पूर्वसूत्र:

"बर खूप छान वाटल तुम्हाला भेटून काका बस आता प्रॉपर्टी ची जबाबदारी तुमच्यावरच आहे येते मी." मृण्मयी सांगते.

आणि निघून जाते.

आता पुढे...

मृण्मयी ऍडव्होकेट जगदीश च्या कानावर सगळ घालून तिथून बाहेर पडते.

पंधरा मिनिटा नंतर...

अचानक सिग्नल लागत आणि ती थांबते व विचार करू लागते.

"चला एक मोठ काम झाल आता अर्णव च्या प्रॉपर्टी ची तरी ऍटलीस्ट काळजी नसेल. पण हे सगळ जितकं सोप वाटतय तितकं सोप नाहीये हा माणूस फक्त प्रॉपर्टी साठी किंवा अपमानाचा बदला घेण्यासाठी अर्णवच्या आयुष्याशी खेळणार नाही मला या माणसाची अजून काही माहिती मिळते का बघावं लागेल. (अचानक आठवत) अरे बाबांनी त्यांचा स्टुडन्ट विक्रांत चा नंबर सेंड केला होता त्याला फोन करायचीच विसरले." मृण्मयी सिग्नल वर विचार करत मनाशीच पुटपुटत असते.

आणि लगेच विक्रांतला कॉल करते.

ट्रिंग... ट्रिंग...

मोबाईल व्हाईब्रेट होतो. व लगेच विक्रांत फोन उचलतो.

"हॅलो, विक्रांत बोलतोय कोण आपण?" डॉ.विक्रांत

"हाय मी मृण्मयी जोशी तुझे सर प्रकाश जोशींची मुलगी बोलतीये. आपण बोलु शकतो का?" मृण्मयी विचारते.

"हो हो सरांनी मला सांगितल होत तु कॉल करशील म्हणून कधी वेळ आहे तुला कारण पेशंटला आधी बघावं लागेल मला त्यामुळे." डॉ. विक्रांत

"ओह म्हणजे बाबांनी आधीच सांगितल होत तुला ग्रेट मग उद्या भेटूयात? चालेल का?" मृण्मयी विचारते.

"हो चालेल तु सकाळी १० वाजता त्याला घेऊन ये. मी एकदा बघतो मग पुढच ठरवू." डॉ. विक्रांत

"ठिक आहे मग उद्या १० वाजता भेटूत आपण बाय." मृण्मयी म्हणते

आणि दोघ ही आपापले फोन ठेऊन देतात. तोच सिग्नल सुटत आणि ती गाडी स्टार्ट करते व निघते.

साधारणता दीड तासाने...

मृण्मयी कार चालवत असते तोच तीला एक गिफ्ट शॉप दिसत आणि ती आपली कार गिफ्ट शॉप कडे वळवते व गाडी पार्किंगला लावून गिफ्ट शॉप मध्ये जाते. आणि गिफ्ट्स बघु लागते.

ती प्रत्येक वस्तू अगदी निरखून बघु लागते. तोच दुकानदार तीथे येतो आणि तीला विचारतो.

"हाय, मी काही मदत करू शकतो का तुमची?" दुकानदार

"अं, हो मला आज रोजडे आहे तर त्याला सुटेबल अस काही तरी गिफ्ट दाखवा." मृण्मयी म्हणते.

"अच्छा, तर तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंडला गिफ्ट द्यायचं आहे तर मग तुम्ही हे लॉकेट बघा तुम्हाला नक्की आवडेल." लॉकेट दाखवत दुकानदार म्हणतो.

ती लगेच ते लॉकेट बघते तीला लॉकेट खूप आवडतं आणि ती म्हणते.

"दादा, लॉकेट तर चांगल आहे पण मला गिफ्ट फ्रेंडला द्यायचं आहे तर तस काही तरी दाखवलं तर चांगल वाटेल." दुकानदाराला लॉकेट देत मृण्मयी सांगते.

"अहो ताई हे गिफ्ट मित्रासाठी आणि बॉयफ्रेंड साठी दोन्हीसाठी उपयुक्त आहे बघा तुमच्या फ्रेंडला ही नक्की आवडेल गॅरंटी आहे माझी." दुकानदार म्हणतो.

आणि तीला परत ते लॉकेट देतो. व ती ही लगेच घेते. आणि पॅक करायला सांगते.

"ठिक आहे दादा किती झाले याचे." मृण्मयी

"२०० रुपये." दुकानदार

"हे, घ्या बर याला खूप चांगल्या पद्धतीने पॅकिंग करा हं." मृण्मयी म्हणते.

"हो हो नक्कीच तुम्ही काळजीच करू नका." दुकानदार म्हणतो.

आणि खूप सुंदर पॅकिंग करून देतो. मृण्मयी गिफ्ट घेते आणि बाहेर पडते. व गाडी स्टार्ट करून निघून जाते.

काही वेळा नंतर...

अजून एका सिग्नल वर...

मृण्मयी सिग्नल सुटण्याची वाट पहात असते तीला घरी पोहोचायची खूप घाई असते तोच तीथे एक गोड मुलगी येऊन उभी राहाते तिच्या हातात एक टोपली असते आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारची फुले असतात पण सगळ्यात सुंदर गुलाबाची फुले असतात. जणू त्या फुलांवर ही रोजडे चा रंग चढलेला असतो अशीच ती फुल दिसत असतात.

