पुर्वसूत्र :

त्याच्या डोळ्यात एक चमक असते आनंद असतो आयुष्य नव्याने जगण्याची उमेद असते तो कॉलेजच्या आठवणींमध्ये पूर्ण हरवलेला असतो. तोच मृण्मयी च त्याच्याकडे लक्ष जात तीला जाणवत त्याच्यातला होणारा बदल ते बघून ती मनातून एक स्माईल करते आणि लगेच भानावर येऊन सीडी बघु लागते.

आता पुढे...

सीडी बघत असताना कॉलेजच्या प्रत्येक आठवणी डोळ्या समोर येत होत्या जस काही प्रत्येकजण आपल कॉलेज लाईफ नव्याने जगत होत. त्यात मृण्मयी देखील मागे नव्हती तीला ही आपले कॉलेजचे दिवस आठवू लागतात आणि ती त्यात हरवून जाते.

तीला आपल्या कॉलेजमधले प्रत्येक क्षण आठवत असतात. गॅदरिंग मध्ये केलेला पहिला डान्स आपली फ्रेशर्स पार्टी रोजडे ला मिळालेले गुलाब लपून - छपून टीचर्स च्या केलेल्या खोड्या कॉलेज बंक करून पाहिलेले चित्रपट.

अश्या प्रत्येक आठवणीत ती हरवून गेली होती. आणि अचानक...

"वेट... वेट हा इथे काय करतोय? शार्दूल त्या दिवशी कॉलेज मध्ये कुणीच न्हवत न? कारण मला जितकं आठवत आहे सगळेजण पार्टीतच होते हॉस्टेल पूर्ण रिकामं होत मला आजही आठवतय त्या दिवशी खूप मोठा राडा ही झाला होता आपल्या पार्टीत. अगदी पोलिसांपर्यंत बातमी पोहोचली होती. आणि आपल्या पार्टीतल्या बऱ्याच जणांना दोन दिवसा साठी अटक ही करण्यात आलं होत आपण सगळेच जण त्यांना सोडवायला पोलिस्टेशनलाच थांबलो होतो. अगदी सकाळ झाली होती तरी सोडल नव्हतं त्यांनी. मग हा कुणाला भेटायला आला होता." अर्णव आश्चर्याने विचारतो.

अर्णवचा आवाज ऐकताच मृण्मयी भानावर येते.

"हो रे, हे तर आपल्या लक्षातच आलं नाही. त्या दिवशी मी स्वतः हॉस्टेल चेक केल होत कुणी राहील तर नाही असा विचार करून पण हा इथे कसा?" शार्दूल ही विचार करत म्हणतो.

"यस आठवलं, अरे तो नवीन मुलगा आला होता बघ कॉलेजला त्या दिवशी तो पार्टीतून  बाहेर पडला आणि नंतर पार्टीत परत दिसलाच नाही आणि नंतर समजल तो त्याच रात्री कॉलेज सोडून गेला होता. जो परत आलाच नाही." विद्युत म्हणतो

"विद्युत तुला नेमक काय म्हणायचय? काकानी त्याला काही केल असेल?" आश्चर्याने अर्णव विचारतो

"अरे मला अस म्हणायचं न्हवत यार तु उगीच गैरसमज नको करून घेऊस?" विद्युत समजावतो.

"नाही अरे तु म्हणतोयस त्यात गैर काहीच नाहीये अस होऊ ही शकत त्याचा स्वभावच आहे तो जो सख्ख्या भाच्याचा होऊ शकला नाही तो त्याचा काय होणार पण तु जे बोललास ते जर खरच असेल तर हा खूप मोठा गुन्हा आहे या गुन्ह्याची त्याला शिक्षा व्हायलाच हवी." अर्णव म्हणतो.

अर्णव च्या मनात त्यावेळी राग असतो आणि त्या मुलाच्या कुटुंबाची काळजी ही असते तो विचार करत असतो त्या मुलाच्या आई बाबांचं भावांडणाचं काय झाल असेल त्या मुलाचं काय झाल असेल? असेल का तो जिवंत की काही घडल तर नसेल न त्याच्या आयुष्यात.

तोच एकक्षण त्याच्या परत आपल संपूर्ण आयुष्य डोळ्या समोर येत आणि तोच तो एकदम आपले डोळे बंद करून घेतो. मृण्मयीला हे समजायला वेळ लागत नाही ती लगेच वातावरणात बदल करायचा म्हणून बोलते.

