पुर्वसूत्र :

"अरे बापरे, बर मी बघते काय सुरु आहे ते आधी फ्रेश होते मग जाऊन भेटते त्याला." मृण्मयी सांगते.

आणि आपल्या खोलीत आवरायला जाते.

आता पुढे...

वेळ दुपारची...

आपल्या खोलीत पोहोचल्या वर मृण्मयी आपल आवरते फ्रेश होते आणि अर्णवच्या रूममध्ये जाते.

"ओये आहेस का? मी काही ऐकलं आत्ता." मृण्मयी मजा घेत विचारते.

"खरच तु काही ऐकलस का? काय ग" तो ही तसाच मजा घेत विचारतो.

"हेच तुला माझ्या बरोबर जेवावस वाटत आहे अं आहे काय?" मृण्मयी

"हं आज वाटत होत तुझ्या बरोबर जेवावस बर ते ड्रॉवर उघड जरा." अर्णव म्हणतो.

"ड्रॉवर? का रे?" आश्चर्याने मृण्मयी विचारते

आणि लगेच जाऊन ड्रॉवर उघडते बघते तर काय त्यात एक पिवळ्या रंगाचं सुंदर गुलाबाचं फुल असत आणि फुलाखाली एक चिठ्ठी असते. व चिठ्ठीत एक सुंदर कविता लिहिलेली असते.

मृण्मयी ते बघून अवाकच होते आणि विचारते.

"अर्णव हे काय आहे. लेटर?" आश्चर्यचकित होत मृण्मयी विचारते.

"ओये आधी बघ मग बोल वाच तरी काय लिहिलय ते आणि हो हॅपी रोज डे बर का." मनातल्या मनात हसत त्याच स्वरात अर्णव म्हणतो.

आपणच आधी विश केल मृण्मयीला याचा एक अनामिक आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतो आणि ती मात्र तशीच अवाक होऊन त्याच्या कडे बघत असते.

खर तर तीला हे एकदमच अनपेक्षित असत तिची समजूत असते आज आपण त्याच्यासाठी काही तरी करुत आणि त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद आणूत पण त्या आधीच अर्णवने ही आपल्या मैत्रीच एक पाऊल पुढे टाकलेल असत.

हे बघून तीला समाधान वाटत असत आणि तिच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह ही उभ राहिलेलं असत. ती मनात विचार करत असते. "हे कस काय घडल?" तोच तीला त्या अवस्थेत बघून एक स्माईल करत अर्णव तीला म्हणतो.

"तुझ विचार करून झाल असेल तर एकदा गिफ्ट बघतेस का ते काय आहे न मला या अवस्थेत बाहेर पडता येत नाही म्हणून म्हणलं काही तरी वेगळ करुत. पण माझी मैत्री तुला बहुतेक आवडली नाही अं." अर्णव स्माईल करत विचारतो.

आणि मृण्मयी त्याच्या गोड स्माईल कडे एकटक बघत राहाते.

क्षणभरातच भानावर येत...

"तस काही नाही रे मला हे अनपेक्षित होत त्यामुळे. आणि हो तु असा आहेस न की तुझी मैत्री कुणाला ही आवडेल परत अस म्हणू नकोस हं. वाचते मी." चिठ्ठी उघडत मृण्मयी म्हणते.

तु एक अल्लड परी

मी शांत सागर घुसमटलेला

गाठ पडली आपली अचानक

अन मी गेलो विसरून साऱ्या वेदना

तुझे हसणे तुझे बोलणे

तुझी सोबत तुझा सहवास

हवाहवासा वाटे मला

तुझ्या मैत्रीतच मिळे मोकळा श्वास मला

तु माझे जीवन बदलेस

बनलीस माझी प्रेरणा

कसा उतराई होऊ तुझा

आता हे जीवन ही मी वाहिले तुला.

तुझा नवीन फ्रेंड हॅपी रोज डे.

कविता वाचताच तिच्या डोळ्यात पाणी येत. ती आपले डोळे पुसते आणि चिठ्ठीची नीट घडी घालत अर्णवला म्हणते.

"इतकी मोठी नाहीये रे मी तु ही कविता करून मला खूप वरच स्थान दिलयस तुला माहितीये ज्या वेळी मी तुझ्या डायरीज वाचत होते न का कुणास ठाऊक पण मला तु माझी प्रेरणा वाटत आलाय आयुष्य कितीही खडतर का असेना पण जगण्याची उमेद सोडायची नाही जेव्हा मी आत्ता पर्यंत चा तुझा प्रवास ऐकला न लोकांनी तुझ्याकडून प्रत्येक गोष्ट घेण्यासारखी आहे असच माझ्या मनात आलय. खर तर न मी फक्त एक निमित्त होते करून तर तुच घेतल आहेस सगळ तुच आणलस स्वतःत बळ आणि आता अजून ही आयुष्य हसून जगायचा प्रयत्न करत आहेस आणि हेच तुला खूप बळ देईल बघ. अजून एक कधी ही स्वतः ला एकट समजायचं नाही कारण तुझी ही परी कायम तुझ्या बरोबर आहे हॅपी रोज डे." त्याच्यासाठी आणलेलं गिफ्ट आणि गुलाब देत मृण्मयी म्हणते.

