
सकाळी लवकर उठणे
सकाळी लवकर उठणे
ध्यान करने, व्यायाम करणे
लवकर लवकर उरकून
सर्वांत आधी कामाला सुरुवात करणे
यश मिळवण्याचं चिरकालिन सूत्र असतं ते
शास्त्र असतं ते
पैसा आणि प्रसिद्धी न बघता
पैसा आणि प्रसिद्धी न बघता
आपल्याला आवडेल तेच काम करणे
जे चांगलं जमतं त्यातच जास्तीत जास्त कुशल होत रहाणे
आपलं पॅशन फॉलो करणे
आणि
आपल्या प्रिय कामात काहीतरी भव्य निर्माण करणे
सुखी आयुष्याचं गमक असतं ते
शास्त्र असतं ते
आपण लावलेल्या रोपट्याची काळजी घेत रहाणे
आपण लावलेल्या रोपट्याची काळजी घेत रहाणे
चांगले खतपाणी घालणे
रोपट्याशेजारील तण शांतपणे बाजूला करणे
आणि
सतत मशागत करून
सतत मशागत करून
ऊन वारा पाऊस झेलून
रोपट्याचा स्वप्नवत कल्पवृक्ष होईपर्यंत झटत रहाणे
आयुष्याचं सोप्पं गणित असतं ते
शास्त्र असतं ते
सतत मेहनत करत रहाणे
सतत मेहनत करत रहाणे
आपल्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ देत रहाणे
आपल्यावरील टीकेला कामातुनच उत्तर देणे
आणि
संयम ठेवून फक्त स्वतःमध्येच सुधारणा करत रहाणे