
पुर्वसूत्र :
"मी जागृती." रिसेप्शनीष्ट सांगते
"नाईस खूप छान नाव आहे तुझ बर चल मी निघते." मृण्मयी म्हणते
एवढ बोलून मृण्मयी कॉलेजमधून बाहेर पडते.
आता पुढे...
काही वेळा नंतर...
कृष्णाई बंगला...
मृण्मयी बंगल्यावर परत येते राधा ताई हॉल झाडत असतात आणि सतीश दादा किचन मध्ये असतात तोच मृण्मयी येते.
"अग थांब थांब मी हॉल झाडतीये. दोन मिनिट." राधा ताई झाडता झाडता म्हणतात.
"उप्स, सॉरी सॉरी." पाय मागे घेत मृण्मयी म्हणते.
आणि ती थोडीशी मागे सरकते.
राधा ताईंच झाडून झाल्यावर...
"हं आता ये आत. काय ग कुठे गेली होतीस इतक्या सकाळी." राधा ताई विचारतात.
"माझ एक महत्वाच काम होत म्हणून जाऊन आले बाहेर बर आता येऊ का घरात." मृण्मयी विचारते.
आणि बंगल्यात येते.
"बर मी आपल्या खोलीत जातीये मला ही थोड लिखाण करायला सुरवात करायची आहे तुम्हाला काही लागलं तर मला आवाज द्या मी लगेच येईन हं." मृण्मयी बोलते.
आणि लगेच आपल्या खोलीत निघून जाते.
तीला आज लिखाणाला सुरवात करायची असते त्यामुळे ती पटकन आपल आवरते आणि लिहायला बसते. अर्णव ही आज आपल्या खोलीत आपल्याला काही सुचत का याचा विचार करत बसलेला असतो.
तोच मृण्मयीला डॉ. विक्रांतचा फोन येतो.
एक सुंदर फ्लूट म्युझिक वाजत आणि लगेच मृण्मयी फोन उचलते.
"हॅलो, बोल विक्रांत" लिहायला बसत मृण्मयी म्हणते.
"अग आठवण करून द्यायला फोन केला तुला येणार आहात न दोघ " डॉ. विक्रांत
"आई शप्पत! मी जाम विसरून गेले होते. बर झाल तु आठवण करून दिलीस आज फ्री आहेस न तु?" मृण्मयी
"हो मग वाट पहात होतो मी तुमची या लवकर म्हणजे पुढच ठरवता येईल." डॉ. विक्रांत
"हो येतो चल मी फोन ठेवते आणि थँक्यु सो मच." आभार मानून मृण्मयी फोन ठेवते.
आणि लगेच अर्णव च्या खोलीत जाते. अर्णव जरा विचारमग्न असतो तोच मृण्मयी येते.
"अर्णव बिझी आहेस का?" नॉक करत मृण्मयी विचारते.
"अरे ये की तुला कधी पासून नॉक करण्याची गरज पडली." अर्णव डायरी पेन ठेवत म्हणतो.
"काय करत होतास काही लिखाण सुरु होत की काय तुझ? अरे वाह म्हणजे सुरवात झाली तर." आनंदाने मृण्मयी म्हणते.
"कसल काय ग कॉलेजमध्ये इतक लिहायचो पण आता एक शब्द सुचत नाहीये मला तु बोल तु ही लेखिका आहेस मग सध्या सुरु आहे की नाही काही." अर्णव विचारतो
"अरे तेच सुरु होत माझ पण तेवढ्यात डॉ. विक्रांतचा फोन आला म्हणून तुला सांगायला आले आपल्याला निघायचय डॉक्टरांकडे." मृण्मयी
"ओह अच्छा हो का. मग मी तयार होतो." अर्णव म्हणतो.
"अर्णव मी हेल्प केली तर चालेल का.?" मृण्मयी
"हे काय विचारण झाल का मृण्मयी? आपण चांगले फ्रेंड्स आहोत (थोडस थांबून) कदाचित त्यापेक्षा जास्त. तुला फॉर्मल वागण्याची गरज नाहीये." तिचा हात पकडत अर्णव सांगतो.
तीला तो स्पर्श जरा वेगळा वाटतो आपलासा वाटतो. ती किंचित लाजते आणि आपला हात काढून घेते व स्माईल करून त्याची मॅडम करू लागते.
काही वेळा नंतर...
"सतीश दादा " मृण्मयी दादांना जिन्यातून आवाज देते
तोच धावत सतीश दादा तिच्या समोर येऊन उभे राहतात.