आणि दोघ ही एकमेंकडे एक क्षण बघत राहतात हातात गुलाबाचं फुल घेऊन तोच मृण्मयी भानावर येत म्हणते.

“चला भूक नाही लागली का आज माझ्या बरोबर जेवायचं नाही वाटत अं.” भानावर येत मृण्मयी विचारते.

“भूक तर लागलीये न पण आधी तु काय आणलं आहेस गिफ्ट ते तर बघुत.” मृण्मयी च गिफ्ट उघडत अर्णव म्हणतो.

आणि सुंदर पॅकिंग केलेलं गिफ्ट उघडणारच असतो तोच मृण्मयी म्हणते.

“इट्स ओके न अर्णव खर तर तु दिलेल्या गिफ्ट समोर हे गिफ्ट काहीच नाहीये उगीच कशाला बघतोस उघडून?” त्याला मध्येच अडवत मृण्मयी म्हणते.

“अरे हे तु कस म्हणू शकतेस हे तु नाही ठरवणार हे मी ठरवेल ओके” गिफ्टच पॅकिंग उघडत अर्णव म्हणतो.

आणि गिफ्ट उघडतो. बघतो तर काय त्यात खूप सुंदर ए अल्फाबेट असलेल नक्षीदार लॉकेट असत. ते दिसायला इतक सुंदर असत की बघताच क्षणी कुणीही त्याला बघतच राहील.

त्या लॉकेटच्या अल्फाबेट वर बारीक खडे असतात त्यामुळे ते लॉकेट एक सारखं चमकत असत आणि त्यामुळे ते लॉकेट अधिकच सुंदर दिसत असत.

अर्णव हातात लॉकेट घेतो आणि एक क्षण बघतच राहातो. व लगेच भानावर येत विचारतो.

“हे तर... खूप एक्सपेन्सिव वाटतय एवढा खर्च करण्याची काय गरज होती?” अर्णव लॉकेटकडे बघत विचारतो.

“तुझ्या मैत्रीपेक्षा एक्सपेन्सिव नाहीये हे गिफ्ट तुझी मैत्री तर अनमोल आहे माझ्यासाठी पण इट्स ओके तुला गिफ्ट आवडलं नाही न दे इकडे मी राधा ताईंना देऊन टाकते.” थोडस चिडक्या स्वरात मृण्मयी म्हणते.

“आणि मी अस कधी बोललो तुला? हे बघ हे माझ लॉकेट आहे हे कुणालाच मिळणार नाही ओके तुला राधा ताईंना द्यायचय तर दुसर दे हे  मिळणार नाही.” अर्णव म्हणतो.

“बर बाबा मी तरी कुठे मागत आहे तुला ते मला वाटल मी दिलेलं गिफ्ट तुला आवडलं नाही म्हणून म्हणाले बस. बर साहेब खूप भूक लागली आहे हो जेवायचं का आता?” मृण्मयी काकूळतीला येत म्हणते.

हे ऐकताच अर्णव खळखळून हसू लागतो आणि त्याच हसण बघून मृण्मयी देखील हसू लागते.

काही क्षणा नंतर...

“तु पण न मृण्मयी कलंदर आहेस अगदी बर चल जेवायला पण खोलीत नाही तर हॉल मध्ये नेतेस मला?” अर्णव विचारतो.

त्याच बोलण ऐकून मृण्मयी चाटच पडते आणि म्हणते.

“अर्णव तु स्वतःत बदल करायचा प्रयत्न करत आहेस ही खूप चांगली गोष्ट आहे पण खूप फास्ट नको थोड स्लोली करुत आपण तुला माझ्या बरोबर जेवायचं आहे न मग मी येते इथे आपल्या बंगल्यातले कॅमेरे अजून काढले गेले नाहीत रे म्हणून सांगतीये तु इतकी मेहनत घेतोयस तेव्हा त्यावर पाणी फिरलं जाऊ नाही बघ तुला अजून ही स्ट्रॉंग होण्याची गरज आहे पण सगळ्या गोष्टी एकदम करून नाही हं तु थांब मी आपल्या डिश घेऊन येते.” मृण्मयी त्याला समजावत म्हणते.

“म्हणजे अजूनही माझा प्रवास याच अंधाऱ्या खोलीत आहे तर मी बाहेरच जग कधी बघूच शकणार नाही का?” अर्णव हिरमुसलेल्या स्वरात विचारतो.

“असा नको विचार करुस हे ही दिवस निघून जातील कायम एक गोष्ट लक्षात ठेव प्रसंग कुठला ही असो आपल्याला हार मानायची नाहीये यशस्वी व्हायला वेळ लागू शकतो तरी आपण खंबीर राहायचं हं आणि एवढा विचार करण्याची काय गरज आहे जर इतकी चांगली माणस तुझ्या बरोबर आहेत सोड न सगळं त्यांच्या वर बघून घेतील ते. बर मी आपल्या डिश घेऊन येते हं.” मृण्मयी त्याला समजावते.

आणि खाली दोघांच्या डिश घ्यायला जाते.

क्रमशः...

काय तर आधी अर्णवनी मृण्मयी ला गिफ्ट दिल? ते ही एक सुंदर कविता ही त्याची स्वतः कडे बघण्याची सकारात्मक सुरवात तर नाही? आता या कथेत  अजून काय काय होईल बघुत पुढील भागात.