ती
माझ्या जीवनातली ती
आई मधली ती, बहिणी मधली ती
आई मधली ती, बहिणी मधली ती
मैत्रिणी मधली ती
बायको मधली ती, मुलगी मधली ती
बायको मधली ती, मुलगी मधली ती
आणि समाजात मोठमोठी शिखरे पादाक्रांत करणारी ती
सर्वांची काळजी घेणारी ती
सर्वांची काळजी घेणारी ती
ममतेची उभ देणारी ती
प्रेमाचा अर्थ शिकवणारी ती
आपल्या पिल्लांसाठी लहानगी होणारी ती
आपल्या पिल्लांसाठी लहानगी होणारी ती
आपल्याशी लडिवाळ भांडणारी ती
आणि आपल्यासाठी मुद्दामच हारणारी देखील तीच
संकटकाळी आधार देणारी ती
दिवसभर राभ राभ राभनारी ती
आणि सतत कष्ट करून देखील
सतत कष्ट करून देखील
चेहऱ्यावर सदा स्मितहास्य असणारी ती
किशोरवयात आम्ही करतो भारीच मज्जा
किशोरवयात आम्ही करतो भारीच मज्जा
आमच्याकडे असतो भरपूर वेळ खेळायला आणि बागडायला
तिला मात्र
तिला मात्र अभ्यास आणि खेळासोबत शिकायच्या असतात भाकऱ्या भाजायला
तरीसुद्धा
तरीसुद्धा सर्व बोर्डांच्या परीक्षांत तीच असते टॉपला
आणि आमच्या नाकी नऊ येतात साधे पास व्ह्यायला
घरची जबाबदारी देखील ती फारच लवकर घेते
घरची जबाबदारी देखील ती फारच लवकर घेते
आणि आमच्या अगोदरच ती खूप मॅच्यूअर होते
ती खूप मॅच्यूअर होते
सकाळी सकाळी तिची भारीच घाई
सकाळी सकाळी तिची भारीच घाई
मुलांचा सातचा डब्बा आमचा आठचा डब्बा
आणि गिरणीत ठेवून दळणाचा डब्बा
पकडायचा असतो तिला आठ चाळीसचा लेडीज डब्बा
ती असते सदैव तत्पर
ती असते सदैव तत्पर
छोट्या आणि मोठ्या बाळांचे देखील हट्ट पुरवायला
घरातील बारीक सारीक आणि ऑफिसमधील मोठमोठी कामे उरकायला
आम्हांला फक्त एकाच जॉब चे टेन्शन
आम्हांला फक्त एकाच जॉब चे टेन्शन
तिला मात्र दोन दोन जॉब
एक पगारी आणि एक बिनपगारी
बिनपगारी जॉब सुद्धा ती अगदी नेटाने करते
बिनपगारी जॉब सुद्धा ती अगदी नेटाने करते
कुटुंबावर काही संकट ओढवलं तर लढायला देखील ती पुढे येते
आजारपणात तर ती आमची भारीच काळजी घेते
पण स्वतःच्या तब्बेतीची मात्र कधी कधी हेळसांड करते
पदरमोड करून करत असते ती गुपचूप बचत
पदरमोड करून करत असते ती गुपचूप बचत
संकटकाळी आम्हालाच होते त्याची भारी मदत
आम्हाला लागतो रविवार
आम्हाला लागतो रविवार
मस्त लोळायला
बेड वर पाय पसरून
हे आन ते दे अशा ऑर्डरी सोडायला
तिला मात्र नसते कधीच सुट्टी
तिला मात्र नसते कधीच सुट्टी
ती असते चोवीस तास ऑन ड्युटी
सगळ्यांच्या ऑर्डरी पूर्ण करने हीच तिची ड्युटी
हीच तिची ड्युटी
ते स्विगी झोमॅटो वाले उशीर करतील कधी कधी
ते स्विगी झोमॅटो वाले उशीर करतील कधी कधी
पण तिची डिलिव्हरी मात्र अगदी वेळेवर अजिबात न चुकता
आणि ना कुठला डिलिव्हरी चार्ज घेता
ना कुठला डिलिव्हरी चार्ज घेता
आम्हाला चांगलचुंगल खावू घालण्याच तिला भारी वेड
आम्हाला चांगलचुंगल खावू घालण्याच तिला भारी वेड
स्वतःला नाही मिळालं तरी चालतं तिला
पण आम्हाला गरम गरम वाढणं भारीच आवडतं तिला
मोठमोठी स्वप्ने पूर्ण करायचे आम्हाला असतं टेन्शन
तिचे मात्र आपल्या माणसांची काळजी घेणे हेच पॅशन
हेच पॅशन
आमच्या सर्वांच्या यशात तीच भारी खूष होते
आमच्या सर्वांच्या यशात तीच भारी खूष होते
आमचीच स्वप्ने ती स्वतःची म्हणून जगते
पण तीच देखील काहीतरी स्वप्नं होत हेच ती विसरून जाते
हेच ती विसरून जाते
आम्हांला हक्क आहे बरका
तिच्यावर ओरडायला
आम्हाला हक्क आहे बरका
तिच्यावर ओरडायला
वेळेत गोष्ट मिळाली नाही तर धिंगाणा मांडायला
ती मात्र
गप्प ऐकून तयार
ती मात्र गप्प ऐकून तयार
पुन्हा
आमचेच हट्ट पुरवायला
आमचेच हट्ट पुरवायला
हिनवू नका तिला म्हणून अबला नारी
हिनवू नका तिला म्हणून अबला नारी
अहो तिच्यात हिम्मत आहे आपल्यापेक्षा लय भारी
समाजातील प्रत्येक क्षेत्रात उठवत आहे ती ठसा
तुम्ही फक्त तिच्या सोबत असा
स्वतःसाठी जास्त काही नको असतं तिला
फक्त कधी कधी कौतुकाची थाप देत जा तिला
आपल्याकडून निखळ प्रेम मिळावं एवढीच तिची अपेक्षा
आपल्याकडून निखळ प्रेम मिळावं एवढीच तिची अपेक्षा
त्या प्रेमात तरी करू नका तिची उपेक्षा
करू नका तिची उपेक्षा
सलाम करतो तिला
सलाम करतो तिला
आणि तिच्या कर्तुत्वाला
माझ्या आयुष्यातील प्रत्येक तिला
प्रत्येक तिला.

