मंचावर अडखळले मुखात शब्द तरी,

मी बोलण्याचा सामर्थ्य सोडणार नाहीं;


कंठातील वाणी बेसुरी असलीं तरी,

मी गाणं गायनाचा नाद सोडणार नाहीं;


नर्तन करता क्षणी पाय मुरगळा तरी,

मी माझ्या तालात नाचणं सोडणार नाही;


काव्यात शब्दांचे यमक ना जुळले तरी,

मी कविता लिहिणे थांबविणार नाहीं;


माझे संपूर्णतः रक्त-संबंध तुटले तरी,

मी माणुसकीचं नातं तोडणार नाहीं;


प्रेमात दुःखानं विच्छिन्न झालं हृदय तरी,

मी प्रेमाची भावना त्यागणार नाही;


पथावर बोचले काटे तळपायाला तरी;

मी प्रफुल्लित चालणे सोडणार नाही,


अपयशाच्या दुःखानं भरकटून कोसळलो तरी,

मी मागे वळणार नाही, मी खचणार नाही.