प्रस्तावना :

तुम्ही कशी करता सकाळची सुरवात? सकारात्मक विचारांनी की नकारात्मक विचारांनी?

आपण नेहमी सकारात्मक विचारांनीच सकाळची सुरवात केली पाहिजे पण आपण काय करतो सकाळी उठत नाही की आधी मोबाईल हातात घेतो कुठल्या बातम्या आहेत सोशल मीडियावर काय सुरु आहे हे बघतो आणि त्यामुळे आपला सगळा दिवस नकारात्मकते मध्ये जातो कारण दिवसातून कित्येकदा आपण त्याच घटनांचा विचार करत असतो आणि कळत नकळत आपण त्यात गुंतत जातो. म्हणून थोडासा वेगळा विचार करून एक नवीन सकाळची सुरवात करून बघा :

त्याचसाठी आहेत हे १० पॉईंट्स जे तुम्हाला नक्की मदत करतील.

१. कृतज्ञतेने जागे व्हा :

तुमच्याकडे असलेल्या गोष्टी आणि पुढील संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून तुमच्या दिवसाची सुरवात करा.

२. टु डू लिस्ट तयार करा :

आज दिवस भरात काय काय काम करायची आहेत याची एक टु डू लिस्ट बनवा. आणि ती काम पूर्ण करायचीच आहेत यासाठी बांधील रहा.

३. माईंडफूलनेस किंवा ध्यानाचा सराव करा :

स्वतःसाठी थोडासा वेळ काढून ध्यानाचा सराव करा आणि सकारात्मक मानसिकता जोपासा.

४. शारीरिक हालचाल करा :

शारीरिक हालचाल करा. म्हणजे व्यायाम करा एखाद जिम लावा सकाळी फिरायला जा ज्यामुळे तुमचं मन आनंदी राहण्यास मदत होईल आणि त्यामुळे तुमची सकाळ देखील प्रसन्नतेत जाईल.

५. नकरात्मक विचार टाळा :

नकारात्मक बातम्या सोशल मीडिया पासून दूर रहा जे तुमचा मूड दिवसाच्या सुरवातीला खराब करू शकतात त्या ऐवजी मनाला आनंद देणारी गाणी ऐका प्रेरक विचार ऐका ज्यामुळे तुम्ही दिवसभर प्रसन्न राहाल आणि तुमची कामे ही लवकर होतील.

६. प्रियजनांशी बोला :

सकाळचा दिवस सकारात्मकतेने सुरु करण्यासाठी तुमच्या प्रियजनांना भेटा त्यांच्याशी बोला त्यांच्याशी आपुलकीने वागा म्हणजे त्यांच्या आनंदाने तुमचा दिवस देखील आनंदी आणि सकारात्मकतेत जाईल.

७. प्रेरणादायी संगीत किंवा पॉडकास्ट ऐका :

सकाळी भक्तिमय किंवा प्रेरणादायी संगीत ऐकल्याने आपला पूर्ण दिवस आनंदात आणि सकारात्मकतेत जातो म्हणून सकाळी प्रेरणादायी संगीत किंवा पॉडकास्ट ऐका.

८. तुमच्या पूर्ण दिवसाची योजना बनवा :

तुमच्या पूर्ण दिवसाचे नियोजन करण्यासाठी काही मिनिटे काढा. साध्य करण्यायोग्य उद्दिष्टे निश्चित करा आणि कार्यांना प्राधान्य द्या, ज्यामुळे तणाव कमी होण्यास आणि पुढील दिवसासाठी सकारात्मक दृष्टिकोन तयार करण्यास मदत होईल.

कंक्ल्यूजन :

प्रत्येकाची सकाळची सुरवात करण्याची पद्धत ही वेगळी असते. पण जर का योग्य पद्धतीने काम केल तर नक्कीच यश मिळत. आणि आपल्याला जर का कायम निरोगी आणि सकारात्मक राहायचं असेल तर आपल्याला योग्य दिनचर्येचा अवलंब करण गरजेच आहे आणि हेच आपण या पोस्ट मध्ये पहिलं

तुम्हाला हा लेख कसा वाटला ते मला तुमच्या प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. पुन्हा भेटू पुढच्या लेखात तोपर्यंत स्वस्थ रहा आणि सकारात्मक व आनंदी जगा.

थँक यु युनिव्हर्स थँक यु युनिव्हर्स थँक यु युनिव्हर्स