पूर्वसूत्र :

"कसला इतका विचार सुरु आहे अर्णव हे सगळ फक्त तुझ्यासाठी केलय आणि ही किमया मृण्मयी ची आहे यात मी राधा ताई सतीश दादा सगळ्यांनी फक्त मदत केली पण मेन प्लॅन हिचा आहे. कसा आहेस तु?" अर्णव जवळ येत शार्दूल विचारतो.

आता पुढे...

"शार्दूल तु? इतक्या वर्षांनी?" आश्चर्याने अर्णव विचारतो

"हो अरे खूप वर्ष झाली न आपल्याला भेटून? पण अर्णव तो आरु कुठे आहे आमचा आरु प्रत्येकाला ज्या ज्या वेळी मदतीची गरज असायची तेव्हा तेव्हा ठाम पणे उभा राहणारा तुला आठवत मी त्या कॉलेज मध्ये नव्याने प्रवेश घेतला होता त्या वेळी जी माझी परिस्थिती झाली होती त्यातून वर काढणारा तुच होतास मग तो आमचा आरु कुठे हरवलाय?" त्याच्या खांद्यावर हाथ ठेवत शार्दूल विचारतो.

जस शार्दूल त्याचा हाथ खांद्यावर ठेवतो. त्याच आवसानच गळून पडत जे काही इतके वर्ष आपल्या मनात साठवून ठेवल होत ते सगळ अश्रुंच्या वाटे बाहेर पडत. खूप काही त्याला आपल्या फ्रेंड्स ची बोलायचं होत आपल मन हलक करायचं होत पण कॉलेज संपत तशी त्यांची साथ ही संपते.

पण मैत्रीच ती. सगळ काही संपू शकत पण मैत्रीच नातं आणि जे नात विश्वासावर टिकलं होत ते नात संपेल का मुळीच नाही आणि म्हणूनच बंगल्यावर किती ही धोका असू देत सगळे फ्रेंड्स त्याला भेटायला एका क्षणात हजर झाले होते.

हिच असते खरी मैत्री जशी अर्णव आणि त्याचे कॉलेजचे फ्रेंड्स व  मृण्मयी ची होती.

अर्णवला भेटताच वातावरण थोड इमोशनल होत एका क्षणात कॉलेजच्या सगळ्या आठवणी ताज्या होतात आणि तोच ऋगवेद म्हणतो.

"यार तुला आठवत? आपला पूर्ण ग्रुप एकदा ट्रीपला गेला होता म्हणजे तस आपण सगळे नेहमीच जायचो मूड आला कॉलेज बंक करायचा की आधी पिकनिक चा प्लॅन ठरायचा मग सगळ्यांना बंक करायला सांगायचं. तुला माहितीये मृण्मयी याच मेन सूत्रधार अर्णव असायचा. आणि अर्णव नी सांगितलं की ती आमची पूर्वदिशा असायची म्हणजे जे अर्णव आम्हाला सांगायचा आम्ही तेच करायचो. एकदा असच पिकनिक चा प्रोग्राम ठरला सगळी तयारी अर्णव ची होती आणि जायचं कस तर बाईक वर अर्णव कडे बाईक नव्हती त्यामुळे तो माझीच बाईक वापरायचा आणि नेमक त्या दिवशी माझी बाईक चोरीला गेली होती. सगळाच सावळा गोंधळ उडाला होता इतकी छान तयारी झाली होती न की विचारूच नको पण एका बाईक मुळे आमचा प्लॅन ड्रॉप होणार होता तेव्हा अर्णव नी पुढाकार घेऊन स्लीपर कोचं बस ची व्यवस्था केली तेव्हा आम्ही जवळ जवळ १५ दिवसाच्या ट्रीपला जाऊ शकलो एवढच काय ट्रीपला गेल्यावर त्या दिवशी नेमक हॉटेल्स बंद मग काय आम्ही बस मधूनच सगळा प्रवास केला आराम ही बस मध्येच करत होतो आणि जेवण ते ही स्वतः बनवून खायचो. मेन सांगायचा मुद्दा हा की आमची ट्रिप केवळ अर्णव मुळे पूर्ण होऊ शकली नाही तर आम्ही आमचा निर्णय बदलण्याच्या मूड मध्ये होतो काय रे शार्दूल." ऋग्वेद सांगतो

"हो न आणि त्या ट्रिपच्या तर खूपच आठवणी आहेत पण एक आहे ट्रिप च नियोजन करायचं न तर अर्णव नीच हे काम यालाच चांगल जमत." शार्दूल दुजोरा देत म्हणतो.