"अरे यार हे काय टॉपिक घेऊन बसला आहात तुम्ही? तुम्ही इतक्या वर्षानी भेटला आहात सगळे छान मस्त नवीन आठवणींनी या संध्याकाळला मंत्रमुग्ध करायचं तर जुन्याच आठवणींमध्ये अडकले आहात अजून पण सोडा ते सगळ आपण एक काम करुत या सीडी बंद करुत आणि आज लाईव्ह काही तरी करुत. तसही मला कुणी तरी म्हणाल होत गाण्या बद्दल तेव्हा करायचा श्री गणेशा." मृण्मयी विचारते.

हे ऐकताच अर्णव हळूच हसतो त्याला तिच्या मनात काय सुरु आहे हे समजत आणि एक गोड स्माईल करत तो म्हणतो.

"पण गर्ल फर्स्ट." अर्णव एक मिश्किल पणे स्माईल करत म्हणतो.

लगेच मृण्मयी म्हणते.

"गिटार प्लिज." मृण्मयी त्याच्या नजरेला नजर देत म्हणते.

आणि लगेच प्रोग्राम स्टार्ट होतो.

मृण्मयी "(म्युझिक सुरु करत )

इती सी हसी इती सी ख़ुशी
इतासा तुकडा चांद का
खाबो के तीनको से चल बना ए आशिया

इती सी हसी इती सी ख़ुशी
इतासा तुकडा चांद का
खाबो के तीनको से चल बना ए आशिया

दबे दबे पाव से आए होले होले जिंदगी
होंटो पे उंगली चढा के हम ताले लगा के
चल गुमसूम तराने चुप - चूप के गाए
आधी आधी बांट ले आजा दिल की ये जमीन
थोडा तेरा सा होगा थोडा मेरा भी होगा
अपना ये आंशिया

इती सी हसी इती सी ख़ुशी
इता सा तुकडा चांद का
खाबो के तीनको से चल बनाए आशिया"

मृण्मयी गिटार वाजवत गाण म्हणते. आणि म्हणते

"नऊ इट्स योअर टर्न" हातातली गिटार अर्णव कडे देत मृण्मयी म्हणते.

हे ऐकून अर्णव स्माईल करतो. आणि तिच्या हातातून गिटार घेत गाण म्हणायला सुरवात करतो.

अर्णव "(म्युझिक सुरु करत )

बाते ये कभी ना तु भूल ना
कोई तेरे खातीर है जी रहा
जाए तु काही भी, ये सोच ना
कोई तेरे खातीर है जी रहा
तु जहाँ जाए मेहफुज हो
तु जहाँ जाए मेहफुज हो
दिल ये मेरा बस मांगे दुआ
बाते ये कभी ना तु भूल ना
कोई तेरे खातीर है जी रहा

म्युझिक

हमदर्द है हमदम भी है
तु साथ है तो जिंदगी
तु जो कभी दूर रहे
ये हमसे हो जाए अजनबी
तुझसे मोहोब्बत करते है जो
तुझसे मोहोब्बत करते है जो
कैसे करे हम उसको बया
बाते ये कभी ना तु भूल ना
कोई तेरे खातीर है जी रहा
जाए तु कही भी ये सोच ना
कोई तेरे खातीर है जी रहा

म्युझिक

जागी भी है रोई भी है
आँखे ये  रातो मे मेरे
क्यु हर घडी मिलके तुझे
लगती रहे बस तेरी कमी
हम तो ना समझे, तुम ही कहो
हम तो ना समझे, तुम ही कहो
क्यु तुमको पाके तुमसे जुदा?
बाते ये कभी ना तु भूल ना
कोई तेरे खातीर है जी रहा
जाए तु कही भी ये सोच ना
कोई तेरे खातीर है जी रहा"

दोघांच गाण संपताच टाळ्यांचा कडकडाट होतो तोच दोघांची नजरेला नजर होते एक क्षण दोघ एकमेकांत गुंतले जातात तोच शार्दूल म्हणतो.

"अरे वाह आज जुना अर्णव दिसला आम्हाला तोच अंदाज तेच सूर तीच स्टाईल मान गये बॉस." शार्दूल आनंदाने म्हणतो.

आणि सगळे एकदम सगळे हसू लागतात.

क्रमशः...

काय सीडीत हॉस्टेलवर जाणारा संपत दिसतो आणि त्या मुलाचं काय रहस्य आहे कोण आहे तो मुलगा बघुत पुढील भागात