एक वेगळी वाट निवडलेय मी

एक वेगळी वाट निवडलेय मी

ती वेगळी वाट चोखाळतोय

त्या वाटेवर सुंदर रस्ता बांधण्याचा प्रयत्न करतोय

काहीतरी वेगळं करायचयं मला

काहीतरी वेगळं करायचयं मला

लोकांना काहीतरी चांगलं द्यायचंय मला

मी माझ्या तत्वांवर जिंकण्यासाठी झगडतोय 

 मी एक वेगळी वाट चोखाळतोय



स्वतःला सिद्ध करायचय मला

स्वतःला सिद्ध करायचय मला

आपल तत्वज्ञान खरं करायचय मला

जगण्याचा आनंद लुटायचाय मला

त्या आनंदासाठी 

त्या आनंदासाठी 

सर्वांना आनंद वाटण्यासाठी 

आणि एक समाधानी आयुष्य जगण्यासाठी मी सर्व करतोय 

 मी एक वेगळी वाट चोखाळतोय



माझं आवडतं काम करायचंय मला

माझं आवडतं काम करायचंय मला

मला जमणाऱ्या, भावणाऱ्या, आवडणाऱ्या कामातच यशस्वी व्ह्यायचय मला 

ज्यातून समाधान मिळतं त्या कामातच काहीतरी वेगळं आणि चांगलं करायचंय मला

आणि मला जमणाऱ्या कलेला अजून बहर द्यायचाय मला 

म्हणूनच मी चाकोरी मोडतोय 

आणि हा सगळा खटाटोप करतोय 

 मी एक वेगळी वाट चोखाळतोय



यश कधी मिळेल माहीत नाही

यश कधी मिळेल माहीत नाही

मी हारेन की जिंकेन तेही माहीत नाही

हरण्या जिंकण्यासाठी नाही

हरण्या जिंकण्यासाठी नाही

कोणाला दाखवण्यासाठी देखील नाही

मी फक्त मला जे चांगलं जमतं त्यातच

लोकांना चांगलं देण्यासाठी धडपडतोय

मी एक वेगळी वाट चोखाळतोय



प्रवाहाविरुद्ध पोहण कठीण आहे

प्रवाहाविरुद्ध पोहण कठीण आहे

वेगळा मार्ग पटवून सांगणंही कठीण आहे

वेगळ्या मार्गाने यश मिळवण देखील फारच कठीण आहे

मी तेच कठीण काम सोप्पं करण्यासाठी भटकतोय 

ह्या वेगळ्या वाटेनेसुद्धा यश मिळू शकतं 

मी तेच म्हणणं मांडतोय 

मी एक वेगळी वाट चोखाळतोय



वेगळ्या वाटेवर काटे खूप आहेत 

वेगळ्या वाटेवर काटे खूप आहेत 

मोठमोठे खड्डे देखील भरपूर आहेत 

त्या काटयांवर चालून  

त्या काटयांवर चालून

सर्व खड्डे भरून काढून 

मी ती वाट सुंदर आणि सर्वउपयोगी करण्यासाठी 

दिवसरात्र एक करतोय 

मी एक वेगळी वाट चोखाळतोय 

 


काहीतरी वेगळं केल्याशिवाय

नवीन मार्ग निर्माण होणार नाहीत

काहीतरी वेगळं केल्याशिवाय

नवीन मार्ग निर्माण होणार नाहीत

नवलाईचा शोध लागणार नाही

वेगळ्या वाटा चोखाळल्याशिवाय 

समाजात नवनवीन संधी उपलब्ध होणार नाहीत

त्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी

त्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी 

एक नवा पर्याय उभा करण्यासाठी

मी फक्त एक खारीचा वाटा उचलतोय

मी एक वेगळी वाट चोखाळतोय

मी एक वेगळी वाट चोखाळतोय