ती मुलगी खिडकी च्या कचेवर नॉक करते आणि म्हणते.

"ताई आज बोनी नाही झाली तुम्ही तरी माझ्या कडून फुल घ्या न तुमचा बॉयफ्रेंड लै खुश होईल." आपल्या डोक्यावरची टोपली सांभाळत ती मुलगी म्हणते.

तीच बोलण ऐकताच मृण्मयीला खूप हसू येत आणि ती तीला विचारते.

"तुला ग काय माहित मला बॉयफ्रेंड आहे की नाही. शाळेत जातेस का? थांब मी आधी गाडी साईडला लावते." आपली गाडी बाजूला घेत मृण्मयी विचारते.

आणि लगेच गाडी बाजूला लावते.

"मला नाई माहित पण आज रोजडे हाय न म्हणून मी सहज विचारलं नसेल तरी बी एखाद तरी फुल घ्या की देवाला बी वाहू शकता तुम्ही. आज माझ्या कडून कुणीच फुल घेतली नाही आणि आज जर मी पैसे घरी नेऊन दिले नाही तर बा मला मारल आमच्या घरात मी एकटीच हाय कमावणारी आई आजारी असते आणि माझा बा दारू पितो म्हणून त्याला कोणी घेतच नाही कामावर अन धाकटी बहीण शाळेत जाते त्यामुळ मलाच कराव लागतय तुमी तरी घ्या एखांद फुल." मुलगी आपली कहानी सांगत तीला बोलते.

"ठिक आहे तो चार पिवळ्या गुलाबांचा छोटासा बुके आहे न तो दे आणि याचे किती झाले ते ही सांग." मृण्मयी

"ताई हा बुके २० रुपयांना आहे हे घ्या." छोटी मुलगी

"अच्छा आणि जर का मी तुझी पूर्ण टोपलीच विकत घेतली तर? किती होतील त्याचे?" मृण्मयी

"ताई तुम्ही पूर्ण टोपली विकत घेणार? तुम्ही लै चांगले हाय." आनंदून ती मुलगी विचारते.

तिच्या डोळ्यात आनंदाश्रु असतात. मृण्मयी तीचे डोळे पुसत विचारते.

"हो मी सगळी फुल विकत घेते तसही आमच्या कडे प्रोग्राम आहे तर उपयोगाला येतील चालेल तुला?" मृण्मयी

"हो नक्कीच हे घ्या." मुलगी म्हणते.

"थँक्यु बर आता मला या पूर्ण टोपलीचे सांग किती झाले." मृण्मयी पैसे काढत विचारते.

"तुम्हाला जितके द्यायचे तितके द्या. खर तर ताई आज आई बा चा लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून मला पैसे जमवायचे होते मी दोघांना गुलाबाचं फुल देऊन विश करणार होते पण आज बोनीच झाली नव्हती पण तुम्ही मात्र देवासारखे भेटलात आणि माझी सगळी फुल घेतलीत खर तर मीच तुम्हाला थँक्यु म्हणायला पाहिजे." मुलगी सांगते

"अरे तुझ्या आई बाबांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे? मग माझ्याकडून ही त्यांना शुभेच्छा सांग आणि हे २००० हजार ठेव छान लग्नाचा वाढदिवस साजरा कर आई बाबांच्या काय." आनंदून शुभेच्छा देत मृण्मयी म्हणते

आणि ती टोपली गाडीत ठेवते. व घराकडे जायला निघते.

काही वेळा नंतर...

मृण्मयी ऍडव्होकेट जगदीशना भेटून कृष्णाई बंगल्यावर पोहोचते.

कृष्णाई बंगल्यावर...

मृण्मयी आपली गाडी पार्क करते आणि बंगल्यात परतते.

राधा ताई मृण्मयीची वाटच पहात असतात त्या तीला विचारात.

"झाली बेटा काम सगळी?" राधा ताई

"हो ताई सगळी काम झाली खूप भूक लागलीये बर मी फ्रेश होते मग आपण बोलूत हं." मृण्मयी सांगते

"हो बेटा तु फ्रेश हो मग मी जेवणाचं वाढते." राधा ताई म्हणतात.

"बर अर्णव कसाय सगळ ओके आहे न तो जेवला का?" मृण्मयी काळजीने विचारते.

"कशाचं काय जो पर्यंत मृण्मयी येत नाही तोपर्यंत जेवणार नाही असा फर्मान सुटलाय आता तुच बघ काय ते." राधा ताई सांगतात

"अरे बापरे, बर मी बघते काय सुरु आहे ते आधी फ्रेश होते मग जाऊन भेटते त्याला." मृण्मयी सांगते.

आणि आपल्या खोलीत आवरायला जाते.

क्रमशः...

तर मृण्मयी कडे अर्णव साठी एक सुंदर गिफ्ट आहे आणि अर्णव कडे सुद्धा एक सुंदर गिफ्ट आहे आता यामध्ये कुणाच गिफ्ट सगळ्यात चांगलय ते बघुत पुढील भागात.