखर ठेवायला गेल्या.
"सतीश दादा चला अर्णव ला रूम मध्ये नेऊत." मृण्मयी
दोघांनी व्हीलचेअर उचलली आणि खोलीत नेली.
काही क्षणा नंतर...
"तु आराम कर आज तुला लिहायला ही सुरवात करायची आहे न." मृण्मयी.
"हो आज बघायचच आहे लिहायला सुरवात करून पाहु काय होत ते." अर्णव
"मला एक सांग तुला नेमक काय लिखाण करायचय म्हणजे तुझ्या बुक च टॉपिक काय आहे काही तरी विचार केलाच असेल न तु." मृण्मयी
"मला तेच तर सुचत नाहीये ग पण पुस्तकं लिहायचं आहे एवढ नक्की." अर्णव
"बर, तुला एक सांगते आपले डोळे बंद कर एक दीर्घ श्वास घे आणि शांत राहून विचार करण्याचा प्रयत्न कर मनात डोकावून बघ कुठला शब्द किंवा चेहरा येतोय तुझ्या समोर ते बघण्याचा प्रयत्न कर हे बघ ज्या वेळी आपण आपल कुठलं ही पाहिलं साहित्य लिहायला सुरवात करतो न आणि नेमक आपल्याला काही सुचत नाही आपल्याला पहिल्याच टप्प्यात एक इतिहास घडवणार साहित्य लिहायचं असत पण जेव्हा आपल्याला काही सुचत नाही तेव्हा आपला आत्मविश्वास डगमगू लागतो आणि नेमक याच वेळी ही टेक्निक कामी येते. समजल इमॅजिन करून बघ की तुझ पाहिलं पुस्तकं प्रकाशित झालेल आहे अगदी डिटेल्स मध्ये बघायचा प्रयत्न कर जस तु आणि बरेच मान्यवर तुझ्या पुस्तकाची रिबीन सोडत आहे सगळे जण पुस्तक प्रेक्षकांना दाखवत आहेत टाळ्यांचा गजर ऐकायचा प्रयत्न करून बघ त्या पुस्तकावरील नाव बघण्याचा प्रयत्न कर आणि तुला जो पर्यंत स्पष्ट नाव दिसत नाही तोपर्यंत हे इमॅजिन करण्याचा प्रयत्न तुला करायचा आहे जेव्हा तुला एखाद नाव दिसेल तेच तुझ्या पुस्तकाचे नाव असेल अश्याच पद्धतीने पुढे मग पुस्तकाच्या कंटेन्ट चा ही तु विचार करू शकतोस. या टेक्निक मुळे तुला सकारात्मक विचार करण्यात ही मदत मिळेल." मृण्मयी
अर्णवने तिची प्रत्येक गोष्ट अगदी मन लावून ऐकली आणि मन शांत करून इमॅजिनेशन करण्याचा प्रयत्न करू लागला.
काही वेळा नंतर...
अर्णव इमॅजिनेशन करू लागला. तस त्याला अंधुकस दिसायला लागलं तो अजून डीप मध्ये बघण्याचा प्रयत्न करू लागला त्यामुळे त्याच्या मनातल्या नकारात्मक भावना कमी होऊ लागल्या त्याने अगदी तसच केल जे त्याला मृण्मयी ने सांगितल होत. त्याने मेडिटेशन संपवले आणि हळूच आपले डोळे उघडले.
त्याच मेडिटेशन होई पर्यंत मृण्मयी तिथेच बसली होती त्याने आपले डोळे उघडताच तीने त्याला विचारलं.
"मग कस वाटल मेडिटेशन करून?" मृण्मयी
"खूपच छान मला या आधी असा अनुभव कधीच आला नव्हता मला जाणवतय या मेडिटेशन नी मला खू