पुर्वसूत्र :
काही तासा नंतर...
सगळ्यांचं आवरून होत आणि राधा ताई किचनच बघायला जातात तर मृण्मयी अर्णवला उठवायला जाते. आणि एकदम खोलीच दार उघडते. अर्णव आपल्यातच मग्न असतो तर मृण्मयी आनंदात त्याला बघतच राहाते.
आता पुढे...
"अर्णव झोपला होतास न तु?" खाडकन दार उघडत मृण्मयी विचारते.
तिच्या चेहऱ्यावरचा एक वेगळाच आनंद स्पष्ट दिसत असतो. तोच अर्णव च तिच्याकडे लक्ष जात आणि तो तीला विचारतो.
"मृण्मयी तु कधी शांत बसूच शकत नाही का ग काही ना काही तुला करायचच असत न आता काय केल आहेस जो इतका चेहरा खुलला आहे तुझा." अर्णव विचारतो.
"अर्णव जेव्हा तुला कळेल ना तेव्हा तुझा ही चेहरा असाच खुलेल मला पूर्ण विश्वास आहे. बघच तु. बर चल तुझ आवरून घे तुला खाली गार्डन मध्ये बसायचं होत न. काही वेळात आपण गार्डनमध्ये असणार आहोत बघ मी तुझ्यासाठी चांगला एखादा ड्रेस काढते हं चल बैस चेअरवर." मृण्मयी उत्साहाने म्हणते.
आणि अर्णव चेअरवर बसू लागतो मृण्मयी लगेच त्याला आधार देते आणि अर्णव व्हीलचेअर वर येऊन बसतो.
"मृण्मयी मला एक सांग आपल्याला नुसत काही वेळ गार्डन मध्ये बसायचं तर आहे मग ही आवारा आवारी कशाला? तसही बसलोच असतो न चालल असत." बसता बसता अर्णव विचारतो.
"मला नाही चालणार न पण व्यक्ती नी कस नेहमी प्रेझेंटेबल असायला हव त्यामुळे आज मस्त आवरायचं. अं हं तु न हा ड्रेस घाल खूप छान दिसेल तुला ओके. आणि काय रे इतके मस्त मस्त ड्रेस आहेत तुझ्या कडे असा का एकदम सिम्पल राहातोस तु ते काही नाही आज पासून तु मला खूप वेगळा अर्णव दिसायला हवा ओके." मृण्मयी ड्रेस देत अर्णवला म्हणते
आणि अर्णव मात्र एकसारखा तिच्याकडे बघत असतो प्रेमाने.
"बघ परत हरवलास नाही चल मीच आवरून देते तुला इतका मस्त दिसशील न की बस विचारायलाच नको." मृण्मयी म्हणते.
आणि त्याच आवरू लागते. त्यांच्यात मैत्री पेक्षाही काही तरी वेगळ नात असत. हे जाणवायला लागलं होत दोघ ही एकमेकांत गुंतत होती पण त्याची दोघांना ही जाणीव न्हवती. मृण्मयी त्याच खूप सुंदर आवरून देते तो पर्यंत त्याच तिच्याकडेच लक्ष असत आणि काही क्षणातच तीच ही लक्ष जात दोघ ही एकमेकांत गुंतले जातात नजरेला नजर भिडते. तोच तीथे राधा ताई येतात आणि आवाज देतात.
"बेटा आवरलं का तुमचं?" राधा ताई नॉक करत विचारतात.
आणि एकदम दोघ भानावर येतात.
"हो मी दिलय अर्णवच आवरून आता मी ही आवरते." मृण्मयी म्हणते.
आणि अर्णव व मृण्मयी एकमेकांकडे बघु लागतात गोड स्माईल करत.
"म्हणजे ताई तुम्हाला ही माहित होत आम्ही बाहेर बसणार आहोत. एक मिनिट काही वेगळा प्लॅन सुरु आहे का तुमचा मला जरा वेगळच वाटत आहे." शंकेच्या स्वरात अर्णव विचारतो.
"अर्णव बाबा मला ताईसाहेबांनी सांगितल होत तुम्हाला गार्डन मध्ये बसावस वाटतय त्याचीच तर तयारी सुरु होती. बर ताई सतीशला बोलवायचंय का तुम्हाला मदत लागेल न?" राधा ताई विचारतात
"पहिले मी तयार होते मग आता माझा फ्रेंड इतका छान दिसतोय तर मी पण त्याची फ्रेंड शोभले पाहिजे न." मृण्मयी म्हणते
आणि सगळे हसू लागतात. व मृण्मयी आपल आवरायला निघून जाते.
