
आज त्यांच्या घरात एक आनंदाचं वातावरण होत. कारण आज त्यांचा मधला मुलगा जयेश याच लग्न दिगंबर जोशी यांची मुलगी प्रभा हिच्याशी ठरलं होतं.
जयेशच्या घरात अगदी जोरात लग्नाची तयारी सुरू होती. तर तिकडे जोशी कुटुंबीय ही खूप खुश होत. त्यांना दिसायला देखणा सुंदर उच्च शिक्षित संस्कारी मुलगा जावई म्हणून मिळाला होता याचा त्यांना अभिमान वाटत होता. सगळे कसे अगदी खुश आनंदी होते.
मग नेमकं अस काय घडलं. की दोन्ही घरावर अचानक दुःखाच सावट पसरलं. लग्न कार्याच्या ऐन तयारीतच लग्ना आधीच प्रभाच्या कपाळावरील कुंकू पुसलं गेलं.
ही कथा आहे रामपूर गावात राहणाऱ्या कुलकर्णी कुटुंबाची. सीताराम कुलकर्णी रामपूर गावातले उच्च कोटीच्या पंडितांमध्ये गणले जाणारे गुरुजी होते. त्या गावातले ते सगळ्यात श्रीमंत पंडित म्हणून गणले जात असत. कुणाकडे ही कुठलाही कार्यक्रम असो आधी त्यांना बोलावल जायचं .
सीताराम गुरुजींना तीन मुल होती. मोठा विनायक, विनायक आपल्या वडिलांबरोबर पूजापाठ सांगायचा. मधला जयेश, जयेश बँकेत काम करायचा तर सगळ्यात धाकटा विघ्नेश, विघ्नेश शेती करायचा.
मोठया मुलाच विनायकच नुकतच लग्न झाल होत. त्याच्या लग्नातच जयेशसाठी जोशी कुटुंबाच स्थळ आलं होतं. सगळं कसं एकदम सुरळीत सुरू होत. आणि अचानक तो दिवस येतो. लग्नाचे काहीच दिवस शिल्लक होते म्हणून जयेशला ही मुंबईहुन बोलाऊन घेतलं गेलं. जयेश तसा वेळ पाळणारा मुलगा होता. पण त्या दिवशी काय झालं कोण जाणे जयेशला सगळ्या गोष्टीत उशीर होत होता. त्याला निघायची घाई होत होती. सगळं घरच आवरण बाकी होत हाच विचार करून जयेश आपलं घाई घाईत आवरतो आणि बसस्टँडच्या दिशेने चालु लागतो नेमकं त्याच दिवशी रिक्षा ही तुरळक होत्या म्हणून त्याला दूर चालत जावं लागतं होत. आणि अशातच एका ट्रकचा धक्का लागून जयेशचा ऍक्सिडंट होतो.
आणि त्याच दिवसा पासुन एक भयाण खेळ सुरू होतो.
जयेशचा आत्मा गावातल्या प्रत्येक व्यक्तीला त्रास देऊ लागतो. गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कधी आवाज देतो तर कधी अचानकपणे समोर येतो. हे आपल्या बाबतीत नेमक काय घडतय हे कुणालाच कळत नाही जयेशचा आत्मा आपल्या पाठीमागे का लागला आहे हे कुणालाच समजत नाही. त्याला शांत करण्यासाठी नाना उपाय केले जातात पण त्याचाही उपयोग होत नाही. शेवटी जयेशचे वडील एक बैठक घेऊन निर्णय घेतात की.
"गावातल्या प्रत्येक घरानी एक एक दिवस ठरवून एका पडक्या घरात बारा भाकरी ठेवायच्या. ते घर मी मंत्रुन ठेवेल म्हणजे तो कुणालाही त्रास देणार नाही."
असा निर्णय घेऊन गावातील प्रत्येकाला एक वार ठरवून देतात. त्या गावातली लोक त्या त्या वारी बरोबर बारा वाजता भाकरी ठेऊन निघून जात असत. पण पर्यायानी सुध्दा फारसा उपयोग झाला नाही.. जयेशला