असं वाटते की,
जणू लहानपण डोळ्यांची पारणें फेडताच निघून गेले
जो क्षण हृदय भरून जगायचा होता त्याचे खंत राहिलें,
चिमुकल्या बहिणींचं गोंडसपणा, हट्ट–लाड–स्नेह
बंधू प्रति मित्रत्व राहिलें,
आजीची निगा, आजोबांचा कडकपणा,
आईची मिठी, बाबांचे पाठबळ राहिलें
असं वाटते की,
जणू लहानपण डोळ्यांची पारणें फेडताच निघून गेले,
जो क्षण हृदय भरून जगायचा होता त्याचे खंत राहिलें;
कंच्या–डी-वर-डी–नदीचा पहाड–गिल्ली दांडू इ. खेळायचे राहिलें
बोरं–येरवन्या–चार–जांबर व कवट इ. चाखायचे राहिलें
असं वाटते की,
जणू लहानपण डोळ्यांची पारणें फेडताच निघून गेले
जो क्षण हृदय भरून जगायचा होता त्या
चे खंत राहिलें