आई,


तू पानझडीत ग सुखदुःखाचे वेचती फुलं

भास्कराच्या क्रोधा पुढे उभी राहून ठाम

तू मृतक वृक्षांचे देह जाळून शिजवितो अन्न,

ग आई तुला कसं काय होणारं?


तुझं पर्जन्यात वावर विना कौलारू चा घरं

तू पिकाचं एक-एक कोंब जोपासते जणू

स्वतःच्या गर्भातील दुधावरची तान्हं बाळं,

ग आई तुला कसं काय होणारं?


तुझं उदात्त परिश्रम ग देहाच्या पलीकडचं

शेण-मातीची ग मेंदी रोज हातावर काढून

तू संसाराच्या चार भिंती बनवितेस सबळ,

ग आई तुला कसं काय होणारं?


दुःखाची काटे गळून उभी तुझ्या नशिबावर

तरीसुद्धा धडपडते तुझे पाऊल कधीचं ना थांबले

आयुष्यातील बहुरूपी पात्रांच्या नाट्य-मंचकावर,

ग आई तुला कसं काय होणारं?