पूर्वसूत्र :
“असा नको विचार करुस हे ही दिवस निघून जातील कायम एक गोष्ट लक्षात ठेव प्रसंग कुठला ही असो आपल्याला हार मानायची नाहीये यशस्वी व्हायला वेळ लागू शकतो तरी आपण खंबीर राहायचं हं आणि एवढा विचार करण्याची काय गरज आहे जर इतकी चांगली माणस तुझ्या बरोबर आहेत सोड न सगळं त्यांच्या वर बघून घेतील ते. बर मी आपल्या डिश घेऊन येते हं.” मृण्मयी त्याला समजावते.
आणि खाली दोघांच्या डिश घ्यायला जाते.
आता पुढे...
मृण्मयी किचन मध्ये ताट घ्यायला जाते. तोच आधीच राधा ताईंनी त्यांच्या जेवणाची ताट तयार करून ठेवलेले असतात ते बघून मृण्मयी म्हणते.
"राधा ताई मला एक सांगा तुमच्याकडे सगळ्यांना सरप्राईज देण्याची सवय आहे का?" हसत मृण्मयी विचारते.
"अस का विचारलस बेटा?" राधा ताई विचारतात
"मग काय तर आता हेच बघा न अर्णवच्या खोलीत गेले होते तर त्याने मला रोजडे च गिफ्ट देऊन सरप्राईज केल आणि आता तुम्ही आमची ताट बनवून सरप्राईज केलत. जस काही तुम्हाला आधीच माहित होत आम्ही एकत्रच जेऊत." मिश्किल पणे मृण्मयी विचारते.
"अच्छा अस होय, बेटा मला तु राधा ताई म्हणतेस विसरलीस का तुझ्या पेक्षा जास्त पावसाळे बघितले आहेत मी अर्णव बाबा नी तुला काही सांगितल आणि तु ते करणार नाहीस अस अजिबात शक्य नाही त्यामुळे मी आधीच ताट बनवून ठेवली होती आणि राहिला प्रश्न अर्णव बाबांच्या सरप्राईज चा तर (थोडस हसत ) आपल बोलण ते वरुन ऐकत होते आता त्यांनी काय काय ऐकलय माहित नाही पण तु गिफ्ट घ्यायला जाणार आहेस ते त्यांना माहित होत." राधा ताई सांगतात.
"काय म्हणजे आपला जो प्लॅन आहे त्याच्या फ्रेंड्स ना बोलवायचा तो ही माहित आहे की काय त्याला." आश्चर्याने मृण्मयी विचारते.
"ते काही सांगता येणार नाही बाबा मला पण गिफ्ट च मात्र त्यांनी ऐकलं होत." राधा ताई सांगतात.
"बर बघुत आता पुढे कस करता येईल ते आणि ऐकलं नसेल तर चांगलच आहे पण हे सगळ आपण जेवणा नंतर ठरवूत. आणा दोन्ही ताट इकडे. आणि मला एक सांगा ते गुलाबाचं फुल कुणी आणून दिल त्याला." स्माईल करत मृण्मयी विचारते.
तोच सतीश दादा येतात आणि म्हणतात.
"ताई साहेब अर्णव साहेबांनी मला फुल आणायला सांगितल होत मी दिल आणून त्यांना का हो?" सतीश दादा विचारतात.
"अरे काही नाही त्यानी मला रोजडे च सरप्राईज दिल त्यामुळे मला जरा आश्चर्य वाटल बस बाकी काही नाही. बर जेवणा नंतर आपल्याला संध्याकाळ ची तयारी करायला घ्यायचीये लक्षात आहे न. आज खूप जण येणार आहेत पार्टी साठी मी शार्दूलला सांगितल आहे तो घेऊन येईल सगळ्यांना त्याच्या आत सतीश दादा प्लिज कॅमेराच बघा खूपदा सांगितलय मी तुम्हाला आता नाही तर जेवण झाल की आधी मीच माझ्या ओळखीच्या सीसी टीव्ही रिपेअरर ला बोलावून घेते म्हणजे तोच काढून टाकेल कॅमेरे. आणि तुम्ही बाकीच बघा पण लवकर आणि अर्णवला यातल काहीएक कळता कामा नये काय?" मृण्मयी म्हणते.
"मी बोलून घेतल आहे ताई काही काळजी करू नका तुम्ही सगळ व्यवस्थित होईल." सतीश दादा म्हणतात.
"बर ठिक आहे." मृण्मयी म्हणते.
आणि ताट घेऊन अर्णवच्या खोलीत जाते. अर्णव तिची वाट पहातच असतो मृण्मयी ताट घेऊन येते आणि दोघ जेऊ लागतात. खर तर हा अर्णवसाठी एक सुखद क्षण असतो कारण आज कुणीतरी त्याच्या बरोबर जेवत असत आत्ता पर्यंत राधा ताई त्याला ताट आणून देत होत्या आणि तो त्या खोलीत एकटाच जेवायचा पण आज मात्र चित्रच वेगळ होत आज मृण्मयी कुठलीही पर्वा न करता त्याच्या बरोबर जेवत होती. हे बघून अर्णव ही मनातून आनंदलेला होता.
तो मनात विचार करत होता. "चला आज तरी माझ्या बरोबर जेवायला कुणी तरी आहे. आज मी एकटा नाहीये."
त्याच्या डोळ्यात पाणी होत आणि हातात घास. तोच मृण्मयीच त्याच्याकडे लक्ष जात आणि ती त्याला भानावर आणत विचारते.
