पुर्वसूत्र :

"अरे वाह आज जुना अर्णव दिसला आम्हाला तोच अंदाज तेच सूर तीच स्टाईल मान गये बॉस." शार्दूल आनंदाने म्हणतो.

आणि सगळे एकदम सगळे हसू लागतात.

आता पुढे...

"कही म्हण हं पण मृण्मयी रोजडे ला गेटटुगेदर ठेऊन तु आमचा व्हॅलेंटाईन्स डेच आठवून दिलास तुला सांगतो प्रत्येक रोजडे ला जर कुणाला सगळ्यात जास्त रोजेस मिळायचे न तर ते अर्णवला आम्ही मूल काय करायचो माहितीये? कुणाला किती रोज मिळाले आणि त्यातून लाल रोज किती मिळाले हे चेक करायचो गुलाबाची फुल मोजून आणि ज्याला जास्त मिळायची त्याच्याकडून पार्टी घ्यायचो आणि ते डिपार्टमेंट अर्णव कडेच होत. तुला सांगतो याला गुलाब देण्याच्या लिस्ट मध्ये या सुंदर्या ही शामिल असायच्या म्हणजे आमच्या ग्रुप मध्ये तर हा फेमस होताच पण पूर्ण कॉलेजमध्ये सुद्धा फेमस होता." विद्युत त्याच कौतुक करत सांगतो

"हो, न अर्णव कॉलेज मध्ये आला की सगळ्या मुली घेरून घ्यायच्या त्याला आम्हाला तर सांगावं लागायचं त्याला बाळा रे झाल का तुझं सगळ." सिद्धीका सांगते.

हे ऐकताच सगळे हसू लागतात. तोच अर्णव म्हणतो.

"सिद्धी तु तर माझी इमेजच बदलून टाकलीस की" हसून अर्णव म्हणतो.

"अरे ही तर चांगली इमेज आहे अरु तुझ कौतुक करत होते मी. मृण्मयी तु आता पहिल्यांदाच आमच्या ग्रुपची मेंबर झाली आहेस आधी आपण ५ जण होतो आता ६ जण झाले आहोत तेव्हा तुला आमच्या सगळ्याबद्दलच सगळ माहिती असायला हव हं खूप किस्से आहेत आमच्या ग्रुपचे सांगेन कधीतरी." हसून सिद्धीका म्हणते.

"हो हो सगळ्यात जास्त तर हिचेच आहेत." दुजोरा देत शार्दूल म्हणतो.

आणि सगळे परत हसू लागतात.

सगळ्यांच्या गप्पा सुरु असतात तोच राधा ताई येतात आणि म्हणतात.

"चला खूप झाल्या गप्पा आता पेटपूजा करून घ्या." स्नॅक्स लावत राधाताई म्हणतात.

आणि लगेच सगळे हजर होतात.

"अरे राधा ताईंच्या हातचा स्नॅक्स मज्जाच आहे किती वर्षानी हे दिवस आले बघा तुम्हाला आठवत राधा ताई परीक्षा असली की आम्ही इथे किती धुमाकूळ घालायचो आणि थकलो की मग तुमच्या हातचा गरमागरम वाफाळलेला चहा ते ही आल्याचा आणि मस्त पोहे वाह मग आज काय बेत आहे." शार्दूल विचारतो.

"आज  वडापाव, सामोसा, मुगभाजी, जिलबी आणि पाणीपुरी  आणि सॉफ्ट ड्रिंक्स आहेत मस्त ताव मारा सगळे पोटभर खा काय आज तुमचा दिवस आहे मज्जा करा." राधा ताई म्हणतात

आणि घरात निघून जातात...

सगळेच आनंदाने त्यावर ताव मारतात.

कही वेळा नंतर...

वेळ रात्रीची...

९ : ३० वाजताची...

सगळेच अर्णवचा निरोप घेतात. जाता जाता शार्दूल म्हणतो.

"मृण्मयी आम्हाला सगळ्यांना आजचा दिवस खूपच आठवणीत राहील तुझ्यामुळे आम्ही इतक एंजॉय करू शकलो थँक्यु यार नेहमी आमच्या अर्णव बरोबर असच रहा. आणि माझा नंबर तर आहेच तुझ्याकडे कधी ही वाटलं तर कॉल कर मी लगेच येईन हेल्प करायला." शार्दूल म्हणतो.

तोच सगळे अर्णवला भेटून निघून जातात. आणि अर्णव व मृण्मयी दोघ थोड्यावेळ गप्पा मारत बसतात.

"मग! लेखन ब्लॉक गेला सुचलं काही लिहायला?" स्माईल करत मृण्मयी विचारते.

"अजून सुचलं तर नाही पण एक आत्मविश्वास नक्कीच आलाय स्वतः मध्ये करेन मी लिहायचा प्रयत्न. आणि थँक्यु सो मच तु मला माझे फ्रेंड्स परत मिळवून दिलेस. ए पण हे सगळ सुचलं कस काय तुला.?" अर्णव विचारतो

"काही नाही रे मला ही लेखन ब्लॉक आला की मी सरळ बाहेर फेरफटका मारायला जाते मस्त फ्रेंड्सना भेटते गाणी ऐकते अगदी फास्टफूड खायला सुद्धा बाहेर पडते बस मग काय तिथेच कुठली ना कुठली थीम सुचते आणि मग लिहायला मी सुरवात करते. आणि ते लिखाण नंतर इतक छान होत न काय सांगु आता इथून पुढे तु ही असच कर कधी फ्रेंड्स ची आठवण झाली किंवा लिखाणाचा कंटाळा आला की सरळ फ्रेंड्स ना कॉल करत जा तुला नक्कीच मोटिवेशन मिळेल काय." मृण्मयी म्हणते

"हं खरय तुझ. बर चल खूप वेळ झाला न आपण घरात जाऊत." अर्णव म्हणतो

लगेच मृण्मयी सतीश दादांना बोलावून घेते आणि दोघ मिळून अर्णव ला खोलीत घेऊन येतात.

