जीवनाच्या रंगमंचावर तूफान बॅटिंग करायचीय
जीवनाच्या रंगमंचावर तूफान बॅटिंग करायचीय
क्लायमॅक्स सुंदर व्हावा म्हणून
इंट्रीच सॉलिड मारायचीय
इंट्रीच सॉलिड मारायचीय
हाऊसफुल्ल चा बोर्ड लागो न लागो
हाऊसफुल्ल चा बोर्ड लागो न लागो
आपण फक्त आपली इनिंग प्रामाणिकपणे खेळायचीय
जीवनाच्या रंगमंचावर तूफान बॅटिंग करायचीय
तूफान बॅटिंग करायचीय
विधात्याने लिहलेल्या कथेच सुंदर पटकथेत रूपांतर करायचय
विधात्याने लिहलेल्या कथेच सुंदर पटकथेत रूपांतर करायचय
आपुलकीच्या संवादांतुन लोकांची मन जिंकायचीयेत
आणि
आपली आवडती कला सादर करून
आपली आवडती कला सादर करून
नकरात्मकतेच्या खलनायकाला हरवून
आपल्याला एक उत्तम कलाकार व्हायचय
जीवनाच्या रंगमंचावर तूफान बॅटिंग करायचीय
तूफान बॅटिंग करायचीय
आपल्या जिवनगीतात सुंदर स्वर भरायचेत
आपल्या जिवनगीतात सुंदर स्वर भरायचेत
जीवनाच्या प्रत्येक क्षणांत चांगला सुरसाज चढवायचाय
आणि परिस्थितीच्या तालावर नाही
परिस्थितीच्या तालावर नाही
स्वतः च्याच तालावर नाचायचय
जीवनाच्या रंगमंचावर तूफान बॅटिंग करायचीय
तूफान बॅटिंग करायचीय
सुखाच्या आणि दुःखाच्या दोन्ही कॉस्च्युम्समध्ये समतेने वावरायचंय
सुखाच्या आणि दुःखाच्या दोन्ही कॉस्च्युम्समध्ये समतेने वावरायचंय
ना सुखाच्या प्रसंगात भारावून जायचयं
ना दुःखात अडकून रहायचंय
आणि
आग भडकू नये म्हणून
आग भडकू नये म्हणून
वाद विवादाच्या क्षणी फक्त मुक अभिनय करायचाय
जीवनाच्या रंगमंचावर तूफान बॅटिंग करायचीय
तूफान बॅटिंग करायचीय
आपल्यातील कला सिद्ध होईपर्यंत
आपल्यातील कला सिद्ध होईपर्यंत
इतरांची साथ मिळेपर्यंत
एकपात्री का होइनात
पण आपले प्रयोग सतत सादर करायचेत
आपली रंगरंगोटी आपणच करायचीय
आपली रंगरंगोटी आपणच करायचीय
आपणच निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकार देखील व्हायचंय
जीवनाच्या रंगमंचावर तूफान बॅटिंग करायचीय
तूफान बॅटिंग करायचीय
आपल्या सहकाऱ्यांना देखील सोबत घेवूण पुढे जायचंय
आपल्या सहकाऱ्यांना देखील सोबत घेवूण पुढे जायचंय
कोणी अडखळत असेल तर त्याला सावरायचय
आणि
फक्त स्वतःला नाही
फक्त स्वतःला नाही
तर संपूर्ण टीमला जिंकवाचय
जीवनाच्या रंगमंचावर तूफान बॅटिंग करायचीय
तूफान बॅटिंग करायचीय
मिळालेल्या नेपथ्यावरच आपल्यातील सर्वोत्कृष्ट देत रहायचंय
मिळालेल्या नेपथ्यावरच आपल्यातील सर्वोत्कृष्ट देत रहायचंय
ब्लॅकआउट मध्ये सुद्धा पूर्ण ताकतीने काम करायचंय
आणि कधी कधी बॅक स्टेजला जावून
कधी कधी बॅक स्टेजला जावून
सिंहावलोकन देखील करायचय
प्रेक्षकांची आणि विधात्याची दाद नक्कीच मिळेल कधीतरी
प्रेक्षकांची आणि विधात्याची दाद नक्कीच मिळेल कधीतरी
आपल्याला फक्त रोज दररोज आपलं काम नेटाने करत रहायचंय