"तु परत विचारमग्न झालास? तु थकत नाहीस का रे एवढा विचार करून. मी जर एवढा विचार केला असता न तर आज कुठल्या कुठे पोहोचले असते." स्माईल करत मृण्मयी म्हणते.
आणि दोघ हसू लागतात.
"बर मला तुझा मोबाईल दे. आपण एक सेल्फी घेऊत आता आपण आपल्या प्रत्येक सुखद क्षणांचे सेल्फीज घेऊन ठेवायचे ओके." मृण्मयी त्याला जेवता जेवता फोन मागते.
"मृण्मयी तु विसरतीएस जो मुलगा गेले कित्येक वर्ष एका खोलीत बंद होता त्याच्या कडे फोन कसा येईल." अर्णव म्हणतो.
"बर, माझ्या मोबाईल मध्ये काढते नंतर आपण त्याचा छान कोलाज बनवूत ओके." स्माईल करत मृण्मयी म्हणते
आणि एक छान सेल्फी काढते जेवतानाचा.
आणि लगेच दोघ गप्पा मारत मारत जेऊ लागतात. त्यांचा खळखळून हसण्याचा आवाज खालपर्यंत येत असतो. ते ऐकून राधा ताईंच्या चेहऱ्यावर एक अनामिक समाधान असत.
त्या विचार करत असतात.
"चला इतक्या वर्षा नंतर का होईना आज अर्णव बाबा हसले या पोरीच्या येण्याने आता अर्णव बाबा च आयुष्य बदलून जाईल अस वाटत आहे." राधा ताई मनात विचार करतात.
"राधा ताई तुम्ही सुद्धा तोच विचार करत आहात का जो मी करतोय? अर्णव साहेबाना अस हसताना बघून खूप छान वाटत आहे न देव करो आणि त्यांच्या चेहऱ्यावरच हे हसू असच राहावं कधीच दूर जाऊ नाही." दोघांचा आवाज ऐकून सतीश दादा म्हणतात.
"तु अगदी बरोबर म्हणतो आहेस सतीश आणि ही सगळी मृण्मयीची किमया आहे हं ती या घरात आली आणि या घराचच सोन झालय आता देवा कडे एवढीच प्रार्थना करते की यांची ही जोडी अशीच राहो याला कुणाची नजर न लागो. बर चल तु ही लवकर जेऊन घे आज भरपूर काम आहेत आपल्याला." राधा ताई म्हणतात
"हो, चला जेऊन घेऊत." सतीश दादा
आणि दोघ किचन मध्येच जेवायला बसतात.
काही वेळा नंतर...
सगळ्यांची जेवण झाल्यावर मृण्मयी अर्णवला झोपवते आणि खाली हॉल मध्ये येते. तीला येताना बघून राधा ताई आणि सतीश दादा ही लगेच समोर येऊन उभे राहतात.
मृण्मयी दोघांना आपापली काम समजाऊ लागते.
"बर अर्णव आत्ताच झोपलाय तेव्हा आपल्याला लगेच कामाला सुरवात करावी लागेल तो उठायच्या आत आपल सगळं व्हायला हव. सतीश दादा तुम्ही घर आवरायला घ्या आणि ताई तुम्ही सतीश दादांना मदत करा पण एक गोष्ट आवाज अजिबात करायचा नाही. शार्दूलला मी ५ : ३० च टाईमिंग दिलय तेव्हा जे काही करता येईल ते ५ : ३० च्या आत. चला लागा कामाला." मृण्मयी दोघांना घर आवरायला सांगते.
आणि वासूला म्हणजेच तिचा ओळखीचा सीसी टीव्ही वाल्याला फोन करते.
"हॅलो, वासू बोलतोयस न." मृण्मयी विचारते
"हो, ताई मी च हाय आवाज ओळखला नाहीत की काय माझा? बोला न काय काम होत." वासू
"अरे तस काही नाही बर सध्या कुठे आहेस तु मी ज्या बंगल्यात पेंगेस्ट म्हणून राहाते तीथे तुला येता येईल का सीसी टीव्ही कॅमेरे काढायचे आहेत सगळे इथले." मृण्मयी म्हणते
"हो येईल की मी तुम्ही ऍड्रेस सेंड करा मी लगेच येतो." वासू म्हणतो.
"ठिक आहे मी तुला ऍड्रेस सेंड करते लगेच ये आजच्या आज सगळे कॅमेरे निघाले पाहिजेत हं." मृण्मयी म्हणते
"हो, ताई आलोच तुम्ही काळजीच करू नका." वासू म्हणतो
आणि दोघ ही फोन ठेऊन देतात मृण्मयी त्याला ऍड्रेस सेंड करते व दोघांना मदत करू लागते.
काही वेळा नंतर वासू येतो आणि तो ही सीसी टीव्ही काढायला मदत करतो काही क्षणातच सगळे कॅमेरेज काढून टाकले जातात.
मृण्मयी सगळ्या हॉल ची धूळ झटकून टाकते तर सतीश दादा बाहेरच्या गार्डनच बघतात आणि राधा ताई देखील साफ सफाईच बघतात.
काही तासा नंतर...
सगळ्यांचं आवरून होत आणि राधा ताई किचनच बघायला जातात तर मृण्मयी अर्णवला उठवायला जाते. आणि एकदम खोलीच दार उघडते. अर्णव आपल्यातच मग्न असतो तर मृण्मयी आनंदात त्याला बघतच राहाते.
क्रमशः...
चला आज अर्णव आणि मृण्मयी एकत्र जेवले आणि पार्टीची तयारी ही सुरु झाली आता या पार्टीत काय काय होईल कशी असेल पार्टी बघुत पुढील भागात.
