आई,


तुझ्या आटवणी ग माझ्या पावलोपावली

जणू माझ्या देहाची आणि श्वासची सांगळी,


मी जेव्हा-तेव्हा घराचं उंबरठा ओलांडला

तू म्हणे वाटतंय पोराचं लग्न-निरोप चालला,


मला तू स्वतःच्या निर्मळ ममतेच्या पदरात ठेवली

आणि तप्त उन्हातान्हात तळपाय वन्हीत ओतली,


तुझ्याविना जातं ग पोटात ३ पोळी आणि भात

पण तुझं ममत्व ना भासे ग कुटल्याही चाव्यात,


तू लेकरांच्या पोटी घालतेस पोळी आणि पांढरा भात

पण तुझ्याच पोटी जळकी भाकर आणि बुडाचं भात,


शिक्षणाच्या पदव्या हयात कित्येकही कमवनार पण

जीवनाचं सार-रूपी ज्ञान तुझ्याकडेच मिळणार,


तुझं प्रचंड जिव्हाळा, संगोपन आणि परित्याग

मी कुठल्या जन्मात ग हा तुझं कर्ज फेडणार,


बाप निघून गेलं की घराचं कौलारू वितळते

माय निघून गेली की संसारी काळोख पसरते.