अर्णवच्या खोलीत...

"चल तुझ आवरून देते." मृण्मयी

अर्णव या वेळी जरा वेगळ्याच विचाराने तीला म्हणतो.

"अं तु फक्त माझी हेल्प कर न मृण्मयी राग नको मानु मला जरा वेगळच वाटत." अर्णव समजावतो

"ओके करते हेल्प." ती स्माईल करते

आणि त्याला फक्त मदत करते तो स्वतः च स्वतः च आवरतो मृण्मयी त्याला बेडवर झोपवते आणि आपल्या खोलीत निघून जाते.

मैत्री झाल्या पासून अर्णवच्या आयुष्यात खूप काही घडलेलं असत त्याचा स्वतः वरचा विश्वास परत येत असतो मृण्मयी मुळे त्याच आयुष्य बदलत असत. आणि हेच आयुष्य आता त्याला आवडत ही असत.

इकडे... मृण्मयी ची परिस्थिती ही वेगळी नसते मृण्मयीला ही अर्णवचा स्वभाव आवडतं असतो फक्त दोघांना हे प्रेम आहे की मैत्री हे कळत नसत. दोघ ही एकमेकांसाठी सारखाच विचार करणारे असतात जस मृण्मयीला अर्णव साठी करावस वाटत असत तसच अर्णवला ही वाटू लागलं होत.

आता दोघ ही एकमेकांत गुंतत चालले होते. आणि हिच खऱ्या प्रेमाची एका अतूट नात्याची गोड सुरवात होती.

मृण्मयी आपल्या खोलीत येते आणि फ्रेश होऊ लागते. तिच्या मनात राहून राहून अर्णवचाच विचार येत असतो त्याच गाणं म्हणण गोड हसणं एकसारखं तिच्याकडे बघण ती त्याची नजर अगदी सगळ सगळ तिच्या डोळ्या समोर येत असत. आणि त्याच विचारात ती मनाशीच हसत ही असते.

काही वेळा नंतर...

मृण्मयी आपल आवरून झोपायची तयारी करते पण तिच्या मनात आणखी एक विचार सुरु असतो तो म्हणजे सीडीतल्या त्या मुलाचा राहून राहून तीला वाटत असत कुठे असेल तो मुलगा? काय करत असेल? ती लॅम्पचे बटण ऑन ऑफ करत विचार करत असते.

तीला सारखं वाटत असत जर त्या मुलाचा आपण शोध घेऊ शकलो तर आपल्या कडे संपत विरुद्ध एक भक्कम पुरावा तयार होईल आणि ती हाच विचार करून नेमक त्यासाठी आपल्याला कुठली पाऊले उचलता येतील याचा विचार करू लागते. आणि अचानक एका निर्णयावर येते.

ती सकाळी कॉलेजमध्ये जाऊन त्या मुलाची माहिती घेण्याचा निर्णय घेते आणि झोपते.

दुसऱ्या दिवशी सकाळी...

वेळ ९ : ०० वाजताची....

मृण्मयी अर्णव च्या कॉलेज मध्ये जाते आणि रिसेप्शन वर चौकशी करते.

"हाय, माझ नाव मृण्मयी आहे मला जरा तुमची मदत हवी होती." मृण्मयी

"हो बोला मी काय मदत करू शकते तुमची." रिसेप्शनीष्ट

"मॅम मला जरा जुन्या बॅचेस बद्दल जाणून घ्यायच होत. शार्दूल अर्णव कुलकर्णी ची बॅच." मृण्मयी

"ती बॅच? ती तर खूप जुनी बॅच आहे आणि सॉरी मॅम पण मी अस रेकॉर्ड कुणाला ही दाखवू शकत नाही." रिसेप्शनीष्ट

"मॅम प्लिज बघा न काही होत असेल तर माझ्यासाठी खूप महत्वाच आहे ते." मृण्मयी विनंती करते.

"काय नाव म्हणालात तुम्ही अर्णव कुलकर्णी. शार्दूल ची बॅच." मृण्मयी

"ओह आय सी खर तर मी ही त्याच बॅच ची आहे. पण माझा इतकासा त्यांच्याशी संबंध न्हवता. बर तुला कसली हेल्प हवी होती." रिसेप्शनीष्ट

"अग त्याकाळात एक मुलगा कॉलेज सोडून गेला होता जो परत आलाच नाही मला त्याच्या बद्दल माहिती हवीये मिळू शकेल का" मृण्मयी म्हणते.

"अं कॉलेज मधून तर नाही पण मी माहिती शोधून कडू शकते मला दोन तीन दिवस दे मी बघते काय करता येईल ते." रिसेप्शनीष्ट

"ओके थँक्स अ लॉट खरच खूप मदत होईल तुझी. तुझ नाव समजू शकेल का?" मृण्मयी

"मी जागृती." रिसेप्शनीष्ट सांगते

"नाईस खूप छान नाव आहे तुझ बर चल मी निघते." मृण्मयी म्हणते

एवढ बोलून मृण्मयी कॉलेजमधून बाहेर पडते.

क्रमशः...

काय त्या घटनेचा आणखी एक साक्षी आहे कोण आहे ती व्यक्ती आणि जागृती कोण आहे त्या मुलाची ती माहिती शोधू शकेल का बघुत पुढील भागात

कथा आवडतं असल्यास मला नक्की कमेंट करून कळवा आणि फॉलो करायला तसेच सब्स्क्रिप्शन घ्यायला विसरू नका.