खर तर अर्णवच्या मनात शंकेची पाल पुटपुटत असते. नेमक घरात काय सुरु आहे हे त्याला जाणून घ्यायच असत पण कुणीही त्याला थांग पत्ता लागू देत नाही.
मृण्मयी च्या खोलीत...
मृण्मयी आपल आवरू लागते.
काही क्षणा नंतर...
आपल आवरून झाल्यावर मृण्मयी शार्दूलला फोन करते.
"शार्दूल तु रेडी आहेस ५ : ३० वाजले आहेत." आपल्या खोलीतून मृण्मयी शार्दूलला विचारते.
"हो आम्ही सगळे रेडी आहोत डोंट वरी बस काही क्षणातच आम्ही पोचूत तुम्ही गार्डन मध्ये येऊन बसा आणि हो एक काम कर त्याच्या डोळ्यांना पट्टी बांध मग खाली घेऊन ये ओके." शार्दूल कार चालवता चालवता सांगतो.
आणि दोघ फोन ठेऊन देतात.
मृण्मयी आपल आवरून अर्णव च्या खोलीत येते ती खूपच गोड दिसत असते इतकी की कुणी ही तीला पहिल्यांदा बघितल तर बघतच राहावं आणि होत ही तसच मृण्मयीला आलेलं बघून अर्णव ही तीला बघतच राहातो ती इतकी गोड दिसत असते की आपण तीला काय बोलाव हेच त्याला समजत नाही.
तीच चालणं मोकळे केस हळू हळू जवळ येणं त्याला मोहित करू लागलं. तो तीला बघताच सावरण्याचा प्रयत्न करत होता पण तिचे सौंदर्य त्याला अस काही मोहित करत होत की तो पूर्ण गुंगून गेला.
आणि तीला बघतच राहिला. तोच मृण्मयी तिच्या जवळ येते आणि म्हणते.
"चला साहेब आज तुम्ही इच्छा पूर्ण होणार आपण खाली जातोय पण अस नाही थांब तुझ्या डोळ्यांना पट्टी बांधते. आणि हो नो चीटिंग हं. " डोळ्यावर पट्टी बांधता बांधता मृण्मयी म्हणते.
"ए वेडा बाई हे सगळ काय सुरु आहे तुमचं मला खमंग वास काय येतो आपल तयार होण काय सुरु आहे तुमचं देवच जाणे माझच चुकलं जे तुला म्हणालो बाहेर बसुत म्हणून आता अजून काय काय बघायला मिळणार काय माहित." अर्णव म्हणतो.
तेवढ्यात खोलीत शार्दूल येतो तो बोलणारच असतो की ईशाऱ्याने मृण्मयी त्याला शांत बसवते आणि म्हणते.
"सतीश दादा आलात तुम्ही आपल्याला अर्णव ला खाली घेऊन जायचय चला." ईशाऱ्यानेच मृण्मयी शार्दूलला सांगते.
आणि दोघ व्हीलचेअर उचलतात आणि जिन्यातून खाली घेऊन येतात. व मृण्मयी व्हीलचेअर चालवत गार्डन मध्ये घेऊन येते.
अर्णव खूप वर्षांनी बाहेर पडलेला असतो म्हणून त्याला डोळ्या समोर ठेऊन गार्डनची सजावट केलेली असते. खर तर त्याच्यासाठी आजचा दिवस हा खरच आठवणीत राहिलेला दिवस असतो त्याचे सगळे फ्रेंड्स आज एकत्र जमलेले असतात आणि हे त्याच्यासाठी खूप गोड सरप्राईज असत.
मृण्मयी गार्डन मध्ये पोहोचल्यावर अर्णवच्या डोळ्याची पट्टी काढते अर्णव आपले डोळे दोन्ही हातानी चोळतो आणि हळूच उघडतो व एकदा संपूर्ण गार्डनवर आपली नजर फिरवतो. त्याच्या डोळ्यात अश्रु असतात त्याच नजरेने तो सगळीकडे बघतो तेवढ्यात त्याची आपल्या मित्रांकडे नजर जाते तो सगळ्यांना बघून खूप भारावून जातो काही क्षण तर त्याच्या तोंडून शब्दच फुटत नाहीत त्याच वेळी शार्दूल त्याला भानावर आणत सांगतो.
"कसला इतका विचार सुरु आहे अर्णव हे सगळ फक्त तुझ्यासाठी केलय आणि ही किमया मृण्मयी ची आहे यात मी राधा ताई सतीश दादा सगळ्यांनी फक्त मदत केली पण मेन प्लॅन हिचा आहे. कसा आहेस तु?" अर्णव जवळ येत शार्दूल विचारतो.
क्रमशः..
अब होगी पार्टी शुरु पार्टीला यायचं हं पण पुढील भागात