"मग यावेळी कुठल्या ट्रिप चा प्लॅन बनवायचाय. अर्णव बर तुम्ही सगळे छान गप्पा मारा मी बाकीच बघते." मृण्मयी हळूच विचारते

"मृण्मयी पार्टी आपल्या सगळ्यांची आहे न मग तु एकटी का करणार आहेस मदत आम्ही ही करुत पण त्या आधी तुम्ही दोघ कसे भेटलात तर तर सांग." अरविंद मृण्मयी ला विचारतो.

"आम्ही? कसे भेटलो रे आपण. बर ऍक्च्युली मी मुंबईत माझा स्वतः  ची जमीन विकत घ्यायला आलीये मला माझ्या कल्पनेतला बंगला उभरायचाय आणि त्याचसाठी मी मुंबईत शिफ्ट झाले पण इथे राहायचं तर एखादी रहायला जागा तर हवी हाच विचार करून मी घर शोधायला सुरवात केली मला एक शांत वरदळ नसलेली जागा हवी होती जीथे राहून मी माझ पुस्तक ही लिहु शकेन आणि जमीनीचा शोध घेऊ शकेन. बस घराचा शोध घेतला आणि हा बंगला सापडला व मी इथे पोहोचले आणि या बंगल्यात पाऊल टाकताच अर्णवची भेट झाली." मृण्मयी सांगते

"म्हणजे तु इथे कायम ची नाही राहणार." अर्णव हिरमुसल्या स्वरात विचारतो.

त्याच बोलण ऐकून सगळेच हसू लागतात.

"अर्णव अरे अस का विचारतोयस मी इतक्या लवकर ही जागा थोडी सोडणार आहे आणि जरी मला ही जागा सोडावी लागली तरी आपली मैत्री अशीच राहील कायम मी तुझ्याशी केलेली मैत्री कधीच तोडणार नाही आपण एकत्र आहोत आणि कायम राहूत हं. बर आज फक्त गप्पाच आहेत की काही प्रोग्राम ही आहे." विषय बदलत मृण्मयी विचारते.

"आहे न पण आज आधी अर्णव मग बाकीचे." शार्दूल म्हणतो

आणि लगेच सगळे आपापल्या खुर्च्या पकडतात.

"नाही आज आधी माझ्याकडून एक सरप्राईज मग बाकीचे प्रोग्राम." शार्दूल च्या बोलण्याला असहमती दर्शवत मृण्मयी सांगते.

"तु काय काय सरप्राईज प्लॅन करून ठेवलय समजेल का मला आधीच हे सगळ्यात मोठ सरप्राईज मला दिलय तु खर सांगु मृण्मयी मी या दिवसाची कल्पना ही कधी केली नव्हती थँक्यु या स्पेशल संध्याकाळ साठी."  स्माईल करत अर्णव विचारतो

"ओ ओ महाराज हे थँक्यु पार्टी संपल्या नंतर म्हणण्यासाठी ठेवा. क्यु की पार्टी तो अभी शुरु हुई है. आलेच मी." मृण्मयी म्हणते

आणि घरात जाते व एक डीव्हिडी प्लेअर घेऊन येते आणि सीडी लावते. ती सीडी असते अर्णव च्या कॉलेजच्या सुखद क्षणांची त्या आठवणींची ज्याला तो पूर्णपणे विसरून गेला होता. आज मृण्मयी त्याच आठवणींना ताज्या करते.

सीडी सुरु होताच सगळेजण एकदम स्तब्ध होतात आणि आपल्या गतकाळातल्या सुखद क्षणांमध्ये हरवून जातात प्रत्येकाला आपले कॉलेजचे क्षण एकत्र केलेला अभ्यास अनुभवलेल्या ट्रिप्स भांडण परत एकत्र येणं अश्या सगळ्याच गोष्टी डोळ्या समोर येऊन जातात अर्णव ही त्या आठवणीत हरवून जातो.

त्याच्या डोळ्यात एक चमक असते आनंद असतो आयुष्य नव्याने जगण्याची उमेद असते तो  कॉलेजच्या आठवणींमध्ये पूर्ण हरवलेला असतो. तोच मृण्मयी च त्याच्याकडे लक्ष जात तीला जाणवत त्याच्यातला होणारा बदल ते बघून ती मनातून एक स्माईल करते आणि लगेच भानावर येऊन सीडी बघु लागते.

क्रमशः...

चला पार्टीला सुरवात झाली आहे सगळेजण जमले आहेत आणि आपल्या कॉलेजच्या आठवणींना उजाळा देत आहेत पण यात एक छोटस रहस्य ही आहे ते नेमक काय रहस्य आहे मृण्मयी ला सीडी तुन काय नवीन समजणार बघुत पुढील भागात.