परिचय :
आपण सर्वासामान्य लोक कायम धकाधकीच जीवन जगत असतो. आपल्याला एक ध्यास असतो काही ना काही मिळवायचा आणि त्याच धडपडीत आपण एक सारखं धावत असतो. आपल सुख नेमक कशात आहे याचा विचार न करता.
आणि मग शेवटी होत काय. तर काही तरी मिळवण्याच्या ध्यासा पायी आपण खरा आनंदच गमावून बसतो. आणि हाती येते ती फक्त काळजी टेन्शन घेत बसण्याची वेळ. पण आपल्याला हे का समजत नाही की काळजी टेन्शन्स घेऊन हाती फक्त निराशाच लागत असते यश नाही.
आणि आयुष्यात यश मिळवायचं असेल तर मन कायम शांत आणि प्रसन्न ठेवावं लागत. आणि ते फक्त ध्यान साधनेने म्हणजेच मेडिटेशनने साध्य करता येऊ शकत कस ते इथे जाणून घेऊत :
ध्यान साधनेची प्रक्रिया :
ध्यान साधना ही एक सराव पद्धती आहे जी कोणीही करू शकत.
ध्यान साधनेच्या पुढीलप्रमाणे पायऱ्या आहेत:
पायरी पहिली :
पहिले बसण्यासाठी शांत आणि आरामदायी जागा शोधा जीथे कुणाचा आवाज येणार नाही आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने ध्यानाला बसू शकाल.
पायरी दुसरी :
तुमच्या इच्छित लांबीच्या ध्यानासाठी टायमार सेट करा. नवशिके ५ - १० मिनिटापासून सुरवात करू शकतात. आणि सराव झाल्यावर हळूहळू ते वाढवू ही शकतात.
पायरी तिसरी :
आपले डोळे बंद करा आणि श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करा. यासाठी तुम्ही एखाद्या सॉफ्ट म्युझिकचा देखील वापर करू शकता जसे, बासरीचे मधुर स्वर.
पायरी चौथी :
जर तुमचे मन भरकटत असेल तर हळुवारपणे तुमचे लक्ष परत तुमच्या श्वासाकडे वळवा. ध्यान करताना मन भटकणे सामान्य आहे निराश होऊ नका पुन्हा प्रयत्न करा.
पायरी पाचवी :
तुमच्या ध्यानाच्या कालावधीसाठी तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे सुरु ठेवा.
पायरी सहावी :
टायमार बंद झाल्यावर आपले दोन्हीं तळ हाथ गरम होईपर्यंत एकमेकांवर घासून हलकेच आपल्या डोळ्यांवर ठेवा मग डोळे उघडा.
ध्यान साधनेचे फायदे :
तस पाहायला गेल तर शारीरिक आणि मानसिक दोन्हींसाठी ध्यानसाधनेचे असंख्य फायदे आहेत. त्यातीलच काही पुढील प्रमाणे :
१. तणाव आणि चिंता कमी करते :
दररोज ध्यानाचा सराव केल्याने मन शांत होते. आणि तणाव व चिंतेची पातळी देखील कमी होते. वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित केल्याने ध्यानसाधना आपल्याला भूतकाळ किंवा भविष्याबद्दल चिंता सोडण्यास मदत करते.
२. फोकस आणि एकाग्रता सुधरते :
ध्यानसाधनेमुळे एखाद्या विशिष्ट वस्तू किंवा विचारावर लक्ष केंद्रित राहण्यासाठी मनाला प्रशिक्षण देऊन फोकस आणि एकाग्रता सुधरण्यास मदत करते.
३. आत्म - जागरूकता वाढवते :
ध्यानाद्वारे, आपण आपले विचार भावना आणि वर्तन पद्धतीं बद्दल अधिक जागरूक राहू शकतो. ही वाढलेली आत्म - जागरूकता तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करू शकते.
४. रोग प्रतिकारक शक्ती वाढवते :
ध्यानसाधनेमुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे आजार आणि रोग यांच्याशी लढण्याची शरीराची क्षमता वाढते.
५. झोप सुधरते :
नियमित ध्यान साधना केल्याने झोपेची गुणवत्ता सुधरते. आणि निद्रानाश कमी होतो.
६. रक्तदाब कमी करते :
ध्यान साधना केल्याने रक्तदाब कमी होतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
कंक्ल्यूजन :
ध्यान साधना ही आपल्या जीवनात अधिक शांती आनंद आणि उद्देशाची भावना विकसित करण्यास मदत करते. ध्यान साधनेच्या नियमित सरावाने आपण चांगले शारीरिक आणि मानसिक आरोग्य मिळवू शकतो. आणि हेच आपण या लेखात पाहिले.
तुम्हाला हा लेख कसा वाटला ते मला तुमच्या प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा