छुम-छुम पैंजण पायात चढले
स्वर्ण कंकण मनगटात सजले,
कुंकू अलंकार हा कपाळाचा
शृंगार हा तुझ्या परतण्याचा,
वाट बघतोय तुझी येशील कधीं ?
हरवली तुझ्या आठवणींत मी,
विजयाचा टिळा लावशील कधीं ?
अवचित...
धड-धड काळजाचे ठोके वाढले
आतुरले डोळे अश्रूंनी भिजले,
हा क्षण होता स्वाभिमानाचा
मायभूमीच्या हौतात्म्याचा, पण
तू अता मला भेटशील कधीं?
वाट बघतोय तुझी येशील कधीं?
तुझ्या परतण्याचे धीर छिन्न-ले
वाट बघतोय तुझी येशील कधीं?